Join us
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई स्टाईल झणझणीत मसाला सॅण्डविच पाव करा घरीच, १० मिनिटांत होणारी सोपी रेसिपी - मुलं होतील खूश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2025 09:30 IST

Mumbai style sandwich: Masala sandwich pav: Mumbai street food recipe: झणझणीत पदार्थ खायचे असतील तर मसाला सॅण्डविच पाव ट्राय करु शकता.

सॅण्डविच म्हटलं की आपल्याला सगळ्यात आधी आठवतो तो ब्रेड. सगळ्याचा आवडता आणि झटपट होणारा पदार्थ. पण अनेकदा मुलांना किंवा आपल्याला ब्रेड खाऊन वैताग येतो. (Mumbai style sandwich) अशावेळी आपण ब्रेडऐवजी पावाचा वापर करु शकतो. ऑफिसला निघताना, मुलांना शाळेसाठी झटपट काहीतरी द्यायचं असतं तेव्हा मसाला सॅण्डविच पाव हा एकदम परफेक्ट पर्याय ठरतो.(Masala sandwich pav)  अनेकदा आपण सॅण्डविच विकत आणतो, पण बाहेरुन विकत आणण्यापेक्षा सोप्या पद्धतीने घरी बनवू शकतो. (Indian sandwich recipe)सकाळचा किंवा संध्याकाळचा नाश्त्यासाठी हा बेस्ट पर्याय आहे. ब्रेड-बटर, बिस्कीट किंवा इतर स्नॅक्स पदार्थ खाऊन आपल्याला कंटाळा येतो. (Kids tiffin recipes)  मुंबईच्या स्ट्रीट फूडमध्ये विविध पदार्थ सहज चाखायला मिळतात. जर आपल्यालाही काही चटपटीत आणि झणझणीत पदार्थ खायचे असतील तर मसाला सॅण्डविच पाव ट्राय करुन पाहू शकतो. पाहूया ही रेसिपी बनवण्यासाठी लागणारे साहित्य. (Easy 10-minute recipes)

ऑफिसवेअरसाठी प्रिटेंड शर्टचे ५ नवीन पॅटर्न! पाहा आकर्षक डिझाइन्स, कॅज्युअल लूकमध्ये दिसाल स्मार्ट आणि एलिगंट

साहित्य 

काकडी - १शिमला मिरची - १टोमॅटो - १कांदा - १बीट - १लाल सुक्या मिरच्या - १० ते १२लसूण पाकळ्या - ४ ते ५मीठ - चवीनुसार धने पावडर - १ चमचा बटर - १ चमचा पाव भाजी मसाला - १ चमचा बारीक चिरलेला कोथिंबीर - १ चमचा चाट मसाला - १ चमचा 

कृती 

1. सगळ्यात आधी काकडी, शिमला मिरची, टोमॅटो, कांदा आणि बीट गोलाकार आकारात कापून घ्या. त्यानंतर पातेल्यात पाणी गरम करुन त्यात लाल सुक्या मिरच्या घाला. पाण्याला उकळी आल्यानंतर मिरच्या काढून घ्या. 

2. आता मिक्सरच्या भांड्यात भिजवलेल्या सुक्या लाल मिरच्या, लसूण पाकळ्या, मीठ घालून त्याची बारीक पेस्ट तयार करा. 

3. तव्यावर बटर तापवून त्यात पाव भाजी मसाला आणि लाल मिरच्यांची पेस्ट घालून व्यवस्थित मिक्स करुन घ्या. यानंतर त्यावर पाव चांगले फ्राय करुन घ्या. 

4. पावामध्ये आपण काकडी, शिमला मिरची, टोमॅटो, कांदा आणि बीट घाला. तयार होईल मसाला सॅण्डविच पाव. 

 

English
हिंदी सारांश
Web Title : Mumbai-style Masala Sandwich Pav: Quick, easy, and kid-friendly recipe at home.

Web Summary : Make Mumbai's popular Masala Sandwich Pav at home in minutes! This easy recipe uses pav instead of bread and is perfect for quick snacks or kids' tiffin. Customize with your favorite veggies and enjoy this flavorful street food delight.
टॅग्स :अन्नपाककृती