Join us
Daily Top 2Weekly Top 5

खरबुजाची ‘अशी’ कोशिंबीर तुम्ही कधीच खाल्ली नसेल! ५ मिनिटांत करा 'मस्कमेलन सॅलेड'; उन्हाळ्यात पोटाला गारवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2026 09:30 IST

Muskmelon Salad Recipe: Healthy Summer Salad: Fruit Chaat Recipe: ५ मिनिटांत खरबुजाची कोशिंबीर कशी करायची पाहूया.

कडाक्याच्या उन्हात शरीरातील पाण्याची पातळी टिकवून ठेवणं आणि पोटाला थंडावा देणं हे अत्यंत महत्त्वाचे असते. अशावेळी आपण रसाळ फळांचा आधार घेतो. खरबूज हे उन्हाळ्यातील सर्वात लोकप्रिय आणि आरोग्यदायी फळांपैकी एक आहे.(Muskmelon Salad Recipe) आपण खरबूज कापून खातो किंवा त्याचा ज्यूस बनवतो. पण, कधी 'खरबुजाची कोशिंबीर'खाल्ली आहे का? हे चवीला अत्यंत चटपटीत लागते. (Muskmelon Salad Recipe)जेवताना तोंडी लावायला किंवा संध्याकाळच्या वेळी हलकी भूक लागल्यावर हा एक उत्तम पर्याय आहे. खरबुजामध्ये पाण्याचे प्रमाण भरपूर असते, जे आपल्याला हायड्रेटेड ठेवते. (Fruit Chaat Recipe) तसेच यात व्हिटॅमिन ए आणि सी मुबलक असल्याने ते त्वचेसाठीही वरदान ठरते. ५ मिनिटांत ही कोशिंबीर कशी करायची पाहूया. 

७ दिवसांत घरच्या छोट्या कुंडीत वाढेल हिरवीगार कोथिंबीर, खास ट्रिक- चमचाभर धणे पेरण्याची सोपी पद्धत

साहित्य 

खरबुजाचे तुकडे - १ वाटी दाण्याचा कूट - २ चमचेओलं खोबरं - २ चमचेडाळिंबाचे दाणे - १ छोटी वाटीबारीक चिरलेली हिरवी मिरची - १ मीठ - चवीनुसारसाखर - १ चमचाभाजलेली जिरे पूड - १ चमचाकोथिंबीर - आवश्यकतेनुसार

कृती 

1. सगळ्यात आधी खरबूज धुवून त्याचे दोन भाग करा. त्यातील बिया चमच्याने काढून टाका. खरबुजाची साल काढून त्याचे मध्यम आकाराचे चौकोनी तुकडे करा. 

2. एका मोठ्या बाऊलमध्ये खरबुजाचे तुकडे घ्या. त्यावर दाण्याचा कूट, हिरवी मिरची, साखर, मीठ, ओलं खोबरं, काळे मीठ, भाजलेली जिरेपूड आणि चाट मसाला टाका.

3. हवं असल्यास आता त्यात लिंबाचा रस पिळा. वरून बारीक चिरलेली फ्रेश कोथिंबीर आणि पुदिन्याची पाने घाला. पुदिन्यामुळे या कोशिंबिरीला वेगळी चव येते. 

4. सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करा. ही कोशिंबीर बनवल्यानंतर लगेच खावी किंवा १५-२० मिनिटे फ्रिजमध्ये ठेवून थंडगार सर्व्ह करावी.

 

English
हिंदी सारांश
Web Title : Muskmelon Salad: A refreshing summer cooler ready in 5 minutes!

Web Summary : Beat the heat with this quick muskmelon salad! It's hydrating, packed with vitamins, and a tasty way to enjoy muskmelon beyond juice or slices. Ready in minutes, it's perfect as a side or light snack.
टॅग्स :अन्नपाककृती