Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Food > अस्सल आजीच्या हातची चव, ‘असं’ घाला पारंपरिक पद्धतीचे झणझणीत कैरीचं लोणचं-वर्षभर मुरेल मस्त

अस्सल आजीच्या हातची चव, ‘असं’ घाला पारंपरिक पद्धतीचे झणझणीत कैरीचं लोणचं-वर्षभर मुरेल मस्त

Traditional Maharashtrian Loncha recipe: Spicy Raw Mango Pickle: भरलेल्या कैरीचे लोणचं कसं करायचं पाहूया.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2026 12:34 IST2026-03-26T12:33:15+5:302026-03-26T12:34:12+5:30

Traditional Maharashtrian Loncha recipe: Spicy Raw Mango Pickle: भरलेल्या कैरीचे लोणचं कसं करायचं पाहूया.

How to make mango pickle at home step by step, Grandmother's secret mango pickle recipe, How to store mango pickle for a year, Best spices for mango pickle, | अस्सल आजीच्या हातची चव, ‘असं’ घाला पारंपरिक पद्धतीचे झणझणीत कैरीचं लोणचं-वर्षभर मुरेल मस्त

अस्सल आजीच्या हातची चव, ‘असं’ घाला पारंपरिक पद्धतीचे झणझणीत कैरीचं लोणचं-वर्षभर मुरेल मस्त

उन्हाळा सुरु झाला की सगळ्यात आधी आपण वाळवणाचे पदार्थ करण्यास घेतो. प्रत्येक घरात एक वेगळीच लगबग सुरु होते. ती म्हणजे वर्षभराचं लोणचं घालण्याची.(Traditional Mango Pickle Recipe) कैरीच्या अनेक प्रकारच्या लोणच्यांमध्ये 'भरलेली बाळ कैरी' किंवा 'आखीव कैरीचं लोणचं' हे सर्वांत जास्त आवडीनं खाल्लं जातं. लहान आकाराच्या कैऱ्या दिसायला जेवढ्या मोहक असतात, तेवढ्याच त्या चवीला चटपटीत लागतात.
या पारंपरिक पद्धतीत लहान कैऱ्या न कापता त्यांना मधून चिरा देऊन त्यात घरगुती मसाल्यांचे सारण भरले जाते.(Tips to prevent fungus in pickle) हे लोणचं वर्षभर टिकवण्यासाठी काही खास युक्त्या वापरल्या जातात, ज्यामुळे कैरी मऊ पडत नाही आणि लोणच्याला बुरशीही लागत नाही.(Authentic Indian Pickle) गरम वरण-भात असो किंवा मऊ लुसलुशीत पोळी, या भरलेल्या कैरीचा एक तुकडा जेवणाची चव शंभर पटीने वाढवतो. भरलेल्या कैरीचे लोणचं कसं करायचं पाहूया. (How to make mango pickle at home step by step)

उंच मुलींसाठी ५ ब्लाऊज डिझाइन्स-साडी नेसली की मिळेल एकदम दीपिका-कतरिनासारखा स्टायलिश हॉट लूक

साहित्य 

लहान कैऱ्या - १ किलो
जाडे मीठ - १ किलो
लाल तिखट - १ वाटी 
हिंग - १ छोटी वाटी 
लोणचे मसाला - १ छोटी वाटी 
तेल - १ मोठी वाटी 

कृती 

1. सगळ्यात आधी कैरी दोन पाण्याने स्वच्छ धुवून सुकवून घ्या. नंतर कैरीचे मध्यभागी चार भाग करा. त्यातील बिया काढून घ्या. 

2. यानंतर एका भांड्यात सर्व कैऱ्या पसरवून घ्या. वरुन त्यात मीठ घालून चार ते पाच दिवस झाकून ठेवा. पाच दिवसानंतर कैरीचा रंग बदलेला असेल आणि मीठाचे पाणी झालं असेल. ते पाणी गाळून बाजूला ठेवा. 

3. आता कढईमध्ये लाल तिखट भाजून घ्या. त्यात हिंग आणि लोणचे मसाला घाला आणि पुन्हा भाजून घ्या. दुसऱ्या कढईमध्ये तेल गरम करा. भाजलेल्या मसाल्यामध्ये थोडेसे तेल आणि मीठाचे थोडेसे पाणी घालून पुन्हा व्यवस्थित एकजीव करा. 

4. यानंतर तयार मसाला कैरीमध्ये भरा. काचेच्या बरणीमध्ये मसाला लावलेल्या कैरी ठेवा. वरुन तेल घाला त्यात थोडे मीठाचे पाणी घाला. पुन्हा कैरी ठेवा आणि वरुन पुन्हा तेल घाला. वरुन सुती कापड लावून हे लोणचं उन्हात मुरण्यासाठी ठेवा. लोणचं व्यवस्थित झाल्यानंतर खा. 

 


Web Title : असली दादी माँ के हाथ का आम का अचार: मसालेदार, चटपटा और लंबे समय तक चलने वाला

Web Summary : पारंपरिक भरलेली बाल कैरी का अचार बनाएं। छोटे आमों को घर के बने मसालों से भरें। फंगस को रोकने और उन्हें कुरकुरा रखने के लिए सुझावों का उपयोग करें। इस मसालेदार, चटपटे अचार का साल भर भोजन के साथ आनंद लें।

Web Title : Authentic Grandma's Mango Pickle Recipe: Spicy, Tangy, and Long-Lasting

Web Summary : Make traditional Bharleli BaaL Kairi pickle. Fill small mangoes with homemade spices. Use tips to prevent fungus and keep them crisp. Enjoy this spicy, tangy delight with meals all year.