उन्हाळ्यात फणसाची गरे आपल्याला पाहायला मिळतात. त्याच्या सुगंधाने आपसुकच आपल्या तोंडाला पाणी सुटते. (How to cook spicy jackfruit seeds bhaji at home)पिवळ्या धम्मक फणसाचे गरे खाऊन आठळ्या टाकून देतो. फणस जितका चविष्ट तितक्याच त्याच्या आठळ्या आरोग्यासाठी बहुगुणी मानल्या जातात. (Jackfruit seeds benefits )फणसाच्या आठळ्यांमध्ये अनेक पौष्टिक गुणधर्म आहेत. (Healthy and tasty jackfruit seed recipes) ज्यामध्ये कॅल्शिअम, फॉस्फरस, लोह, जीवनसत्त्वे आणि फायबर भरपूर प्रमाणात आढळतात.(Easy jackfruit seed recipe) या आठळ्या खाल्ल्याने रक्तदाब नियंत्रणात राहतो, पचनक्रिया देखील सुधारते. कोकणातील अनेक भागात फणसांच्या आठळ्यांची भाजी खाल्ली जाते. ही भाजी बनवायला सोपी आणि अगदी पारंपरिक पद्धतीची आहे. ही भाजी बनवायची कशी पाहूया.
फक्त २ पदार्थाने घरच्या घरी करा मऊ- मोजेरेला चीज, झटपट बनेल- महिनाभर टिकेल, चवही उत्तम
साहित्य
फणसाच्या आठळ्या - १० ते १२तेल - १ चमचा जिरे - १ चमचा हिंग - १ चमचा लाल-हिरव्या मिरच्या - ५ ते ६बारीक चिरलेला लसूण - १ चमचा बारीक चिरलेला कांदा - १ कपबारीक चिरलेली मेथी - १ कपमीठ - चवीनुसारमालवणी/गरम मसाला - १ चमचाओले खोबरे - अर्धा कप
कृती
1. सगळ्यात आधी कुकरमध्ये फणसाच्या आठळ्या पाणी घालून शिजवून घ्या. थंड झाल्यानंतर त्याचे साल काढून बारीक उभे काप करा.
2. त्यानंतर कढईत तेल घालून त्यात जिरे, हिंग, मिरच्या, लसूण, कांदा आणि चिरलेल्या मेथीची पाने घालून चांगले परतवून घ्या.
3. यामध्ये कापलेल्या आठळ्या, मीठ, गरम मसाला आणि ओले खोबरे घालून चांगले परतवून घ्या. भाकरीसोबत आवडीने खा, चमचमीत- झणझणीत फणसाच्या आठळ्यांची भाजी.