Lokmat Sakhi >Food > पारंपरिक पद्धतीच्या करा आंबा-नारळाच्या वड्या,चविष्ट गोडाचा पदार्थ, १० दिवस टिकणारी आंबा बर्फी

पारंपरिक पद्धतीच्या करा आंबा-नारळाच्या वड्या,चविष्ट गोडाचा पदार्थ, १० दिवस टिकणारी आंबा बर्फी

Amba Naral Barfi recipe: Mango coconut barfi: Maharashtrian sweet recipe:महाराष्ट्रातील पारंपरिक पदार्थ मँगो-कोकोनट बर्फी घरी कशी बनवायची पाहूया.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2025 09:05 IST2025-05-05T09:00:00+5:302025-05-05T09:05:01+5:30

Amba Naral Barfi recipe: Mango coconut barfi: Maharashtrian sweet recipe:महाराष्ट्रातील पारंपरिक पदार्थ मँगो-कोकोनट बर्फी घरी कशी बनवायची पाहूया.

how to make Maharashtrian traditional recipe mango coconut barfi sweet dish Amba Naral Barfi Recipe store in 10 days | पारंपरिक पद्धतीच्या करा आंबा-नारळाच्या वड्या,चविष्ट गोडाचा पदार्थ, १० दिवस टिकणारी आंबा बर्फी

पारंपरिक पद्धतीच्या करा आंबा-नारळाच्या वड्या,चविष्ट गोडाचा पदार्थ, १० दिवस टिकणारी आंबा बर्फी

आंब्याचा मौसम आला की, घराघरात विविध पदार्थांच्या चवी चाखायला मिळतात.(Maharashtrian mango coconut sweet) आमरस, आंब्याचा केक, पन्ह, चटणी, सांदण, पोळी, लाडू आणि बर्फी. कोकणतील भागात आंबा, फणस, कैरी आणि नारळ प्रसिद्ध आहे.(Indian mango coconut fudge) या भागात उन्हाळ्यात जेवणाची चव नारळ आणि आंब्याशिवाय अपूर्णच.(Amba Naral Barfi recipe)
भारतात प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या पदार्थांची चव चाखली जाते.(Mango coconut barfi) मेन कोर्स, स्नॅक्स, ब्रेकफार्स्ट, स्वीट डिश यांसारखे पदार्थ खाल्ले जातात. पण महाराष्ट्रात जेवल्यानंतर गोडाचे पदार्थ खाण्याची सवय अनेकांना आहे. गोडाचे पदार्थ अनेकांना आवडतात.(Maharashtrian sweet recipe) त्यासाठी पारंपरिक नारळाची वडी आपण खाल्ली असेलच पण त्याला वेगळा ट्विस्ट देण्यासाठी आपण त्यात आंब्याचा गर घालून त्याची चव आणखी वाढवू शकतो.(Traditional mango barfi) यंदाच्या उन्हाळ्यात आंबा-नारळाच्या वड्या करुन पाहा. बनवायला अगदी सोप्या आणि चविष्ट आहेत. आठवडाभर राहतील. पाहूया १० दिवस टिकणारी चविष्ट आंबा- नारळाच्या वड्यांची रेसिपी (Barfi recipe that lasts 10 days)

आता घरच्या घरी करा 'रागी चोकोस पफ', हेल्दी आणि पौष्टिक पदार्थ, विकतपेक्षा भारी चव


साहित्य 

डेसिकेटेड कोकोनट- २ कप 
साखर - १/२ कप 
आंब्याचा गर- दिड कप 
फुल्ल क्रीम दूध- १ लिटर   

">

कृती 

1. सगळ्यात आधी पॅनमध्ये दूधाल उकळी येईपर्यंत गरम करा. त्यानंतर मंद आचेवर सतत दूध ढवळत राहा. दूध अर्ध्या प्रमाणात कमी होईपर्यंत शिजवून घट्ट करा. 

2. आता कढईमध्ये मंद आचेवर आंब्याचा गर घट्ट होईपर्यंत ढवळत राहा. गॅस बंद करुन बाजूला ठेवा. 

3. मिक्सच्या भांड्यात खोबर आणि कपभर दूध घालून वाटून घ्या. यानंतर दूधाच्या मिक्षणात साखर घालून चांगली विरघळून घ्या. त्यात वाटलेल्या नारळाचे मिश्रण घाला. चांगले शिजवून मिश्रण तयार करा. 

4. यामध्ये शिजवलेल्या आंब्याचा गर घालून मिश्रण मंद आचेवर एकजीव करा. चांगले परतून गोळा घट्ट होईपर्यंत एकत्र करा. गॅस बंद करा. 

5. ताटात बटर पेपर घेऊन त्यावर तूप लावून घ्या. मिश्रण त्यावर चांगले परसवून घ्या. हाताने दाबून सेट होण्यास ठेवा. त्यावर चांदीचा वर्ख लावू शकता. वड्या कापून घ्या. तयार होईल कोकोनट-मँगो बर्फी. 

6. फ्रीजमध्ये ७ ते ८ दिवस टिकण्यासाठी हवा बंद डब्यामध्ये भरून ठेवा. 
 

Web Title: how to make Maharashtrian traditional recipe mango coconut barfi sweet dish Amba Naral Barfi Recipe store in 10 days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.