Lokmat Sakhi >Food > लसूण तडका वांगं, हा चमचमीत पदार्थ खाऊन पाहा! वांगं नको म्हणणारेही खातील आवडीने

लसूण तडका वांगं, हा चमचमीत पदार्थ खाऊन पाहा! वांगं नको म्हणणारेही खातील आवडीने

Lasooni Tawa Baingan recipe: Lasun Vangyache Kaap recipe: Spicy brinjal fry recipe: परफेक्ट कुरकुरीत वांग्याचे काप करायचे असतील तर अशा पद्धतीने ट्राय करुन पाहा.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2025 09:05 IST2025-05-14T09:00:00+5:302025-05-14T09:05:01+5:30

Lasooni Tawa Baingan recipe: Lasun Vangyache Kaap recipe: Spicy brinjal fry recipe: परफेक्ट कुरकुरीत वांग्याचे काप करायचे असतील तर अशा पद्धतीने ट्राय करुन पाहा.

how to make Lasooni Tawa Baingan recipe tasty and spice food lasun vangyache kaap Tasty eggplant recipe with garlic | लसूण तडका वांगं, हा चमचमीत पदार्थ खाऊन पाहा! वांगं नको म्हणणारेही खातील आवडीने

लसूण तडका वांगं, हा चमचमीत पदार्थ खाऊन पाहा! वांगं नको म्हणणारेही खातील आवडीने

वांग प्रत्येकालाच आवडतं असे नाही. वांग्याचे विविध पदार्थ बनवले जातात. यामध्ये वांग्याची भाजी, बटाटा-वांगी, भरली वांगी, वांग्याचं भरीत असे अनेक पदार्थ आपण खाल्ले असूच.(Lasooni Tawa Baingan recipe) वांग्याच्या भाजीसोबत गरमागरम भाकरीची चव आठवली की, आजही तोंडाला पाणी सुटते. वाग्यांचे तेच तेच पदार्थ खाऊन आपल्याला कंटाळा येतो. (Lasun Vangyache Kaap recipe)
कधी लसूण तडका वांग ट्राय केले आहे का? कमी साहित्यात होणारा टेस्टी आणि झणझणीत पदार्थ एकदा करुन पाहा.(Spicy brinjal fry recipe) यामध्ये वांग्याचे काप करुन मसाला भरला जातो. गरमा गरम  चपाती किंवा भाकरीसोबत याची चव चाखली जाते.(Tawa baingan with garlic)  जर परफेक्ट कुरकुरीत वांग्याचे काप करायचे असतील तर अशा पद्धतीने ट्राय करुन पाहा. (Garlic brinjal fry recipe) मोठ्यांसह लहान मुले देखील आवडीने खातील. वरण-भातासोबत तोंडी लावण्यासाठी हा पदार्थ नक्की करा. (Tasty eggplant recipe with garlic)

कोकणातील पारंपरिक पदार्थ काकडीची 'तौशे भाकरी', पचायला अगदी हलकी आगळीवेगळी रेसिपी

साहित्य 

मोठ्या वांग्याचे काप - ३ ते ४ 
भिजवलेल्या काश्मिरी लाल मिरच्या - ७ ते ८ 
धने पावडर - १ चमचा 
जिरे पावडर - १ चमचा 
गरम मसाला - १ चमचा 
काश्मिरी लाल मिरची पावडर - १ चमचा 
हळदी - १ चमचा 
मीठ- काळीमिरी - चवीनुसार 
बडीशेप पावडर - १ चमचा 
तेल - २ चमचे 
लसणाच्या पाकळ्या - ७ ते ८ 
तूप - १ चमचा 

">

कृती 

1. सगळ्यात आधी मोठ्यां वांग्याला मध्यभागी चिरून त्याचे काप करा. त्याच्या एका कापाला सुरीने उभ्या आणि आडव्या दोन ते तीन रेषा फिरवून घ्या.साधारण चौकोन तयार व्हायला हवे. 

2. त्यानंतर मिक्सरच्या भांड्यात सगळे मसाले, लसूण, भिजवलेली काश्मिरी मिरची आणि तेल घालून वाटून घ्या. 

3. तयार मसाला वांग्याच्या कापावर पसरवून घ्या. आता पॅन गरम करुन त्यात तूप किंवा बटर घाला. 

4. मसाला लावलेले वांग्याचे काप फ्राय करुन घ्या. एका बाजूने फ्राय झाल्यावर पलटून घ्या. वरुन कोथिंबीर घाला. 

5. गरमागरम भातासोबत खा, लसूण तडका वांग. चवीला अगदी भारी लागेल. 

 

Web Title: how to make Lasooni Tawa Baingan recipe tasty and spice food lasun vangyache kaap Tasty eggplant recipe with garlic

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.