चहा म्हणजे अनेकांच पहिलं प्रेमचं... सकाळच्या दिवसाची सुरुवात चहा प्यायल्याशिवाय सुरुच होत नाही. सकाळी फ्रेश वाटण्यासाठी आपल्यापैकी अनेक जण चहाचा एक घोट तरी घेतातच. अगदी नाक्यावर, ऑफिसमध्ये किंवा टपरीवर चहा आणि गप्पांची रंगत. (How to make milk ginger tea)
काहीच्या दिवसाची सुरुवात दुधाचा चहा होते, ज्यामध्ये चायपत्ती, आलं, साखर आणि वेलची किंवा चहा मसाला घातला जातो. (imple tips for tea making) परंतु, अनेकदा चहा बनवताना आपल्याकडून काही छोट्या चूका होतात ज्यामुळे चहा अगदी टपरीवाल्यासारखा किंवा फाइव्ह स्टार हॉटेलसारखा होतं नाही. (Ginger Tea Benefits for health) चहामध्ये योग्य पद्धतीने आले न घातल्यास चहा बिघडतो. अनेकांना चहामध्ये आलं कशाप्रकारे घालावं समजत नाही. ठेचून घालावं की, चिरुन घालावं असा प्रश्न त्यांना पडतो. चहामध्ये योग्य पद्धतीने आलं घातलं नाही तर चहा बनवण्याची पद्धत बिघडते. दुधाच्या चहामध्ये आले घालण्याची योग्य पद्धत कोणती पाहा.
उन्हाळ्यात बनवा वर्षभर टिकणारे खुसखुशीत तांदळाचे कुरकुरे, टेस्टी आणि चटपटीत
1. दुधात आले घालण्याची योग्य पद्धत
दुधाच्या चहामध्ये आले घालण्याची योग्य पद्धत म्हणजे जो ठेचून किंवा कुस्करून घाला. जेव्हा आलं ठेचून घालाल तेव्हा त्याचा रस निघेल. गॅसवर पाणी ठेवून त्यात चहाची पाने, १-२ वेलची आणि त्यात काढलेल्या आल्याचा रस घाला. उकळी आल्यानंतर दूध घाला. साखरेचे प्रमाण व्यस्थित घालून चहा चांगला उकळवा. तयार होईल, टपरीवरचा आल्याचा चहा.
2. आल्याचा चहा पिण्याचे फायदे
आल्यामध्ये दाहक-विरोधी गुणधर्म अधिक प्रमाणात आहे. यामुळे शरीराला अनेक फायदा होतो. आल्याचा चहा प्यायल्याने शरीराला अँटी-ऑक्सिडंट्स मिळते.
दुधासोबत आल्याचा चहा प्यायल्यानं पोटफुगीसारख्या समस्या दूर होतात.
डोकेदुखी किंवा स्नायूंच्या दुखण्यापासून आराम मिळवण्यासाठी आल्याच्या दुधाचा चहा पिऊ शकता.
हा चहा प्यायल्यानं रक्तदाब कमी होतो. शरीरातील जळजळ कमी होते.
उलट्या किंवा पोटात बिघाड झाल्यावर आल्याचा चहा बहुगुणी ठरतो.
3. रिकाम्या पोटी पिऊ नका चहा
बरेचदा आपण रिकाम्या पोटी दुधाचा चहा पितात ज्यामुळे आपल्याला अनेक आजार बळवातात. रिकाम्या पोटी चहा प्यायल्याने पचनसंस्थेला त्रास होऊ शकतो. ज्यामुळे पोटफुगी आणि आम्लता होते. त्यासाठी सकाळी उठल्याबरोबर रिकाम्या पोटी चहा पिऊ नका. त्याआधी नाश्ता करा. जर तुम्हाला चहा टाळता येतं नसेल तर सकाळी कोमट पाणी प्या. यामध्ये मेथी दाणे, जिरे, चिया सीड्स किंवा बडीशेपचे पाणी पिऊ शकता. यामुळे शरीराला डिटॉक्सिफाय करते. पचनसंस्था सुरळीत करुन वजन कमी होण्यास मदत होते.