Join us

जंक फूड खाल्ल्याने वजन वाढतं? फिकर नॉट! खा वेट लॉस ब्रेड पिझ्झा, झटपट ब्रेकफास्ट रेसिपी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2025 14:49 IST

Weight-loss bread pizza: Low-calorie bread pizza: Healthy bread pizza recipe: आपण घरगुती पद्धतीने बनवलेला पिझ्झा आपले आरोग्य निरोगी राखू शकते. यामध्ये आपण लो फॅट चीज आणि भरपूर भाज्यांचे टॉपिंग करु शकतो. पाहूया सोपी रेसिपी

हल्ली पिझ्झा-बर्गर लहानांपासून मोठ्यांना प्रत्येकाला खायला आवडतो.(Weight-loss bread pizza) रस्त्याच्या कडेला किंवा एखाद्या कॅफेमध्ये भरभरुन चिज घातलेला पिझ्झा आणि बर्गरची चव चाखयला मिळते.(Low-calorie bread pizza) परंतु, वजन कमी करणाऱ्या किंवा डाएट करणाऱ्या लोकांना सतत जंक फूड खाता येत नाही. मैद्याच्या पदार्थांमुळे वजनही भरभर वाढते. (Bread pizza for dieting)वजन कमी करण्यासाठी आपण आहारात असे अनेक पदार्थ खातो ज्यामुळे ते नियंत्रणात राहते.(Low-fat bread pizza idea) वजन कमी करणाऱ्यांसाठी पिझ्झा खाणं थोड अवघड असतं पण योग्य साहित्य आणि प्रमाणात सेवन केल्यास ते आरोग्यदायी ठरु शकतं.(Diet-friendly pizza alternatives) पिझ्झामध्ये जास्त फॅट, चीज आणि मैद्याचा वापर केला जातो. परंतु आपण घरगुती पद्धतीने बनवलेला पिझ्झा आपले आरोग्य निरोगी राखू शकते.(Guilt-free snack recipes) यामध्ये आपण लो फॅट चीज आणि भरपूर भाज्यांचे टॉपिंग करु शकतो, पाहूया सोपी रेसिपी.(Healthy comfort-food hacks)

साऊथ इंडियन पदार्थातील खास पारंपरिक पदार्थ 'काकडीची तांबळी', भातासोबत खा चवीने सार, पहा रेसिपी

साहित्य 

मल्टीग्रेन ब्रेड स्लाइस - २ ते ३ पिझ्झा सॉस टोमॅटो सॉसमशरुमचे तुकडे - १ ते २उभी चिरलेली हिरवी-लाल शिमला मिरची - १ कपउकडलेला मका - १ कप उभा चिरलेला कांदा - १ कप लो-फॅट चीज - आवश्यकतेनुसारऑरेगानो- आवश्यकतेनुसारचिली फ्लेक्स - आवश्यकतेनुसार

कृती 

1. सगळ्यात आधी मल्टीग्रेन ब्रेडचे स्लाइस घ्या, हे ब्रेड गव्हाच्या पीठापासून तयार केले जातात. ब्रेडच्या स्लाइसला पिझ्झा सॉस आणि टोमॅटो सॉस व्यवस्थित लावून घ्या. 

2. त्यानंतर त्यावर मशरुम, शिमला मिरची, कांदा, मका व्यवस्थित पसरवून घ्या. 

3. वरुन किसलेले चीज किंवा मोजेरेला चीज घाला. त्यावर ऑरेगानो आणि चिली फ्लेक्स पसरवा. 

4. ओव्हनमध्ये ब्रेक करा किंवा एअर फ्राय करा. सकाळच्या किंवा संध्याकाळच्या नाश्त्यामध्ये खा वेट लॉस ब्रेड पिझ्झा. 

टॅग्स :अन्नवेट लॉस टिप्स