Join us

शेवग्याची भाजी - सूप चाखून पाहिले, आता करा शेवग्याचे पौष्टिक लाडू - पाहा सोपी रेसिपी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2025 15:52 IST

How To Make Moringa Laddu : Moringa powder ladoo : Super healthy zero fat, no added sugar Moringa ladoo : शेवग्याचा पाला ते शेंगांपर्यंत सगळेच आपल्या आरोग्यासाठी हेल्दी असते, ट्राय करा ही पौष्टिक लाडूंची रेसिपी...

शेवग्याच्या शेंगां आणि पाल्यामध्ये अनेक पौष्टिक गुणधर्म असतात. शेवग्यात अँटी इंफ्लेमेटरी, अँटी डायबिटीक, अँटी बायोटिक, अँटी ऑक्सिडेंट, अँटी व्हायरल, अँटी एजिंग आणि अँटी फंगल गुणधर्म असतात. याव्यतिरिक्त यात व्हिटामीन 'ए' आणि 'सी' असते. अँटी ऑक्सिडेंट्सयुक्त गुणांनी परीपूर्ण शेवग्याचे अनेक पदार्थ तयार केले जातात. शेवगा (How To Make Moringa Laddu) इतका पौष्टिक आणि हेल्दी असतो की,घरातील (Moringa powder ladoo) लहानांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सगळ्यांच्याच आहारात शेवग्याचा समावेश करण्याचा सल्ला दिला जातो. परंतु काहीवेळा घरातील लहान मुलं किंवा मोठी मंडळी देखील शेवगा खायला नाक मुरडतात(Super healthy zero fat, no added sugar Moringa ladoo).

शेवग्याच्या शेंगांची भाजी, उसळ खायला नकोच म्हणतात अशावेळी आपण या शेवग्याच्या पाल्याचा वापर करुन पौष्टिक लाडू तयार करु शकतो. शेवग्याचा पाला आणि ड्रायफ्रुटस एकत्रित करुन आपण झटपट चविष्ट लाडू घरच्याघरीच तयार करु शकतो. हे उत्तम चवीचे लाडू करायला सोपे असल्याने झटपट तयार होतात तसेच यात शेवग्याच्या पाल्याची पावडर मिसळल्याने नकळतपणे शेवगा देखील खाल्ला जातो. यासाठीच, शेवग्याचा पाला वापरुनपौष्टिक लाडू कसे तयार करायचे याची रेसिपी पाहूयात.

साहित्य :- 

१. शेवग्याच्या पानांची पावडर - १ कप २. काजू - १/२ कप ३. बदाम - १/२ कप ४. भोपळ्याच्या बिया - १/२ कप ५. सूर्यफुलाच्या बिया - १/२ कप ६. अळशीच्या बिया - १/२ कप ७. सुकं खोबरं - १/२ कप (किसलेलं खोबरं)८. पिस्ता - १/२ कप ९. मनुका - १/२ कप १०. खजूर - १/२ कप ११. नाचणीचे पीठ - १ कप १२. साजूक तूप - १/२ कप 

शिळ्या चपातीची खुसखुशीत, खमंग बाकरवडी, चहासोबत खा आणि सांगा कशी मस्त लागली चव...

गुलकंद करण्याची पाहा पारंपरिक पद्धत, लालचुटूक गुलाबाचा गारेगार पदार्थ-उन्हाळ्यात आवश्यक थंडावा!

कृती :- 

१. सगळ्यांत आधी शेवग्याच्या पानांचा पाला स्वच्छ धुवून २ ते ३ दिवस उन्हांत वाळवून घ्यावा. मग हा सुकलेला पाला मिक्सरमध्ये वाटून त्याची बारीक पूड तयार करून घ्यावी. ही तयार पूड बारीक जाळीदार गाळणीतून २ ते ३ वेळा व्यवस्थित गाळून घ्यावी. आपण शेवग्याच्या पानांची रेडिमेड पावडर देखील वापरू शकता. २. एका पॅनमध्ये काजू, बदाम, भोपळ्याच्या बिया, सूर्यफुलाच्या बिया, अळशीच्या बिया, सुकं खोबरं, पिस्ता असे सगळ्या प्रकारचे ड्रायफ्रुटस घेऊन एकत्रित कोरडे भाजून घ्यावेत. ३ ते ५ मिनिटे हे सगळे ड्रायफ्रुटस हलकेच भाजून घेतल्यानंतर एका डिशमध्ये काढून थंड करून घ्यावेत. 

काळा आणि पिवळा गूळ माहितीये, ‘हे’ ६ प्रकारही पाहा! बघा आरोग्यासाठी कोणता गूळ खाणं आवश्यक...

३. थंड झालेले सगळे ड्रायफ्रुटस एका मिक्सर जारमध्ये ओतून त्यात मनुका, खजूर घालावेत. त्यानंतर हे सगळे मिश्रण एकत्रित मिक्सरमध्ये वाटून त्याची जाडसर भरड करून घ्यावी. ४. आता पॅनमध्ये नाचणीचे पीठ व शेवग्याच्या पानांची पावडर एकत्रित भाजून घ्यावी. ५. त्यानंतर एका मोठ्या डिशमध्ये भाजून घेतलेली दोन्ही पीठ आणि ड्रायफ्रुटसची भरड आणि साजूक तूप असे तिन्ही जिन्नस एकत्रित करून मळून घ्यावे. त्यानंतर हाताला तूप लावून त्याचे लाडू वळून घ्यावेत. 

शेवग्याच्या पानांची पावडर आणि ड्रायफ्रुटस यांचे पौष्टिक असे लाडू खाण्यासाठी तयार आहेत . हे लाडू आपण एका एअर टाईट कंटेनरमध्ये स्टोअर करून ठेवू शकता.

टॅग्स :अन्नपाककृती