सकाळचा डबा बनवताना आज काय बनवायचं असा प्रश्न गृहिणींना कायम पडत असतो. घरच्या मंडळीच्या पोटात पौष्टिक पदार्थ जावेत म्हणून कायम काही ना काही आगळ-वेगळ त्या बनवत असतात.(Tiffin box recipe) मुलांना बाहेरचे पदार्थ खाण्याची चव लागली की, ते घरातील पदार्थ सहसा खात नाही. त्यांना पालेभाज्या, फळभाज्या आवडत नाही.(cabbage chana dal recipe) अनेकांना काही ठराविक भाज्या आवडत नाही म्हणून त्या बनवल्या जात नाहीत. (kobi chana daal recipe)
आपल्या घरातील रोजच्या भाजीपैकी एक कोबीची भाजी.(healthy lunch box recipes) ही भाजी सगळ्यांच्या ओळखीची, पण तीच नेहमीची चव खाऊन आता कंटाळा आलाय का? मग एकदा ही भन्नाट डाळ कोबीची भाजी करून बघा.(chana dal fry with cabbage) ही भाजी बनवायला खूप सोपी आहे. ना फार वेळ लागत, ना जास्त मसाले. सकाळच्या घाईच्या वेळी झटपट तयार होणारी भाजी कशी बनवायची पाहूया.
Flax Seeds Chutney Recipe : रोज जेवणात चमचाभर 'ही' चटणी खा, वजन- बीपी राहिल कंट्रोल- पाहा रेसिपी
साहित्य
तेल - १ मोठा चमचा
मोहरी - १ चमचा
लसूण पाकळ्या - ४ ते ५
कढीपत्ता - ४ ते ५ पानं
बारीक चिरलेली हिरवी मिरची - ४ ते ५
भिजवलेली चणाडाळ - १ छोटी वाटी
हळद - १ चमचा
मीठ - चवीनुसार
चिरलेली कोबी - १ वाटी
चिरलेला टोमॅटो - १ वाटी
पाणी
कोथिंबीर - आवश्यकतेनुसार
कृती
1. सगळ्यात आधी चणाडाळ धुवून ७ ते ८ तास व्यवस्थित भिजवा. आता कोबी किसून घ्या. टोमॅटो, हिरवी मिरची आणि लसूण पाकळ्या बारीक चिरा.
2. आता आपल्या कढईत तेल गरम करुन त्यात मोहरी तडतडू द्यावी लागेल. नंतर त्यात लसूण पाकळ्या, कढीपत्ता, बारीक चिरलेली हिरवी मिरची, भिजवलेली चणाडाळ, हळद, मीठ, कोबी आणि टोमॅटो घालावा लागेल. वरील सर्व एकजीव करुन घ्या.
3. यानंतर मंद आचेवर गॅस ठेवून ताट झाका. त्यावर पाणी घालून भाजी १० ते १५ मिनिटे वाफेवर शिजू द्या. व्यवस्थित शिजल्यानंतर पुन्हा एकदा चमच्याने ढवळा. वरुन कोथिंबीर घालून पुन्हा एकदा चमच्याने ढवळून घ्या. गरमागरम चपातीसोबत खा चणाडाळ कोबी.