उन्हाळा आणि वाळवणाचे पदार्थ याचा संगम काही वेगळाच आहे. लोणचे, पापड, कुरडई, सांडगे, मिरच्या असे विविध पदार्थ उन्हाळ्यात केले जातात. यात सगळ्यात आधी केली जाते ती गव्हाची कुरडई.(Poha Kurdai Recipe) ही करण्यासाठई आपल्याला गव्हाचे चिक काढणे, गहू भिजत घालणे ही तीन-चार दिवसांची मोठी कटकट असते.(Instant Kurdai at Home) आपल्यालाही मेहनत वाचवायची असेल आणि तरीही पांढरीशुभ्र आणि खुसखुशीत कुरडई हवी असेल तर पोह्यांची कुरडई करु शकता. ही कुरडई करायला अत्यंत सोपी आहे आणि गव्हाच्या कुरडईपेक्षाही कमी वेळात तयार होते.(Quick Summer Recipes)बाहेरून कुरकुरीत कुरडई तळल्यावर दुप्पट-तिप्पट फुलते. ज्यांना गव्हाचा चिक काढण्याचा अनुभव नाही, अशा व्यक्तीही पहिल्याच प्रयत्नात ही कुरडई परफेक्ट बनवू शकतात. ही कुरडी बनवण्यासाठी ना आपल्या गॅस पेटवण्याची गरज लागणार नाही ना पीठ शिजवण्याची. पारंपरिक चव टिकवून ठेवणारी पण आधुनिक पद्धतीने झटपट होणारी 'पोह्यांची कुरडई' कशी करायची पाहूया.
साहित्य
जाड पोहे - २ वाटी पाणी - ४ ते ५ वाट्या पापडखार - १ मोठा चमचा मीठ - चवीनुसार जिरे - १ चमचा
कृती
1. सगळ्यात आधी पोहे चाळून घ्या. त्यानंतर २ ते ३ पाण्याने धुवून घ्या. नंतर चाळणी ठेवून पोह्यातील सर्व पाणी गाळून घ्या.
2. यानंतर पोहे चाळणीवर पसरवून त्यात पुन्हा पाणी घालून झाकून ठेवा. पोह्याचा लगदा झाल्यानंतर थोडे पोहे काढून घ्या. चाळणीवर असलेले पोहे वाटीच्या मदतीने मॅश करुन घ्या.
3. पोह्याच्या पीठाचा गोळा तयार करुन घ्या. त्यात पापडखार, मीठ, हवं असल्यास जिरे घालून पुन्हा एकदा एकजीव करा.
4. पोह्याच्या पीठाचा गोळा घेऊन कुरडईच्या साच्याचा मदतीने कुरडई पाडा. उन्हामध्ये वाळवून घ्या. कुरकुरीत झाल्यानंतर गरम तेलात तळा.
Web Summary : Make instant Poha Kurdai in minutes! This simple recipe skips the traditional wheat soaking process. Enjoy crispy, fluffy Kurdai without the usual hassle, perfect for summer.
Web Summary : मिनटों में बनाएं झटपट पोहा कुरडई! यह आसान रेसिपी पारंपरिक गेहूं भिगोने की प्रक्रिया को छोड़ देती है। बिना किसी परेशानी के कुरकुरी, फूली हुई कुरडई का आनंद लें, गर्मियों के लिए बिल्कुल सही।