Join us

बाळासाठी करा नाचणी सत्वाची खीर, बाळ होईल गुटगुटीत-धावेल दुडूदुडू घरभर-पाहा रेसिपी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2025 09:30 IST

ragi porridge for babies: nachani satva: health benefits of ragi for babies: हे नाचणी सत्व घरी कसं बनवायचे पाहूया.

बाळ जन्माला आल्यानंतर हे गुटगुटीत, हेल्दी आणि ताकदवान असावं असं प्रत्येक आई-वडिलांना वाटतं. बाळ सहा महिन्यांचे झाल्यानंतर ते आईच्या दुधासोबत इतर पदार्थ देखील खाऊ लागतात. बाळाला काय खायला घालावे आणि काय नाही याबद्दल आपल्यापैकी अनेकांना माहित असते.(ragi porridge for babies) मार्केटमध्ये अनेक बेबी फूड्स, सॅरेलॅक्स मिळतात पण त्यामध्ये प्रिझर्वेटिव्हज आणि कृत्रिम फ्लेवर्स, साखर असते जे आपल्या बाळाच्या आरोग्यासाठी चांगले नाही. (nachani satva)अशावेळी घरगुती नाचणी सत्व म्हणजे उत्तम, पौष्टिक आणि चांगला पर्याय. नाचणीमध्ये कॅल्शियम, लोह, प्रोटीन आणि फायबर भरपूर प्रमाणात असते.(health benefits of ragi for babies) त्यामुळे बाळाची हाडे मजबूत होतात, पचन सुधारते आणि वजन आरोग्यदायी पद्धतीने वाढते. नाचणी सत्व हलके, बाळासाठी सहज पचणारे आणि पोषणमूल्याने भरलेले असते. हे नाचणी सत्व घरी कसं बनवायचे पाहूया.  (baby weight gain foods)

भेंडीची भाजी चिकट - गिळगिळी होते? ‘ही’ भन्नाट ट्रिक वापरा, बेसन भेंडी होईल जबरदस्त चविष्ट!

साहित्य 

नाचणी सत्व - १ चमचा पाणी - १ कप गूळ (साफ केलेला) - चवीनुसार तूप - १/२ चमचा 

ढाब्यावर मिळणारा कुरकुरीत कांदा पराठा करा घरीच, ६ टिप्स - पीठ होईल परफेक्ट, पराठा टम्म फुगेल

कृती 

1. सगळ्यात आधी नाचणी धुवून सुकवून घ्यावी. उन्हात न वाळवता पंख्याखाली सुकवावी. पूर्णपणे सुकल्यानंतर याचे पीठ दळून घ्यावे. दळलेले पीठ व्यवस्थित चाळणीने चाळून घ्या. आता एका वाटीत नाचणी सत्व थोड्या पाण्यात एकजीव करुन घ्या. याच्या गुठळ्या होणार नाही याची काळजी घ्याल. 

2. आता एका भांड्यात पाणी उकळण्यासाठी ठेवा. त्यात नाचणीचे मिश्रण टाकून सतत ढवळत राहा. मिश्रण घट्ट होईपर्यंत ५ ते ६ मिनिटे शिजवा. बाळ ८ महिन्याचं किंवा त्याहून मोठे असेल तर थोडा गूळ घालू शकता. थोडे तूप घालून गॅस बंद करा, थंड झाल्यावर बाळाला खायला द्या. बाळाला रोज खाऊ घालते तर वजन वाढण्यास सुरुवात होते. 

टॅग्स :अन्नपाककृती