इडली ही सकाळच्या नाश्त्यात हमखास खाल्ली जाते. गरमागरम इडलीसोबत सांबार आणि चटणी.(Idli Manchurian recipe) इडली हा प्रकार असा आहे की, सकाळचा नाश्ता असो किंवा दुपारचे जेवण ती कधीही खाता येते.(Leftover idli recipes) इडली-चटणीच नाव घेतलं की तोंडाला पाणी सुटतं. इडली जितकी चवीला टेस्टी असते तितकीच ती मऊ देखील असते. (Healthy breakfast with idli)
डाएट करणाऱ्या लोकांमध्ये बऱ्यापैकी लोक इडलीला प्राधान्य देतात. इडलीमुळे पोट दीर्घकाळ भरलेले राहाते आणि भूकही लवकर लागत नाही.(Morning snack with leftover idli) तसेच आरोग्यासाठी देखील इडली चांगली आहे. परंतु, रोज तिच तिच इडली खाऊन अनेकांना कंटाळा येतो. त्यासाठी आज आम्ही तुम्हाला इडलीला वेगळ्या पद्धतीने तडका देणार आहोत.(How to make Idli Manchurian with leftover idlis) आता पर्यंत आपण मंचुरियन खाल्ले असतीलच पण इडली मंचुरियन कधी ट्राय केले आहेत? इडल्या काही वेळा कडक होतात. ज्यामुळे खाताना त्या घशात अडकतात.(Healthy South Indian breakfast ideas) अशावेळी त्या टाकून देण्याऐवजी आपण त्यांना मंचुरियनचा ट्विस्ट दिला तर आणखी टेस्टी लागतील. (Leftover idli snack recipe step by step)
साहित्य
उरलेल्या इडली- ७-८
मैदा- पाव कप
कॉर्नफ्लोअर- २ टेबलस्पून
मीठ- चवीनुसार
मिरपूड- १/४ टीस्पून
पाणी- गरजेप्रमाणे
तेल- तळणीसाठी
एकदम बारीक चिरलेला लसूण- २ टेबलस्पून
बारीक चिरलेले आले- १ टीस्पून
बारीक चिरलेली हिरवी मिरची- १ टीस्पून
बारीक चिरलेली कोथिंबिरीची कोवळी देठं- १ टेबलस्पून
पातळ कापलेला पातीचा कांदा पांढरा- पाव कप
ढोबळी मिरची चौकोनी पाकळ्या -पाव कप
साखर- १/२ चमचा
मिरपूड -१/२ टीस्पून
चिली सॉस -२ टीस्पून
सोया सॉस -१ टीस्पून
कांदा पात (हिरवी) -गरजेप्रमाणे
फ्राईड इडली
कृती
1. सगळ्यात आधी उरलेल्या इडलीचे काप करुन घ्या. एका मिक्सिंग बाऊलमध्ये मैदा, कॉर्नफ्लोअर, मीठ, मिरपूड घ्या. त्यात पाणी घाला पिठाची गुठळी होणार नाही हे लक्षात ठेवाल.
2. कढईत तळण्यासाठी तेल गरम करा, तेल गरम झाल्यावर आच मंद करा. इडलीचे तुकडे पीठात टाकून त्याला मंद आचेवर कुरकुरीत तळा.
3. आता दुसऱ्या कढईत तेल गरम करा. त्यात चिरलेला लसूण, कोथिंबीर घालून मंद आचेवर परतून घ्या. त्यात चिरलेली हिरवी मिरची आणि पांढरा कांदा घालून मंद आचेवर परतून घ्या.
4. त्यात शिमला मिरची, चवीनुसार मीठ, साखर, सोया सॉस, रेड चिली सॉस आणि काळी मिरी घालून २ मिनिटे परतून घ्या.
5. आता कॉर्नफ्लोअरमध्ये पाणी घालून त्याची पेस्ट तयार करा. ही पेस्ट कढईत घालून मिनिटभर शिजवून घ्या.
6. त्यात तळलेली इडली, कांदा, हिरव्या भाज्या घालून २ मिनिटे परतून घ्या. शेजवान सॉस किंवा चटणीसोबत गरमागरम इडली मंचुरियन खा.