सध्याच्या बिझी आणि फास्ट लाईफस्टाईलमध्ये, झटपट आणि इन्स्टंट होणारे पदार्थ मोठ्या आवडीने खाल्ले जातात. अगदी झटपट आणि इन्स्टंट होणाऱ्या पदार्थांमध्ये मॅकरोनी पास्ता हा एक खास पदार्थ... घरातील लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच मॅकरोनी पास्ता खायला खूपच आवडतो. परंतु पास्ता करायचा म्हटलं की खूप मोठा घाट घालावा लागतो. पास्ता उकळण्यापासून तो तयार करेपर्यंतची प्रक्रिया थोडी मोठी असते. पास्ता उकळणे, तो गाळणे आणि मग मसाला तयार करणे यात बराच वेळ जातो. अशावेळी आपण एक सोपी आणि इन्स्टंट ट्रिक वापरून प्रेशर कुकरमध्ये फक्त २ शिट्ट्यांमध्येच इटालियन स्टाईल पास्ता तयार करू शकतो(how to make macaroni pasta in pressure cooker).
कुकरमध्ये बनवलेला 'वन पॉट पास्ता' अधिक चविष्ट लागतो कारण त्यात सर्व मसाले पास्त्यामध्ये नीट मुरतात. कुकरच्या एका शिट्टीत परफेक्ट टेक्सचर असलेला मॅकरोनी पास्ता करणे म्हणजे आता फक्त काही मिनिटभराचेच काम...प्रेशर कुकरची ही इन्स्टंट ट्रिक वापरून कमी वेळात, फारशी मेहेनत न घेता, घरातील उपलब्ध साहित्यात घाईच्या वेळीही (macaroni pasta in pressure cooker Indian style) चविष्ट पास्ता तयार करता येतो. चवीला अप्रतिम (macaroni pasta in cooker recipe) आणि वेळेची बचत करणारा हा इन्स्टंट मॅकरोनी पास्ता कसा तयार करायचा याची सोपी रेसिपी पाहूयात...
साहित्य :-
१. मॅकरोनी पास्ता - १ कप २. तेल - २ ते ३ टेबलस्पून ३. लसूण - १ टेबलस्पून (बारीक चिरलेला)४. कांदा - १ कप (बारीक चिरलेला)५. आलं - १ टेबलस्पून (बारीक चिरलेलं)६. हिरव्या मिरच्या - २ (बारीक चिरलेल्या)७. टोमटो - १ कप (बारीक चिरलेला)८. ढोबळी मिरची - १ कप ९. गाजर - १/२ कप १०. काश्मिरी लाल मिरची पावडर - १ टेबलस्पून ११. धणेपूड - १/२ टेबलस्पून १२. हळद - १/२ टेबलस्पून १३. लाल तिखट मसाला - १ टेबलस्पून १४. जिरेपूड - १/२ टेबलस्पून १५. गरम मसाला - १ टेबलस्पून १६. काळीमिरी पूड - १ टेबलस्पून १७. साखर - चिमूटभर१८. बटर - २ टेबलस्पून १९. चीझ - २ ते ३ स्लाइस २०. पाणी - २ कप २१. मॅगी मसाला - १ टेबलस्पून
टपरीवर मिळतो अगदी तसाच चहा करण्याची रेसिपी! दूध आणि पाण्याचे अचूक प्रमाण - चहा होईल परफेक्ट...
वाटीभर दलियाचा करा मस्त कुरकुरीत डोसा-वजनही घटेल आणि खाऊन पोटही भरेल आनंदाने-पाहा रेसिपी...
कृती :-
१. प्रेशर कुकरमध्ये तेल घेऊन त्यात बारीक चिरलेला लसूण, कांदा, आलं, हिरव्या मिरच्या, टोमॅटो, ढोबळी मिरची, गाजर अशा सगळ्या भाज्या घालून तेलात खमंग परतवून घ्याव्यात. २. त्यानंतर या मिश्रणात काश्मिरी लाल मिरची पावडर, धणेपूड, हळद, लाल तिखट मसाला, जिरेपूड, गरम मसाला, काळीमिरी पूड, मॅगी मसाला, साखर घालावी.
३. सगळे मिश्रण चमच्याने कालवून एकजीव करून घ्यावे. मग यात बटर, मॅकरोनी पास्ता आणि पाणी घालावे. कुकरचे झाकण लावून २ शिट्ट्या कराव्यात. ४. मग थोड्या वेळाने कुकरचे झाकण उघडून त्यावर चीझ किसून किंवा चीझ स्लाइस घालावे व पुन्हा २ मिनिटांसाठी कुकरचे झाकण बंद करावे.
कुकरच्या फक्त २ शिट्यांमध्ये झटपट असा गरमागरम इटालियन चवीचा इन्स्टंट मॅकरोनी पास्ता खाण्यासाठी तयार आहे.
Web Summary : Make Italian-style macaroni pasta quickly in a pressure cooker with this easy recipe. This one-pot method intensifies flavors, offering a restaurant-quality dish in minutes. Perfect for busy lifestyles, it's a simple way to enjoy delicious pasta at home.
Web Summary : इस आसान रेसिपी से प्रेशर कुकर में झटपट इटैलियन-शैली का मैकरोनी पास्ता बनाएं। यह वन-पॉट विधि स्वाद को तीव्र करती है, जिससे मिनटों में रेस्टोरेंट जैसा व्यंजन मिलता है। व्यस्त जीवनशैली के लिए बिल्कुल सही, यह घर पर स्वादिष्ट पास्ता का आनंद लेने का एक सरल तरीका है।