प्रत्येक घरोघरी रोजच्या स्वयंपाकात दोन ते तीन चपात्या उरणं ही अगदी सामान्य गोष्ट आहे. कित्येकदा आपण जास्तीच्या चपात्या केल्याने त्या उरतात. या उरलेल्या बऱ्याच शिळ्या चपात्यांचं नेमकं करायचं काय असा प्रश्न प्रत्येक गृहिणीला पडतो. अशा परिस्थितीत, या उरलेल्या चपात्यांचे अनेक पदार्थ तयार केले जातात. या पदार्थांमध्ये चपातीचा लाडू, फोडणीची चपाती किंवा चपातीचा चिवडा असे अनेक पदार्थ तयार केले जातात, सोबतच काही नाही तर या चपात्या पुन्हा गरम करून खाल्ल्या जातात. अशा परिस्थितीत, नेहमीपेक्षा काहीतरी वेगळं किंवा चमचमीत, चटपटीत पदार्थ करायचा झाल्यास 'शिळ्या चपातीच्या कुरकुरीत वड्या' देखील तयार करता येतात(how to make leftover chapati vadi).
बाहेरून क्रिस्पी आणि आतून मऊ असलेल्या या वड्या चवीला इतक्या भन्नाट लागतात की, कुणाला कळणारही नाही की या चक्क उरलेल्या चपातीपासून तयार केलेल्या आहेत. लहान मुलांच्या डब्यासाठी किंवा संध्याकाळच्या छोटी-मोठी भूक शमवण्यासाठी हा एक बेस्ट आणि पौष्टिक पर्याय आहे. शिळ्या चपातीपासून तयार होणाऱ्या या मसालेदार वड्या इतक्या टेस्टी लागतात की (crispy leftover chapati vadi recipe) आपण ताज्या चपात्या मुद्दाम शिल्लक ठेवाल! शिळ्या चपातीपासून कुरकुरीत वड्या करण्याची साधीसोपी रेसिपी पाहा...
साहित्य :-
१. चपात्या - ४ ते ५ (उरलेल्या शिळ्या किंवा ताज्या चपात्या) २. बेसन - १/२ कप ३. तांदूळ पीठ - २ टेबलस्पून ४. कांदा - १ कप (बारीक चिरलेला) ५. हिरव्या मिरच्या - २ (बारीक चिरलेल्या) ६. आले-लसूण पेस्ट - १/२ टेबलस्पून ७. लाल तिखट मसाला - १ टेबलस्पून ८. हळद - १/४ टेबलस्पून ९. धणेपूड - १/२ टेबलस्पून १०. जिरे - १/२ टेबलस्पून ११. मीठ - चवीनुसार १२. कोथिंबीर - २ टेबलस्पून (बारीक चिरलेली) १३. पाणी - आवश्यकतेनुसार १४. तेल - तळण्यासाठी
कृती :-
१. चपातीचा कूट तयार करणं :- शिळ्या चपात्या तुकडे करून मिक्सरमध्ये फिरवा. थोडा जाडसर खमंग कूट तयार करा पण फार बारीक नको. चपातीचा कुटच वडीचा बेस चवदार करते.
२. मिश्रण एकत्र करणं :- एका मोठ्या बाऊलमध्ये चपातीचा कूट घ्या. त्यात बेसन, तांदळाचे पीठ, बारीक चिरलेला कांदा, हिरव्या मिरच्या, आल-लसूण पेस्ट, लाल तिखट मसाला, हळद, धणेपूड, जिरे, मीठ ,कोथिंबीर घाला. हळूहळू पाणी घालत थोडं घट्ट पीठ मळा. वडी तळताना फुटू नयेत यासाठी पीठ घट्ट असणं खूप महत्वाचं.
अस्सल वैदर्भीय खमंग तडका! ना भाजणे, ना तळणे - करा ५ मिनिटांत चमचमीत कच्चा चिवडा...
३. वडीला आकार देणे :- हाताला थोडंसं तेल लावून गोल-चपट्या वड्या तयार करा. खूप जाड किंवा खूप पातळ आकाराच्या वड्या करु नका, मध्यम जाडीच्या वड्या तयार करून घ्या.
४. तळण :- कढईत तेल मध्यम आचेवर गरम करा. वड्या एकसमान सोनेरी-तपकिरी होईपर्यंत तळा. बाहेरून कडक कुरकुरीत आणि आतून मऊ, परफेक्ट टेक्स्चर असणाऱ्या शिळ्या चपातीच्या कुरकुरीत वड्या खाण्यासाठी तयार आहेत.
घरातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत दोघांनाही आवडतील अशा शिळ्या चपातीच्या कुरकुरीत वड्या हिरवी चटणी, टोमॅटो केचप किंवा गरम चहा सोबत खाण्यासाठी अधिकच चविष्ट लागतात.
शिळ्या चपातीच्या वड्या करताना लक्षात ठेवा...
१. चपात्या फारच कडक झाल्या असतील तर हलकं दूध/पाणी शिंपडून पीठ मळा.२. तांदूळ पिठामुळे वड्या थंडगार झाल्या तरी तासंतास कुरकुरीत राहतात.३. हव्या असल्यास बारीक किसलेले गाजर/कोबी घालून देखील वडीला वेगळी टेस्ट देऊ शकता. ४. वड्या तेलकट किंवा कमी तेलात करायच्या असतील तर आप्पे पॅनमध्येही छान खमंग, कुरकुरीत वड्या होतात.
Web Summary : Transform leftover chapatis into crispy, flavorful vadi! This simple recipe uses gram flour, spices, and rice flour for a delicious snack. Perfect for kids' lunchboxes or a quick evening bite.
Web Summary : बची हुई चपातियों को बेसन, मसालों और चावल के आटे के साथ मिलाकर स्वादिष्ट वड़ी बनाएं! यह आसान रेसिपी बच्चों के लंचबॉक्स या शाम के नाश्ते के लिए एकदम सही है।