रोजचा वरण भात खाऊन कंटाळा आला की आपल्याला काही तरी नवीन खावसं वाटतं. तिची ती फिकी तुरीची डाळ खाल्ली की अपचनाचा देखील त्रास आपल्याला होतो.(Mughlai moong da) आपल्या स्वयंपाकघरात असे अनेक पदार्थ असतात ज्याला आपण आगळी-वेगळी टेस्ट देऊन त्यापासून वेगळं काही तरी करता येते. कडधान्य म्हटलं आपल्याला हिरवे मूग, मटकी आठवते. (green moong dal recipe)
आपण रोजच्या स्वयंपाकात हिरवी मुगाची डाळ साध्या फोडणीसह किंवा आमटीच्या स्वरूपातच जास्त खातो. पण हाच साधा, हलका आणि पौष्टिक पदार्थ जर मुघलाई पद्धतीने बनवला तर त्याची चव अक्षरशः शाही होते.(Mughlai dal recipe) मुघलाई मूग डाळ ही अशीच एक वेगळी आणि खास रेसिपी आहे, जी पाहुण्यांसाठी किंवा खास जेवणासाठी करुन पाहायला हवी. यासाठी लागणारे साहित्य आणि कृती पाहूया. (Indian dal recipes)
साहित्य
खडा मसाला
भिजवलेले हिरवे मूग - १ कप
तेल -४ चमचा
तूप - १ चमचा
जिरे - १ चमचा
बारीक चिरलेला कांदा - १ वाटी
आले-लसूण पेस्ट - १ चमचा
बारीक चिरलेली मिरची - २
हिंग - १ चमचा
हळद - १ चमचा
काश्मिरी लाल मिरची - १ चमचा
धने पावडर - १ चमचा
गरम पाणी - १ कप
दही - १ कप
उभा चिरलेला कांदा - १ कप
कसुरी मेथी - १ चमचा
क्रीम - १ चमचा
कृती
1. सगळ्यात आधी हिरवे मूग स्वच्छ धुवून भिजत घाला. यानंतर खडा मसाल्याची पोटली तयार करुन घ्या. कुकरमध्ये पाणी घालून त्यात हिरवे मूग आणि मसाल्याची पोटली घालून कुकरच्या ३ ते ४ शिट्ट्या करुन घ्या.
2. आता कढईमध्ये तेल आणि तूप घाला. त्यात जिरे, बारीक चिरलेला कांदा, आले-लसूण पेस्ट, मिरची घालून चांगेल परतवून घ्या.
3. यात वरुन हिंग, हळद, काश्मिरी लाल मिरची पावडर, धने पावडर घालून मसाला चांगला शिजू द्या. यानंतर त्यात फेटलेले दही घाला.
4. आता दुसऱ्या भांड्यात तेल गरम करुन त्यात कांदा चांगला तळून घ्या. तळलेला कांदा पसरवून घ्या. तयार मसाल्याला उकळी आल्यानंतर त्यात शिजवलेली मुगाची डाळ घाला. वरुन कपभर गरम पाणी घालून १० मिनिटे उकळी येण्यासाठी झाकून ठेवा.
5. वरुन तळलेले कांदा, कसुरी मेथी आणि क्रीम घाला. तयार होईल शाही मघुलाई हिरव्या मुगाची डाळ. भात किंवा लच्छा पराठासोबत आवडीने खा.
