जेवणाच्या ताटात डावीकडे वाढलेलं लिंबाचं लोणचं म्हणजे जेवणाची रंगत वाढवणारा पदार्थ. कधी वरण-भातासोबत, तर कधी साध्या पोळी-भाजीसोबत हे लोणचं असेल तर दोन घास जास्तीच जातात.(Lemon pickle recipe) सध्या बाजारात विविध मसाले आणि तेल घातलेले लोणचे मिळतात.(Homemade lemon pickle) पण आधीच्या हाताच्या साध्या, रसाळ आणि घरगुती लोणच्याची सर कशालाच येत नाही. पूर्वीच्या काळी ना कोणते महागडे मसाले असायचे, ना प्रिजर्व्हेटिव्हज; होतं ते फक्त लिंबू, साखर, मीठ, तिखट आणि भरपूर माया!अनेकांना असं वाटतं की लिंबाचं लोणचं बनवण्यासाठी खूप तेल आणि मसाले लागतात.(Oil free pickle) पण लिंबाचं लोणचं हे साध्या पद्धतीने बनवता येणारा पदार्थ आहे. तेलाचा थेंबही न वापरता किंवा मसाला न टाकता ४ साहित्यात लोणचं बनवू शकता. हे लोणचं जितकं जुनं होतं, तितकी त्याची चव अधिक जास्त चविष्ट असतं. वर्षभर टिकणारं, रसाळ लोणचं कसं बनवायचे, यासाठी लागणारे साहित्य आणि कृती पाहूया.(Grandma’s pickle recipe)
साहित्य लिंबू - ८ मध्यम आकाराचे (साधारण १ कप रस)साखर - ३ कप मीठ - दीड चमचा साधे लाल तिखट - १ मोठा चमचा काश्मिरी लाल तिखट - १ मोठा चमचा
कृती
1. सगळ्यात आधी लिंबू मध्यभागी कापून घ्या. नंतर त्यातील सर्व बिया काढून टाका. कापलेल्या लिंबांचा रस काढून बाजूला ठेवा. रस काञलेल्या लिंबाच्या सालींचे लहान तुकडे करा.
2. हे लिंबाचे तुकडे कुकरमध्ये ठेवून २ ते ३ शिट्ट्या करुन मऊ शिजवून घ्या. लिंबू शिजवताना डब्यावर झाकण नीट ठेवा. ज्यामुळे वाफेचे पाणी किंवा कुकरमधील पाणी लिंबाच्या फोडींमध्ये जाणार नाही.
3. शिजवलेले लिंबाचे तुकडे पूर्णपणे थंड झाल्यावर मिक्सरमध्ये वाटून घ्या. एका बाऊलमध्ये काढलेला लिंबाचा रस, साखर, मीठ, लाल तिखट आणि काश्मिरी लाल तिखट एकत्र करा. हे मिश्रण १०-१५ मिनिटे बाजूला ठेवा जेणेकरून चव एकजीव होईल.
4. आता हे मिश्रण एका कढईत काढून घ्या आणि साखर पूर्णपणे विरघळेपर्यंत मंद आचेवर गरम करा. साखर विरघळली की, त्यात मिक्सरमध्ये वाटलेले लिंबाचे मिश्रण घाला. उकळी आल्यावर गॅस बंद करा. लोणचे पूर्णपणे थंड झाल्यानंतर हवाबंद डब्यात भरा. तयार होईल लिंबाचे लोणचे.
Web Summary : Make delicious, oil-free lemon pickle with just lemon, sugar, salt, and chili powder. This traditional recipe, requiring no fancy spices or preservatives, offers a tangy, sweet, and spicy flavor that lasts all year. Boil the lemons, grind, mix with ingredients, and heat.
Web Summary : सिर्फ नींबू, चीनी, नमक और मिर्च पाउडर से स्वादिष्ट, तेल मुक्त नींबू का अचार बनाएं। यह पारंपरिक रेसिपी, जिसमें किसी भी फैंसी मसाले या संरक्षक की आवश्यकता नहीं होती है, एक तीखा, मीठा और मसालेदार स्वाद प्रदान करता है जो पूरे साल रहता है। नींबू उबालें, पीसें, सामग्री के साथ मिलाएं और गरम करें।