Lokmat Sakhi >Food > कोकणातला पारंपरिक पदार्थ काकडी पोहे, पचायला हलका- सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट रेसिपी

कोकणातला पारंपरिक पदार्थ काकडी पोहे, पचायला हलका- सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट रेसिपी

Cucumber poha recipe : Maharashtrian light snacks: Konkani cuisine recipes: सकाळच्या नाश्त्यात अगदी १० मिनिटांमध्ये होणारा हा पदार्थ कसा बनवायचा पाहूया.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2025 17:35 IST2025-08-04T17:34:30+5:302025-08-04T17:35:46+5:30

Cucumber poha recipe : Maharashtrian light snacks: Konkani cuisine recipes: सकाळच्या नाश्त्यात अगदी १० मिनिटांमध्ये होणारा हा पदार्थ कसा बनवायचा पाहूया.

How to make kakdi poha at home Traditional Konkani morning breakfast idea Light morning meals for digestion | कोकणातला पारंपरिक पदार्थ काकडी पोहे, पचायला हलका- सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट रेसिपी

कोकणातला पारंपरिक पदार्थ काकडी पोहे, पचायला हलका- सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट रेसिपी

रोज नाश्त्याला काय बनवायचं असा प्रश्न गृहिणींना पडतो.(Morning Breakfast Idea) बाहेरुन विकत आणलेले पदार्थ आपण चवीने खातो. कांदेपोहे, उपमा, शिरा किंवा इडली- डोसा खाऊन कंटाळा आला की आपल्याला नवीन काही तरी खावेसे वाटते.(Konkani traditional food) सकाळच्या वेळी किंवा घाईत असताना काही तरी वेगळं बनवणं खरंतर अवघड. पण आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीचा नाश्ता सांगणार आहोत. (Kakdi Poha recipe)
काकडी पोहे ही एक पारंपरिक आणि प्रादेशिक रेसिपी मुख्यत: कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र या भागांमध्ये तयार केली जाते.(Healthy breakfast ideas) विशेषत: कोल्हापूर, सातारा, पुणे आणि रत्नागिरी या भागात ही डिश प्रसिद्ध आहे. हे पोहे पचायला हलके आणि पोटभरीचा पदार्थ आहे.(Maharashtrian breakfast dish) सकाळच्या नाश्त्यात अगदी १० मिनिटांमध्ये होणारा हा पदार्थ कसा बनवायचा पाहूया. यासाठी लागणारे साहित्य आणि कृती जाणून घ्या. 

मुगाच्या डाळीची भजी कडक होतात, घास लागतो? ५ टिप्स- भजी होतील क्रिस्पी-मऊ

साहित्य 

पोहे - १ वाटी 
किसलेली काकडी - १ वाटी 
ओले खोबरे - १ वाटी 
मीठ - चवीनुसार 
तेल - २ चमचे 
चण्याची डाळ - १ चमचा
उडीदाची डाळ - १ चमचा 
हिंग - १ चमचा 
शेंगदाणे - १ छोटी वाटी 
मुगाची डाळ - १ चमचा 
सुक्या लाल मिरच्या - २ 
हिरव्या मिरच्या - २ 
कढीपत्त्याची पाने - १० ते १२


कृती 

1. सगळ्यात आधी कपभर पोहे घ्या. चाळणीत ठेवून त्यावर अर्धा कप पाणी घाला. पोह्यांमध्ये पाणी घालताना त्याचा लगदा होणार नाही, याची काळजी घ्याल.चाळणीतून पोह्यातील पाणी नितरु द्या. आता एका ताटात काकडी धुवून किसून घ्या. त्यात वरुन भिजवलेले पोहे, ओल्या नारळाचा किस आणि मीठ घालून चमच्याने चांगले मिक्स करा. 

2. आता कढईमध्ये तेल गरम करुन त्यात चण्याची डाळ, पांढर्‍या उडदाची डाळ, हिंग, शेंगदाणे आणि मुगाची डाळ घाला. त्यात सुक्या मिरच्यांचे तुकडे, बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या आणि कढीपत्ता घाला. मिश्रण चांगले फ्राय होऊ द्या. 

3. यामध्ये आता तयार पोह्यांचे सारण घाला. मिश्रण चमच्याने एकजीव करा, वाफ आल्यानंतर सर्व्ह करा गरमागरम हेल्दी नाश्ता काकडी पोहे.
 

Web Title: How to make kakdi poha at home Traditional Konkani morning breakfast idea Light morning meals for digestion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.