Lokmat Sakhi >Food > चमचमीत मसाला पाव खा, मुंबईच्या अस्सल स्ट्रीट फूडची मजाच न्यारी! पाहा टेस्टी मसाला पाव रेसिपी

चमचमीत मसाला पाव खा, मुंबईच्या अस्सल स्ट्रीट फूडची मजाच न्यारी! पाहा टेस्टी मसाला पाव रेसिपी

Mumbai street food masala pav: Masala pav recipe in 5 minutes: How to make spicy masala pav at home : स्ट्रीट स्टाइल फूड घरच्या घरी खावेसे वाटत असेल तर आपण मसाला पावची रेसिपी ट्राय करु शकतो. अगदी कमी साहित्यात आणि लगेच बनेल.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2025 09:05 IST2025-05-09T09:00:00+5:302025-05-09T09:05:02+5:30

Mumbai street food masala pav: Masala pav recipe in 5 minutes: How to make spicy masala pav at home : स्ट्रीट स्टाइल फूड घरच्या घरी खावेसे वाटत असेल तर आपण मसाला पावची रेसिपी ट्राय करु शकतो. अगदी कमी साहित्यात आणि लगेच बनेल.

how to make Mumbai street type spicy and tasty masala pav at home 5 minutes recipe with super tasty | चमचमीत मसाला पाव खा, मुंबईच्या अस्सल स्ट्रीट फूडची मजाच न्यारी! पाहा टेस्टी मसाला पाव रेसिपी

चमचमीत मसाला पाव खा, मुंबईच्या अस्सल स्ट्रीट फूडची मजाच न्यारी! पाहा टेस्टी मसाला पाव रेसिपी

सकाळच्या किंवा संध्याकाळच्या चहासोबत आपल्याला काही तरी टेस्टी खायची इच्छा होते.(Mumbai street food masala pav) ब्रेड बटर किंवा बिस्किट खाऊन आपल्याला कंटाळा येतो.(Masala pav recipe in 5 minutes) हल्ली मुंबईच्या स्ट्रीट फूडमध्ये सकाळच्या नाश्त्यात वेगवेगळे पदार्थ चाखायला मिळतात. (How to make spicy masala pav at home)
आपल्याला सतत काही तरी चटपटीत आणि चमचमीत खायला आवडत.(Easy Mumbai masala pav) अशावेळी तेच तेच पदार्थ खाऊन आपल्याला वैताग देखील येतो.(Street style masala pav at home) पण जर स्ट्रीट स्टाइल फूड घरच्या घरी खावेसे वाटत असेल तर आपण मसाला पावची रेसिपी ट्राय करु शकतो. अगदी कमी साहित्यात आणि लगेच बनेल. अगदी लहानांपासून- मोठ्यांपर्यंत सगळेच आवडीने खातील. (Indian street food recipes)

हिरव्या मुगाच्या डाळीचे वडे, कमी तेलातला कुरकुरीत पदार्थ! मुलांनाही खाऊ द्या पोटभर-ना तेलकट ना तळकट

साहित्य 
तेल - १ चमचा 
बटर - २ क्यूब 
जिरे - १ चमचा 
बारीक चिरलेला कांदा - १ वाटी 
बारीक चिरलेला लसूण - १ चमचा 
बारीक चिरलेली हिरवी मिरची - १ चमचा 
बारीक चिरलेली शिमला मिरची - १ वाटी 
बारीक चिरलेला टोमॅटो - १ वाटी  
काश्मिरी लाल पावडर - १ चमचा 
धणे पावडर - १ चमचा 
पाव भाजी मसाला - १ चमचा 
मीठ - चवीनुसार 
गरम मसाला - १ चमचा 
कसुरी मेथी - १ चमचा 
बारीक चिरलेली कोथिंबीर - आवश्यकतेनुसार 
पाव - २ 

">

कृती 

1. सगळ्यात आधी पॅन गरम करुन त्यात तेल आणि बटर वितळवून घ्या, त्यात जिरे घालून तडतडू द्या. 

2. आता कांदा, लसूण, हिरवी मिरचीसह इतर सर्व साहित्य घाला. व्यवस्थित शिजल्यानंतर मसाले घाला आणि चांगले एकजीव होऊ द्या. 

3. १० ते १५ मिनिटांत मसाला तयार होईल. यानंतर पावाला मध्यभागी अर्धा कट करुन घ्या. त्याला पॅनमधल्या भाजीवर उलटा ठेवून     चमच्याने दाबा ज्यामुळे भाजी त्याला व्यवस्थित चिकटेल. 

4. पाव बंद करुन पुन्हा एकदा नीट फ्राय करुन घ्या. ज्यामुळे मसला संपूर्ण पावाला व्यवस्थित चिकटेल. आता प्लेट मध्ये पाव काढून वरुन कांदा, कोथिंबीर आणि लिंबू पिळून सर्व्ह करा स्ट्रीट स्टाईल चमचमीत मसाला पाव. 

 

Web Title: how to make Mumbai street type spicy and tasty masala pav at home 5 minutes recipe with super tasty

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.