Lokmat Sakhi >Food > डाळ - तांदूळ न भिजवता करा इन्स्टंट डोसा! बॅटर असे की तव्याला चिकटणार नाही - पाहा खास रेसिपी...

डाळ - तांदूळ न भिजवता करा इन्स्टंट डोसा! बॅटर असे की तव्याला चिकटणार नाही - पाहा खास रेसिपी...

how to make instant dosa at home in 5 minute without soaking dal chawal : instant dosa recipe without soaking : 5 minute dosa batter at home : no soak dosa recipe : quick dosa recipe without dal rice : how to make dosa instantly : फार मोठा घाट न घालता , पीठ न आंबवता करा झटपट इन्स्टंट डोसा तयार...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2025 10:00 IST2025-09-05T10:00:00+5:302025-09-05T10:00:03+5:30

how to make instant dosa at home in 5 minute without soaking dal chawal : instant dosa recipe without soaking : 5 minute dosa batter at home : no soak dosa recipe : quick dosa recipe without dal rice : how to make dosa instantly : फार मोठा घाट न घालता , पीठ न आंबवता करा झटपट इन्स्टंट डोसा तयार...

how to make instant dosa at home in 5 minute without soaking dal chawal instant dosa recipe without soaking 5 minute dosa batter at home quick dosa recipe without dal rice how to make dosa instantly | डाळ - तांदूळ न भिजवता करा इन्स्टंट डोसा! बॅटर असे की तव्याला चिकटणार नाही - पाहा खास रेसिपी...

डाळ - तांदूळ न भिजवता करा इन्स्टंट डोसा! बॅटर असे की तव्याला चिकटणार नाही - पाहा खास रेसिपी...

बऱ्याचशा घरांमध्ये सकाळच्या नाश्त्यासाठी डोसा आवर्जून केला जातो. डोसा म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर सगळ्यांत आधी येते ती डोसा तयार करण्याची किचकट व (instant dosa recipe without soaking) वेळखाऊ पद्धत. डोसा करायचा असेल तर, सगळ्यात आधी डाळ - तांदूळ भिजत घालावे लागतात. त्यानंतर हे मिश्रण मिक्सरमधून वाटून घेतले जाते. मग रात्रभर हे पीठ आंबवले जाते व दुसऱ्या (how to make dosa instantly) दिवशी या आंबवलेल्या पिठाचे डोसे तयार केले जातात. परंतु ही पारंपरिक पद्धत फारच मोठी आणि वेळखाऊ असल्याने या पद्धतीने डोसे करायचे म्हटलं तर बराच वेळ खर्ची घालावा लागतो(how to make instant dosa at home in 5 minute without soaking dal chawal).

परंतु अनेकदा अचानक डोसा खायची इच्छा झाली किंवा वेळ कमी असतो, तेव्हा ही पारंपरिक पद्धत थोडी किचकट वाटते. अशा परस्थितीत, जर पटकन डोसा तयार करायचा असेल तर इन्स्टंट डोसा बॅटर अगदीच बेस्ट आणि फायदेशीर ठरते. या पद्धतीमध्ये, डाळ-तांदूळ भिजवायची किंवा रात्रभर पीठ आंबवत ठेवून वाट पाहायची गरज नसते, तरीही डोसा अगदी खुसखुशीत आणि चविष्ट तयार होतो. जर आपल्याला कधी पटकन डोसा खायचा असेल तर आपण अशा पद्धतीने झटपट डोसा तयार करून खाऊ शकतो. डाळ-तांदूळ न भिजवता, फक्त काही मिनिटांत डोशाचे पीठ तयार करण्यासाठी पाहा ही खास इन्स्टंट रेसिपी... डाळ-तांदूळ न भिजवता इन्स्टंट डोसा बॅटर कसे तयार करायचे याची सोपी रेसिपी पाहा.. 

साहित्य :-

१. बारीक रवा - २ कप 
२. बेसन - १ कप 
३. तांदुळाचे पीठ - १ कप 
४. दही - ३ ते ४ टेबलस्पून 
५. मीठ - चवीनुसार
६. बेकिंग सोडा - चिमूटभर


कृती :- 

१. एका मिक्सरच्या भांड्यात रवा, बेसन आणि तांदळाचं पीठ घालून बारीक करा. बारीक केल्याने तीनही जिन्नस एकमेकांमध्ये चांगले मिसळतील. बारीक केल्यानंतर ते एका भांड्यात काढा, आता त्यात मीठ आणि चिमूटभर सोडा मिसळा. त्यानंतर दही आणि थोडं-थोडं पाणी घालून घट्ट, गुळगुळीत पीठ तयार करा. पीठामध्ये कोणत्याही गाठी राहणार नाहीत याची काळजी घ्या.

२. आता तवा गरम करून त्याला चमचाभर तेल लावा, नंतर त्यावर पाणी शिंपडून पुसून टाका. यामुळे तव्याचं तापमान संतुलित होईल आणि डोसा चिकटणार नाही किंवा जळणार नाही. 
३. त्यानंतर पळीने थोडं - थोडं पीठ घेऊन ते गरम तव्यावर व्यवस्थित गोलाकार डोशासारखे पसरवा. 
४. डोशाभोवती तेल टाकून डोसा मंद आचेवर सोनेरी होईपर्यंत खरपूस भाजून घ्या. 
५. जेव्हा डोसा खालून चांगला भाजला जाईल, तेव्हा त्याला दुमडून घ्या आणि गरम-गरम चटणी आणि सांबरसोबत खायला द्या.

गरमागरम खुसखुशीत डोसा खाण्यासाठी सर्व्ह करावा.

Web Title: how to make instant dosa at home in 5 minute without soaking dal chawal instant dosa recipe without soaking 5 minute dosa batter at home quick dosa recipe without dal rice how to make dosa instantly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.