सकाळच्या नाश्त्याला अनेक घरांमध्ये इडली-सांबार हमखास खाल्ला जातो. आपल्यालाही मनसोक्त इडली खाण्याची इच्छा कायम होत असते. पण ती बनवण्याचा अनेकांना कंटाळा येतो.(Idli without idli stand) याचे मुख्य कारण म्हणजे इडली पात्र काढणं, त्याचं स्टॅन्ड लावणं आणि नंतर घासून ते स्वच्छ करणं. अनेकदा इडली पात्रात बॅटर टाकल्यानंतर ते चिकटून बसत. पात्र साफ करताना वेळ जातो. त्यामुळे घरी इडली करण्याच्या भानगडीत आपण सहसा पडच नाही.(Instant idli recipe) पण इडली खाण्याची इच्छा होत असेल तर रोजच्या वापरातल्या साध्या वाट्यांमध्येही अण्णाकडे मिळते तशी टम्म फुगलेली आणि कापसासारखी मऊ इडली बनवता येऊ शकते. या स्मार्ट ट्रिकमुळे आपली मेहनत आणि वेळ दोन्ही वाचू शकते. (Soft idli recipe)
फ्लॉवरची भाजी खाऊन कंटाळलात? १० मिनिटांत करा कुरकुरीत गोभी वडा; मुले आवडीने खातील-सोपी रेसिपी
कोणत्याही विशेष साहित्याशिवाय फक्त १५ मिनिटांत आपल्याला इडली पात्राशिवाय इडलीची चव चाखता येईल. ग्लास किंवा वाटीचा वापर करुन बाऊल इडली कशी करायची पाहूया.
1. इडली बनवण्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला इडलीचे पीठ व्यवस्थित आंबवून घ्यावे लागेल. जर रवा इडली बनवत असाल तर दही घालून मिश्रण १५ मिनिटे बाजूला ठेवा. पिठात चवीनुसार मीठ घाला आणि पिठाची कन्सिस्टन्सी मध्यम ठेवा.
2. यानंतर घरातील वाट्यांना आतून तेल लावून ग्रीस करुन घ्या. ज्यामुळे इडल्या चिकटणार नाही आणि शिजल्यावर सहज बाहेर निघतील.
3. गॅसवर मोठी कढई ठेवा. त्यात दीड ते दोन ग्लास पाणी ओता. कढईच्या मध्यभागी एक स्टँड किंवा छोटी रिंग ठेवा. स्टॅन्ड नसेल तर छोटी प्लेट उलटी करुन ठेवा.
4. यानंतर वाट्यांमध्ये इडलीचे बॅटर भरा. बॅटर पूर्ण भरून नका. थोडेसे रिकामे ठेवा. ज्यामुळे इडली व्यवस्थित फुगेल आणि सारण बाहेर येणार नाही. आता या वाट्या कढईतील स्टॅण्डवर ठेवा. कढईवर घट्ट झाकण ठेवा, ज्यामुळे वाफ बाहेर जाणार नाही.
5. गॅस फास्ट असेल तर इडली १२ ते १५ मिनिटे वाफवून घ्या. १५ मिनिटांनंतर गॅस बंद करा आणि आता वाट्या बाहेर काढून थोड्या थंड होऊ द्या. सुरीच्या साहाय्याने कडा मोकळ्या करा. टम्म फुगलेली, जाळीदार वाटी इडली होईल तयार. या वाट्यांमुळे इडलीला सुंदर गोल आकार मिळतो. ज्या दिसायला अगदी सुंदर असतात.
