Join us
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भ-खान्देश स्पेशल: १० मिनिटांत करा चटपटीत कुरडईची भाजी, चविष्ट कांदा-कुरडईची पारंपरिक रेसिपी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2026 09:30 IST

Vidarbha special recipe: Khandesh traditional food: Kurdaii bhaji recipe: अगदी १० मिनिटांत होणारी झटपट कुरडईची भाजी कशी बनवायची ते पाहूया.

उन्हाळा सुरु झाला की लगबग सुरू होते ती वाळवणाच्या पदार्थांची. पापड, सांडगे आणि बटाट्याच्या किसासोबतच गव्हाची पांढरीशुभ्र कुरडई देखील केली जाते. कुरडई म्हटलं की आपल्याला फक्त तेलात फुलणारी कुरकुरीत कुरडई आठवते.(Vidarbha special recipe) पण या कुरडईची भाजी देखील अनेक घरांमध्ये आवडीने खाल्ली जाते. विशेषतः विदर्भ आणि खान्देशात जेव्हा घरात कोणतीही भाजी नसते, तेव्हा 'कांदा-कुरडईची भाजी' हा घराघरात बनवला सर्वात लोकप्रिय आणि झटपट बेत असतो.(Khandesh traditional food)कुरडईची भाजी दिसायला जितकी आकर्षक असते, तितकीच ती चवीला चटपटीत आणि झणझणीत असते. ज्वारीची भाकरी किंवा गरम चपातीसोबत या भाजीचा बेत म्हणजे खवय्यांसाठी एक पर्वणीच!(Kurdaii bhaji recipe) आपल्यालाही तीच ती भाजी खाऊन कंटाळा आला असेल तर अगदी १० मिनिटांत होणारी झटपट कुरडईची भाजी कशी बनवायची ते पाहूया. 

कुरकुरीत- चटपटीत नागपूरची प्रसिद्ध 'सांबार वडी' करा घरीच; पारंपरिक चवीची खास रेसिपी

साहित्य 

कुरडई - २ ते ३कांदा - ३टोमॅटो- १ लसूण- आले पेस्ट - १ चमचाकढीपत्ता - ५ ते ६ पाने कांदा-लसूण मसाला किंवा काळा मसाला- २ चमचेलाल तिखट- १ चमचाहळद- अर्धा चमचाजिरे-मोहरी- फोडणीसाठीमीठ- चवीनुसारतेल- २ मोठे चमचेकोथिंबीर- आवश्यकतेनुसार ओलं खोबरं- किसलेलं 

कृती 

1. सगळ्यात आधी कुरडईचे बारीक तुकडे करुन घ्या. त्यानंतर गरम पाण्यात १० ते १५ मिनिटे भिजवा. आता कढईमध्ये तेल गरम करुन त्यात मोहरी, जिरे, कढीपत्ता, बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, आले - लसूण पेस्ट आणि मीठ घालून चांगले परतवून घ्या. 

2. कांदा लाल झाल्यानंतर त्यात वरुन सर्व मसाले घाला. भिजवलेली कुरडई घालून सर्व साहित्य एकजीव करा. १० मिनिटे वाफेवर शिजण्यास ठेवा. वरुन कोथिंबीर, किसलेलं ओलं खोबरं घालून भाकरी किंवा चपातीसोबत खा, कुरडईची झटपट भाजी. 

English
हिंदी सारांश
Web Title : Vidarbha-Khandesh Special: 10-Minute Spicy Kurdai Bhaji Recipe

Web Summary : Make quick Kurdai bhaji in 10 minutes! A Vidarbha-Khandesh special, it's a spicy and flavorful dish using readily available ingredients like onion, tomato, and spices. Enjoy with bhakri or roti.
टॅग्स :अन्नपाककृती