पिझ्झा, पास्ता किंवा सॅन्डविच म्हटलं की तोंडात पाणी आणणारा घटक म्हणजे मोझरेला चीज. आपल्यापैकी बऱ्याचजणांच्या फ्रिजमध्ये चीज कायमच असतं. घरातील लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत चीज म्हणजे सगळ्यांचाच आवडीचा पदार्थ... इतकंच नाही तर पिझ्झा, पास्ता किंवा सॅन्डविचसारखे पदार्थ चीजशिवाय अपूर्णच आहेत. आपण शक्यतो बाजारांतून महागामोलाचे चीज विकत आणतो खरे... बाजारात मिळणारे मोझरेला चीज महागडे असतेच, शिवाय त्यात प्रिझर्व्हेटिव्हज आणि प्रोसेस्ड घटकही असतात(How to Make Mozzarella Cheese At Home).
चवीला अप्रतिम लागणारे हे मोझरेला चीज खिशाला थोडे महाग पडते अशावेळी विचार येतो की असे चीज घरच्याघरीच करता आले तर... मऊ, स्ट्रेची आणि चविष्ट मोझरेला चीज आपण अगदी घरच्याघरी, कमी खर्चात आणि शुद्ध पद्धतीने तयार करू शकता. केवळ २ पदार्थांचा वापर करून आपण घरच्याघरीच अगदी मार्केटसारखे चविष्ट आणि 'स्ट्रेची' चीज तयार करु शकता. सुप्रसिद्ध मास्टरशेफ पंकज भदौरिया यांनी इंस्टाग्राम पेजवरुन घरीच विकतसारखे महागडे मऊ, स्ट्रेची आणि चविष्ट मोझरेला चीज करण्याची सिक्रेट रेसिपी शेअर केली आहे. विकतसारखे महागडे, अप्रतिम चवीच मोझरेला चीज नेमके (Mozzarella Cheese Recipe) घरी कसं तयार करायचं पाहा...
मार्केटसारखे 'मोझरेला चीज' तयार करण्यासाठी...
घरीच विकतसारखे 'मोझरेला चीज' तयार करण्यासाठी आपल्याला २ लिटर म्हशीचे फुल्ल फॅट दूध (नेहमी साय असलेले म्हणजेच Full Cream/Raw Milk वापरा. पाश्चराईज्ड किंवा पाकीटबंद दूध वापरताना ते 'Ultra-Pasteurized' नसावे, अन्यथा चीज तयार होणार नाही.) ४ ते ५ मोठे चमचे व्हिनेगर किंवा लिंबाचा रस, चवीनुसार मीठ इतके साहित्य लागणार आहे.
कृती :-
१. दूध कोमट गरम करणे :- सर्वात आधी एका मोठ्या पातेल्यात दूध गरम करायला ठेवा. दूध खूप उकळायचे नाही. दूध फक्त कोमट गरम असावे की आपण त्यात सहज ७ सेकंदांसाठी बोट बुडवू शकू (साधारण ३२°C ते ४६°C).
२. दूध फाडण्याची प्रक्रिया:- आता गॅस बंद करा. दुधात थोडे-थोडे करून व्हिनेगर किंवा लिंबाचा रस घाला आणि चमच्याने हलक्या हाताने ढवळा. हळूहळू दूध फाटू लागेल आणि पनीरसारखे गोळे न होता एक चिकट असा पदार्थ तयार होईल. जोपर्यंत हिरवट - पिवळे पाणी वेगळे होत नाही, तोपर्यंत थोडे थोडे व्हिनेगर घालत राहा.
३. चीज एकत्रित करणे :- पाण्यातून तो चिकट पदार्थ हाताने एकत्र करून घट्ट गोळा तयार करा. त्यातील जास्तीचे पाणी पिळून काढा. हा गोळा आता एका रबरासारखा वाटेल.
कुरकुरीत आवरण आणि चटपटीत सारण, खमंग मटार कचोरी करण्याची रेसिपी, हिवाळा स्पेशल नाश्ता...
फक्कड मसाला चहा करण्याचं टपरीवाल्यांचं १ सिक्रेट, आलं-वेलची-चहामसाला, ‘असा’ करा मस्त चहा...
४. पॅनमध्ये शिजवणे :- एका पॅनमध्ये गाळून घेतलेलं चीज आणि चवीनुसार मीठ घालावे. ३ ते ४ मिनिटे हलकेच चमच्याने हलवून शिजवून घ्यावे. यामुळे चीज मऊ आणि लवचिक होते.
५. थंड पाण्यांत चीज घालणे :- शेवटी पुन्हा एकदा थंड पाण्यात हा गोळा टाका जेणेकरून त्याचा आकार टिकून राहील. यामुळे चीजला छान पदर सुटतात आणि ते मार्केटसारखे 'स्ट्रेची' होते.
६. सेट करणे :- तयार झालेला चीजचा गोळा एका प्लास्टिक रॅपमध्ये किंवा हवाबंद डब्यात गुंडाळून फ्रीजमध्ये २ ते ३ तास सेट होण्यासाठी ठेवा.
