Join us

हिरव्यागार मिरचीचं इन्स्टंट झणझणीत लोणचं! ५ मिनिटांत होणारी झटपट रेसिपी, गरमागरम वरण-भाताला येईल खास रंगत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2025 16:45 IST

Green chilli pickle: Instant green chilli pickle: Spicy green chilli achar: डाला चव आणणारे झणझणीत हिरव्या मिरचीचे लोणचे कसे बनवायचे पाहूया.

लोणच्याचे नाव ऐकली की आपल्या तोंडाला आपसुकच पाणी सुटते. वाफाळत्या वरणा-भात, चपाती किंवा भाकरीसोबत हमखास खाल्ल जातं.(Green chilli pickle) अनेक भारतीय घरात लोणचे रोजच खातात. ताटाच्या डाव्या बाजूला वाढला जाणारा पदार्थ अर्थात लोणचे. कैरी, लिंबू, मिरची, गाजर, आवळा अशा विविध पदार्थांपासून लोणचे बनवले जाते.(Instant green chilli pickle) पण लोणचे बनवण्याचा देखील एक विशिष्ट काळ असतो. पण सहज आणि कधीही बनवता येणारं लोणचं अर्थात मिरचीचं. (Spicy green chilli achar)हिरव्यागार मिरच्यांमध्ये एक वेगळीच चव असते. त्यामुळे ज्या भाज्यांमध्ये मिरच्या फोडणीत घातल्या जातात, त्याची चव अगदी छान होते.(5-minute pickle recipe) मिरचीचा ठेचा असो किंवा त्याचं लोणचं जेवणाची रंगत वाढवण्याचे काम करते.(Homemade chilli pickle) पण याच ठेच्याप्रमाणे हिरव्यागार मिरचीचे लोणचे करुन बघा तेही ५ मिनिटांत. तोंडाला चव आणणारे झणझणीत हिरव्या मिरचीचे लोणचे कसे बनवायचे पाहूया. (Easy pickle recipes)

हिरव्यागार कोथिंबीरीची करा 'अशी' चटणी, सॅण्डविच असो की डोसा-पदार्थाची चवच होईल खास

साहित्य 

मोहरीचे तेल - ४ चमचे जिरे - अर्धा चमचा मोहरी - अर्धा चमचा मेथी दाणे - अर्धा चमचा हिरवी मिरची - १०० ग्रॅमहिंग - १/४ चमचाकाळे मीठ - १ चमचामीठ - १/४ चमचाकाश्मिरी लाल मिरची पावडर - १ चमचा हळद - १/४ चमचाधने पावडर - १ चमचाजिरे पावडर - १/४ चमचागूळ पावडर - १ चमचा पाणी - आवश्यकतेनुसार 

कृती 

1. सगळ्यात आधी आपल्याला हिरव्या मिरच्या धुवून, पुसून आणि व्यवस्थित सुकवून घ्या. त्यानंतर मध्यभागी चिरून त्याचे दोन तुकडे करा. आता पॅन गरम करुन त्यात तेल घाला. त्यात जिरे, मोहरी आणि मेथी दाणे चांगले तडतडू द्या. आता त्यात चिरलेल्या हिरव्या मिरच्या घाला. 

2. मिरच्या चांगल्या परतवून घ्या. त्याचा थोडा रंग बदलेल. आता त्यात मीठ, हिंग, काळे मीठ, लाल मिरची पावडर, हळद, धने पावडर, जिरे पावडर घालून चांगले परतवून घ्या. 

3. नंतर त्यात गूळ पावडर आणि आवश्यक असल्यास थोडे पाणी घाला. दोन मिनिटे झाकून ठेवा. वाफ आल्यानंतर गॅस बंद करा. तयार होईल हिरव्यागार मिरचीचं इन्स्टंट झणझणीत लोणचं.

English
हिंदी सारांश
Web Title : Instant Spicy Green Chilli Pickle: A 5-Minute Recipe for Flavor!

Web Summary : Craving pickle? This instant green chilli pickle recipe adds spice to any meal. Ready in 5 minutes, it's perfect with rice, roti, or as a flavorful side. Simple ingredients, bold taste!
टॅग्स :अन्नपाककृती