Join us

अस्सल मराठी चवीचा पारंपरिक मसालेभात तर गुढी पाडव्याला हवाच, तर ही घ्या रेसिपी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2023 13:42 IST

How To Make Maharashtrian Masala Bhat : Recipe : गुढीपाडवा साजरा करताना अस्सल मराठी म्हणून ओळखले जाणारे पदार्थ तर ताटात हवेच.

'मसालेभात' हा आपल्यापैकी बऱ्याचजणांचा आवडता पदार्थ आहे. 'मसालेभाताचे' नुसते नाव जरी काढले तरी अनेकांच्या तोंडाला पाणी सुटत. पूर्वीच्या काळी लग्नसमारंभ, सण, काही खास प्रसंग असला की जेवणाच्या पंगतीत 'मसालेभात' आवर्जून केला जायचा. मसालेभात हा एक पारंपरिक चविष्ट महाराष्ट्रीयन पदार्थ आहे. महाराष्ट्रीयन मसाले भात हा एक प्रकारचा पुलावच असतो. आपल्या पारंपरिक मसालेभाताला महाराष्ट्रीयन स्थान आहे. 

गुढीपाडवा महाराष्ट्रात मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. कारण या सणापासून मराठी नववर्षाची सुरूवात होते. त्यामुळे घराची सजावट करून, गुढी उभारून, गुढीपाडव्यासाठी रांगोळी काढून, नटून थटून नववर्षाचं स्वागत करण्याची पद्धत आहे. गुढीपाडव्याला खास महाराष्ट्रीयन पदार्थांचा बेतही आखला जातो. महाराष्ट्रीयन पदार्थांचा बेत म्हटलं की त्यात श्रीखंडपुरी, खीरपुरी, बासुंदीपुरी, भाजीपुरी, पुरणपोळी, मसालेभात, कोशिंबीर, विविध प्रकारच्या चटण्या, लोणची, पापड, कोथिंबीर व अळूच्या वड्या, बटाटवडे यांचा समावेश असतो. यंदा गुढीपाडवा साजरा करण्यासाठी काही खास महाराष्ट्रीयन खाद्यपदार्थ घरी आवर्जून करायलाच हवेत(How To Make Maharashtrian Masala Bhat).

साहित्य :- 

१. तेल - ३ ते ४ टेबलस्पून २. मोहरी - १ टेबलस्पून ३. जिरं - १ टेबलस्पून ४. हिंग - चिमूटभर ५. कढीपत्ता - ५ ते ६ पानं ६. दालचिनी - २ ते ३ काड्या ७. तमालपत्र - १ ते २ पान ८. लवंग - ५ ते ६ ८. काळीमिरी - ५ ते ६ ९. कांदा - १ कप १०. हिरव्या मिरच्या - २ ते ३ (बारीक चिरून घेतलेल्या)११. गाजर - १ कप (उभे चिरुन घेतलेले)१२. आलं - लसूण पेस्ट - १ टेबलस्पून १३. तोंडली - १ कप (उभी चिरुन घेतलेले)   १४. बटाटे - १ कप १५. फ्लॉवर - १ कप १६. टोमॅटो - १ कप १७. हिरवे मटार - १ कप १८. हळद - १/२ टेबलस्पून १९. मिठ - चवीनुसार २०. लाल मिरची पावडर - १ टेबलस्पून २१. बासमती तांदूळ - २ ते ३ कप २२. गरम पाणी - २ ते ३ कप २३. कोथिंबीर - १ टेबलस्पून (बारीक चिरुन घेतलेली)२४. खोबर - १ ते २ टेबलस्पून २५. लिंबाचा रस - २ टेबलस्पून २६. काजू - ७ ते ८ २८. काळी वेलची - १२९. गोडा मसाला - १ टेबलस्पून 

कृती :- 

१. एका भांड्यात तेल घेऊन त्यात जिरे, मोहरी, कढीपत्ता, हिंग, दालचिनी, काळी वेलची, काळीमिरी, लवंग, तमालपत्र, काजू घालून घ्यावेत. २. त्यानंतर त्यात उभा चिरलेला कांदा, आलं - लसूण पेस्ट, हिरवी मिरची, गाजराचे उभे चिरलेले काप, फ्लॉवरचे तुकडे, तोंडली घालून सगळे जिन्नस एकजीव करुन घ्यावेत. ३. आता या मिश्रणांत हळद, लाल मिरची पावडर, हिरवे मटार, टोमॅटो घालून घ्यावेत. आता या भांड्यावर झाकण ठेवून या सर्व भाज्या थोडा वेळ वाफेवर शिजवून घ्याव्यात.     

अजिबात पाणी न सुटलेली काकडीची परफेक्ट कोशिंबिर उन्हाळ्यात ताटात हवीच, पाहा कूल रेसिपी..

४. भाज्या थोड्या शिजवून घेतल्यानंतर त्यात हळद, लाल मिरची पावडर, गोडा मसाला, चवीनुसार मीठ घालून घ्यावे. ५. मसालेभाताचा सगळा मसाला तयार झाल्यावर आता त्यात तांदूळ घालावा. तांदूळ घातल्यानंतर भाज्यांचा मसाला व तांदूळ एकजीव करुन घ्यावे. सर्व जिन्नस एकत्रित करुन झाल्यानंतर त्यात २ ते ३ कप गरम पाणी घालावे. 

गुढी पाडवा स्पेशल : बुंदी न पाडता, तूप न घालता झटपट करा मोतीचूराचे लाडू, खास रेसिपी...

६. आता गॅस मंद आचेवर ठेवून गॅसवर एक खोलगट तवा ठेवावा. त्या तव्यांवर मसाले भाताचे पातेले ठेवून ते पातेले झाकून ठेवावे. ७. भात संपूर्णपणे शिजल्यानंतर त्यावरुन थोडाशी कोथिंबीर, किसलेलं खोबर भुरभुरवून घ्यावे व लिंबाचा रस चमच्याने घालावा. 

आपला पारंपरिक मसालेभात खाण्यासाठी तयार आहे. दही व काकडीची कोशिंबीर, पापड, मठ्ठा, लोणचं यांसोबत आपण हा मसालेभात सर्व्ह करु शकता.

टॅग्स :अन्नपाककृती