डोसा म्हटलं की आपल्या समोर प्रश्न असतो की पारंपरिक पद्धतीने तयार केलेलं बॅटर. उडदाची डाळ आणि तांदूळ भिजवून, वाटून, रात्रभर आंबवून मग सकाळी डोसा बनवण्याची तयारी.(Crispy dosa recipe) ही पद्धत चविष्ट आणि पौष्टिक असली खूप वेळखाऊ असते. यासाठी लागणारी मेहनत आणि प्लानिंग काही वेगळी. (Quick breakfast recipes)
अनेकजण झटपट रव्याचा डोसा बनवतात. पण यासाठी देखील दही-सोडा-इनो यांसारख्या गोष्टी लागतात. त्यात सकाळचा नाश्ता आपल्याला हेल्दी आणि पौष्टिक हवा असतो. सकाळच्या गडबडीत आंबवलेलं बॅटर तयार ठेवणं प्रत्येक वेळी शक्य नसतं.(Masoor dal dosa recipe) पण आंबवण नाही, दही नाही, सोडा नाही… तरीही क्रिस्पी, चविष्ट डोसा कसा बनवायचा?(Protein-rich dosa) पण मसूर डाळीपासून आपण झटपट १० मिनिटांत कुरकुरीत डोसा बनवू शकतो. हा डोसा बनवण्यासाठी काही सोप्या टिप्स लक्षात ठेवाव्या लागतील, पाहूया सोपी कृती.
५०० रुपयांची मल्टिव्हिटामिन पावडर नको, फक्त १०० रुपयांत घरी करा महिनाभर पुरणारी पावडर, पाहा रेसिपी
साहित्य
मसूर डाळ - १ कप
मुगाची डाळ - १/३ कप
ओट्स - १/२ कप
आलं - १ इंच
हिरव्या मिरच्या - ३
जिरे - १ चमचा
बीटाचा तुकडा
मीठ - चवीनुसार
तेल - आवश्यकतेनुसार
कृती
1. सगळ्यात आधी मसूर डाळ आणि मुगाची डाळ व्यवस्थित स्वच्छ करुन दोन पाण्याने धुवून घ्या. पाणी घालून १ तास भिजत घाला. त्यानंतर ओट्स १० मिनिटे भिजवून घ्या. भिजवलेलं सर्व साहित्य एकत्र करा.
2. आता मिक्सरच्या भांड्यात भिजवलेली मसूर डाळ, मुगाची डाळ आणि ओट्स घाला. त्यात आलं, हिरव्या मिरच्या, जिरे, बीटाचा तुकडा आणि मीठ घालून त्याचे बॅटर तयार करा.
3. तवा व्यवस्थित गरम करुन त्यावर बॅटर पसरवून घ्या. तेल लावून घ्या. तयार होईल कुरकुरीत मसूर डाळीचा डोसा.
