Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Food > हॉटेलस्टाइल चमचमीत पालक पनीर भुर्जी करा घरीच; पाहा सोपी रेसिपी, डब्यासाठीही झटपट पर्याय

हॉटेलस्टाइल चमचमीत पालक पनीर भुर्जी करा घरीच; पाहा सोपी रेसिपी, डब्यासाठीही झटपट पर्याय

Palak Paneer Bhurji: Hotel Style Palak Paneer Bhurji: Palak Paneer Recipe: पालक पनीर भुर्जी ही रेसिपी इतकी झटपट आहे की ऑफिसच्या डब्यासाठी किंवा अचानक पाहुणे आले तरी तासन्‌तास स्वयंपाकघरात उभं राहावं लागत नाही.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2025 09:30 IST2025-12-29T09:30:00+5:302025-12-29T09:30:02+5:30

Palak Paneer Bhurji: Hotel Style Palak Paneer Bhurji: Palak Paneer Recipe: पालक पनीर भुर्जी ही रेसिपी इतकी झटपट आहे की ऑफिसच्या डब्यासाठी किंवा अचानक पाहुणे आले तरी तासन्‌तास स्वयंपाकघरात उभं राहावं लागत नाही.

how to make hotel style palak paneer bhurji at home easy palak paneer bhurji recipe for lunchbox quick palak paneer bhurji recipe in 15 minutes healthy palak paneer bhurji for office tiffin | हॉटेलस्टाइल चमचमीत पालक पनीर भुर्जी करा घरीच; पाहा सोपी रेसिपी, डब्यासाठीही झटपट पर्याय

हॉटेलस्टाइल चमचमीत पालक पनीर भुर्जी करा घरीच; पाहा सोपी रेसिपी, डब्यासाठीही झटपट पर्याय

हॉटेलमध्ये एखादा वेगळा पदार्थ खाल्ला की आपल्याला तो घरी बनवून खाण्याची इच्छा होते. पण घरी बनवल्यानंतर त्याची चव काही सारखी लागत नाही, अशी अनेकांची तक्रार असते.(Palak Paneer Bhurji) त्यातीलच एक पालक पनीर भुर्जी. हॉटेलमधली ती हिरवी रंगत, मसाल्यांचा सुगंध आणि तोंडात रेंगाळणारी चव लगेच आठवते. पण थोड्या योग्य पद्धतीने आणि साध्या घरगुती साहित्याने हीच हॉटेलस्टाइल पालक पनीर भुर्जी अगदी सहज घरी करता येते.(Hotel Style Palak Paneer Bhurji) विशेष म्हणजे ही रेसिपी इतकी झटपट आहे की ऑफिसच्या डब्यासाठी किंवा अचानक पाहुणे आले तरी तासन्‌तास स्वयंपाकघरात उभं राहावं लागत नाही.(Palak Paneer Recipe)
पालक ही केवळ चविष्टच नाही तर आरोग्यासाठी देखील खूप फायदेशीर मानली जाते. आयर्न, फायबर, कॅल्शियम आणि अनेक जीवनसत्त्वांनी भरलेला पालक रोजच्या आहारात असायला हवा. पण आज काय द्यायचं असा प्रश्न अनेक गृहिणींना सतावतो. अशावेळी पालक पनीर भुर्जी हा एक उत्तम पर्याय ठरतो. ही भुर्जी चपाती, पोळी, पराठा, ब्रेड किंवा अगदी भाकरीसोबतही छान लागते. शिवाय ती थंड झाली तरी चवीत फारसा फरक पडत नाही, त्यामुळे डब्यासाठीही अगदी योग्य आहे. पाहूया ही रेसिपी कशी करायची. 

आईने लावलेली सवय भारी की घातक? रात्री केसांना तेल लावून झोपणं चांगलं की केसांचं वाटोळं..

साहित्य 

बटर - १ चमचा 
जिरे - १ चमचा
बेसनाचे पीठ - १ चमचा
बारीक चिरलेला कांदा - १ 
तेल - १ चमचा 
बारीक चिरलेला टोमॅटो - १ 
बारीक चिरलेली हिरवी मिरची - १
धने पावडर - १ चमचा 
लाल मिरची पावडर - १ चमचा
हळद - १ चमचा 
गरम मसाला - १ चमचा 
पालक पेस्ट - 3 चमचे
किसलेले पनीर - १ वाटी
मीठ - चवीनुसार 
कसुरी मेथी - अर्धा चमचा 
कोथिंबीर - आवश्यकतेनुसार
किसलेले आले - १ 

कृती 

1. सगळ्यात आधी पालक धुवून गरम पाण्यात मीठ घालून उकळवून घ्या. नंतर त्याची प्युरी तयार करा. आता एका कढईत बटर घालून त्यात जिरे आणि बेसनाचे पीठ घाला. चांगले भाजल्यानंतर वरुन कांदा आणि तेल घालून पुन्हा परतवून घ्या. 

2. आता बारीक चिरलेला टोमॅटो, हिरवी मिरची, धने पावडर, लाल मिरची पावडर, हळद, गरम मसाला घालून चांगले परतवून घ्या. त्यानंतर त्यात पालकची पेस्ट घालून पुन्हा परतवून घ्या. 

3. वरुन किसलेले पनीर, मीठ, कसुरी मेथी घालून पुन्हा परतवून घ्या. त्यात वरुन कोथिंबीर आणि किसलेले आले घाला. गरमागरम पावासोबत खा पालक पनीर भुर्जी.


Web Title : होटल जैसा पालक पनीर भुर्जी घर पर: आसान, झटपट रेसिपी

Web Summary : होटल जैसा पालक पनीर भुर्जी खाने का मन है? यह झटपट रेसिपी आसान सामग्री का उपयोग करती है। पालक स्वस्थ और बहुमुखी है। इस स्वादिष्ट व्यंजन को रोटी, पराठे या ब्रेड के साथ परोसें; लंचबॉक्स के लिए बिल्कुल सही।

Web Title : Hotel-style Palak Paneer Bhurji at Home: Easy, Quick Recipe

Web Summary : Craving hotel-style Palak Paneer Bhurji? This quick recipe uses simple ingredients. Palak is healthy and versatile. Enjoy this delicious dish with roti, paratha, or bread; perfect for lunchboxes.