Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Food > कैरीचा मेथांबा म्हणताच तोंडाला सुटेल पाणी, घ्या पारंपरिक रेसिपी - साध्या जेवणालाही येईल आंबटगोड रसरशीत चव...

कैरीचा मेथांबा म्हणताच तोंडाला सुटेल पाणी, घ्या पारंपरिक रेसिपी - साध्या जेवणालाही येईल आंबटगोड रसरशीत चव...

How To Make Karicha Methamba At Home : Karicha Methamba Recipe : Methamba Recipe : वर्षभर टिकणारा आणि अगदी चटकन होणारा वाळवणातील पारंपरिक पदार्थ मेथांबा करण्याची इन्स्टंट रेसिपी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2026 15:32 IST2026-03-26T15:22:38+5:302026-03-26T15:32:50+5:30

How To Make Karicha Methamba At Home : Karicha Methamba Recipe : Methamba Recipe : वर्षभर टिकणारा आणि अगदी चटकन होणारा वाळवणातील पारंपरिक पदार्थ मेथांबा करण्याची इन्स्टंट रेसिपी...

How To Make Karicha Methamba At Home Karicha Methamba Recipe Methamba Recipe | कैरीचा मेथांबा म्हणताच तोंडाला सुटेल पाणी, घ्या पारंपरिक रेसिपी - साध्या जेवणालाही येईल आंबटगोड रसरशीत चव...

कैरीचा मेथांबा म्हणताच तोंडाला सुटेल पाणी, घ्या पारंपरिक रेसिपी - साध्या जेवणालाही येईल आंबटगोड रसरशीत चव...

उन्हाळा सुरू झाला की घराघरात वाळवणीची लगबग सुरू होते. वाळवण म्हटलं की डोळ्यांसमोर येत ते आंबट गोड लोणची, चटण्या, पापड, कुरडया आणि असे अनेक पदार्थ... कच्च्या कैरीच्या विविध प्रकारच्या चटण्या, लोणची आणि पन्हे तर आपण नेहमीच करतो, पण वर्षभर जिभेवर रेंगाळणारी एक चव म्हणजे 'कैरीचा मेथांबा'! मेथीचे दाणे, गूळ आणि कच्च्या कैरीचा हा आंबट-गोड मेळ केवळ चविष्टच नाही, तर उन्हाळ्यात आरोग्यासाठीही उत्तम असतो. जेवणाची रंगत वाढवण्यासाठी ताटात डाव्या बाजूला काहीतरी चटपटीत हवंच असतं. अशावेळी कच्च्या कैरीचा मेथांबा हा सर्वोत्तम पर्याय ठरतो(Methamba Recipe).

कैरीचा आंबटपणा (How To Make Karicha Methamba At Home) आणि गुळाचा गोडवा यात जेव्हा मेथीचा सुवास मिसळतो, तेव्हा भूक अधिकच लागते... उन्हाळ्याच्या वाळवणातील कच्च्या कैरीचा मेथांबा हा एक असा प्रकार आहे जो पोळी, भाकरी किंवा वरण - भातासोबतही अप्रतिम लागतो. पूर्वीच्या काळातील आजी - पणजीच्या हातची चव असलेले हे वाळवणाचे पदार्थ आजही तितकेच लोकप्रिय आहेत. वर्षभर (Karicha Methamba Recipe) टिकणारा आणि अगदी चटकन होणारा वाळवणातील पारंपरिक सोपा मेथांबा करण्याची साधीसोपी रेसिपी पाहूयात... 

साहित्य :- 

१. कच्च्या कैऱ्या - २ ते ३
२. तेल - २ ते ४ टेबलस्पून 
३. मोहरी - १ टेबलस्पून 
४. हळद - १ टेबलस्पून 
५. हिंग - १/२ टेबलस्पून 
६. लाल तिखट मसाला - १ टेबलस्पून 
७. मेथी दाणे - १ टेबलस्पून 
८. गूळ - ३ ते ५ टेबलस्पून 
९. मीठ - चवीनुसार

द्राक्षं गोड की आंबट? ताजी गोड द्राक्षं ओळखण्याची पाहा सोपी युक्ती- न खाता निवडा योग्य फळ...


कांदा - शेंगदाण्याचा चमचमीत ठेचा! साध्या जेवणाची लज्जत वाढवणारा गावरान पदार्थ - तोंडी लावण्यासाठी झणझणीत बेत... 

कृती :- 

१. सगळ्यात आधी कच्च्या कैऱ्या स्वच्छ धुवून त्यावरची सालं काढून घ्यावी. 
२. सालं काढून कच्च्या कैरीच्या मध्यम आकाराच्या छोट्या चौकोनी फोडी तयार करून घ्याव्यात. 
३. एका पॅनमध्ये तेल घेऊन त्यात फोडणीसाठी मोहरी, हळद, हिंग, लाल तिखट मसाला, मेथी दाणे घालावेत.   
४. खमंग अशी फोडणी तयार झाल्यावर त्यात कच्च्या कैरीचे तुकडे घालावेत. तयार फोडणीत कच्च्या कैरीचे तुकडे व्यवस्थित घोळवून घ्यावेत. 

५. सगळे मिश्रण व्यवस्थितीत शिजवून झाल्यावर सगळ्यांत शेवटी त्यात गूळ घालावा. गूळ संपूर्णपणे वितळेपर्यंत मंद आचेवर गरम करून घ्यावं. 
६. मिश्रण चमच्याने कालवून घ्यावे गॅस बंद करुन त्यात चवीनुसार मीठ घालावं. 

मेथांबा खाण्यासाठी तयार आहे. मेथांबा थोडा थंड झाल्यावर हवाबंद काचेच्या किंवा चिनीमातीच्या बरणीत भरून वर्षभरासाठी स्टोअर करून ठेवावा.

Web Title : कच्चे आम का मेथांबा: एक पारंपरिक, मीठा और खट्टा व्यंजन

Web Summary : स्वादिष्ट कैरीचा मेथांबा बनाएं! इस पारंपरिक महाराष्ट्रीयन रेसिपी में कच्चे आम, मेथी के बीज और गुड़ का उपयोग किया जाता है जो मीठा, खट्टा और मसालेदार स्वाद देता है। इसे रोटी, भाकरी या चावल के साथ परोसें।

Web Title : Tangy Mango Methamba Recipe: A traditional, sweet, and sour delight.

Web Summary : Make delicious Kairicha Methamba! This traditional Maharashtrian recipe uses raw mangoes, fenugreek seeds, and jaggery for a sweet, sour, and spicy flavor. Enjoy it with roti, bhakri, or rice.