Join us
Daily Top 2Weekly Top 5

रवि नको की घुसळणं नको मिक्सरमध्ये करा मसाला ताक-पाहा झटपट आयडिया-मठ्ठाही होईल खास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2026 09:30 IST

Masala chaas recipe: Buttermilk recipe: Summer drinks India: ताक बनवण्यासाठी लागणारे साहित्य आणि कृती पाहूया.

उन्हाळा सुरु झाला की आपल्याला सतत डिहायड्रेशन, अपचन आणि गॅसेसची समस्या होऊ लागते. उन्हामुळे घसा कोरडा पडतो, घामामुळे शरीरातील पाणी कमी होते. अशावेळी आपल्याला सतत काही तरी थंड प्यावं वाटतं. (Masala chaas recipe) बाजारात मिळणारी शीतपेये शरीराला क्षणिक थंडावा देतात खरी पण ती आरोग्यासाठी तितकीच घातक असतात.(Healthy digestive drinks) अशावेळी आपण पितो ते मसाला ताक. जे आपल्या शरीरासाठी अमृत आहे. ताक पिण्याने तहान भागत नाही तर आपल्या शरीरातील उष्णता हळूहळू कमी होते. (Buttermilk recipe)घरच्याघरी विकतसारखं परफेक्ट ताक बनवणं एकदम सोपं आहे. घरी उपलब्ध असणाऱ्या साहित्यापासून आपण मिनिटांत ताक बनवू शकतो. हे मसाला ताक बनवण्यासाठी आपल्याला रवी किंवा घुसळण्याची गरज नाही. मिक्सरच्या भांड्यात लगेच तयार होईल. काही सोप्या स्टेप्स फॉलो कराव्या लागतील. या पद्धतीने ताक बनवल्यास आपण दिवसभर एनर्जेटिक राहू आणि चवही छान लागेल. हे ताक बनवण्यासाठी लागणारे साहित्य आणि कृती पाहूया. 

५०० रुपयांत समर स्पेशल कुर्ता- पॅन्टचे सुंदर पर्याय; लूक साधा-दिसाल कूल

साहित्य 

दही - १ कपकोथिंबीर - अर्धा कप पुदीन्याची पानं- अर्धा कप हिरवी मिरची - १ आलं - १ इंच काळं मीठ - १ चमचा थंड पाणी - अर्धा कप साखर - चवीनुसार बर्फाचे तुकडे 

कृती 

1. सगळ्यात आधी मिक्सरच्या भांड्यात दही घाला. त्यानंतर कोथिंबीर, पुदीन्याची पाने, हिरवी मिरची, आलं, काळं मीठ आणि पाणी घालून सर्व साहित्य नीट वाटून घ्या. 

2. आता वाटलेले मिश्रण चमच्याने तपासून घ्या. माठामध्ये किंवा भांड्यात मिक्सरमध्ये वाटलेले सर्व साहित्य घाला. त्यात बर्फाचे तुकडे घालून वर-खाली करा. ताक ग्लासात ओतल्यानंतर वरून थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि चिमूटभर जिरे पूड टाका. हवं असल्यास बर्फाचे खडे घालून थंडगार सर्व्ह करा.

ताक पिण्याचे फायदे

ताकातील प्रोबायोटिक्स पचनसंस्था मजबूत करतात. जिरे आणि आल्यामुळे गॅस आणि अपचनाचा त्रास कमी होतो. ताक आपल्या शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यास मदत करते. उन्हाळ्यात डिहायड्रेशनची समस्या टाळण्यासाठी आणि शरीराचे तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी ताक हा चांगला पर्याय आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Make Masala Chaas in a Mixer: Quick, Easy, and Delicious!

Web Summary : Beat the heat with homemade masala chaas! This refreshing drink, made easily in a mixer, aids digestion and prevents dehydration. A blend of yogurt, herbs, spices, and water creates a cooling and flavorful beverage, perfect for summer.
टॅग्स :अन्नपाककृतीसमर स्पेशल