स्वयंपाकघरातील सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे आपले पीठ. भारतीय आहारात 'पोळी' किंवा 'चपाती' हा मुख्य घटक आहे. आजच्या धकाधकीच्या जीवनात आपले आरोग्य सर्वस्वी आपण काय खातो यावर अवलंबून असते. हल्ली बाजारात मिळणाऱ्या पिठाबाबत अनेकांना शंका वाटते.(multigrain flour) भेसळ, प्रक्रिया केलेले धान्य आणि पोषणमूल्य कमी झालेलं पीठ आरोग्यासाठी कितपत योग्य असेल असा प्रश्न कायम गृहिणींना पडत.(healthy flour alternatives) अशावेळी घरच्या घरी तयार केलेलं मल्टीग्रेन पीठ हा एक उत्तम आणि सुरक्षित पर्याय ठरु शकतो.(homemade multigrain flour) हे पीठ तयार करताना आपल्याला हवे ते धान्य वापरता येते. त्यामुळे आरोग्याची काळजी देखील चांगल्याप्रकारे राखता येते. मल्टीग्रेन पीठ म्हणजे वेगवेगळ्या धान्यांचं मिश्रण. गहू, ज्वारी, बाजरी, नाचणी, हरभरा डाळ, सोयाबीन, मूग डाळ किंवा ओट्स यांचा समावेश करून तयार केलेलं पीठ पचनासाठी हलकं आणि पोषणमूल्यांनी भरपूर असतं. हे पीठ नियमित वापरल्यास शरीराला आवश्यक फायबर, प्रथिने आणि खनिजे मिळतात. हे पीठ घरच्या घरी कसं तयार करायचं पाहूया.
फ्लॉवरच्या भाजीला आईच्या हातासारखी चव येत नाही? शिजवताना ५ चुका टाळा, फ्लॉवर लागेल चविष्ट
साहित्य
काळे चणे - ५०० ग्रॅमबार्ली - ५०० ग्रॅमबाजरी किंवा ज्वारी - ५०० ग्रॅम मका - २५० ग्रॅमसोयाबीन - २५० ग्रॅमगहू - १ किलो
कृती
1. सगळ्यात आधी आपल्याला सर्व धान्य वेगवेगळे करुन स्वच्छ करावे लागतील. त्यानंतर पाण्याने स्वच्छ धुवून २ ते ३ दिवस कडक उन्हात सुकवून घ्या. धान्याला ओलावा नसावा, नाही तर पीठ खराब होईल.
2. धान्य व्यवस्थित वाळल्यानंतर जाड कढईमध्ये चणे, सोयाबीन, बार्ली हलके भाजून घ्या. यामुळे त्यातील ओलावा निघून जाईल. यानंतर पीठ दळा.
3. मल्टीग्रेन पीठ हे खूप बारीक दळलेले नसावे. ते थोडे जाडसर ठेवा. जाडसर पीठात भरपूर फायबर असते, जे साखर नियंत्रणात ठेवण्यास मदत करते. वजन कमी करते.
4. घरी तयार केलेलं शुद्ध पीठ जास्त काळ साठवण्यासाठी पीठ नेहमी हवाबंद स्टीलच्या डब्यात किंवा काचेच्या डब्यात ठेवा. ओलाव्यापासून पीठाला वाचवण्यासाठी त्यात २ ते ३ वाळलेल्या सुक्या लाल मिरच्या किंवा कडुलिंबाची पाने घाला. मल्टीग्रेन पीठाच्या चपात्या थोड्या कडक होतात. पीठाला मऊ करण्यासाठी मळताना कोमट पाण्याचा वापर करा. मळल्यानंतर १५ ते २० मिनिटे पीठ झाकून ठेवा.
Web Summary : Avoid adulterated flour! Make healthy multigrain flour at home with grains like wheat, millet, and barley. This fiber-rich blend aids digestion, provides essential nutrients, and is easy to prepare, ensuring a healthier alternative to store-bought options. Store properly for lasting freshness.
Web Summary : मिलावटी आटे से बचें! घर पर गेहूं, बाजरा और जौ जैसे अनाजों से स्वस्थ मल्टीग्रेन आटा बनाएं। यह फाइबर युक्त मिश्रण पाचन में मदद करता है, आवश्यक पोषक तत्व प्रदान करता है, और बनाना आसान है, जो बाजार के विकल्पों से बेहतर है। ताजगी के लिए ठीक से स्टोर करें।