Lokmat Sakhi >Food > हॉटेलातल्या एकाचएक चवीपेक्षा भारी चमचमीत मऊ पनीरच्या भाज्या करा घरीच, ४ ट्रिक्स- पनीर पसंद..

हॉटेलातल्या एकाचएक चवीपेक्षा भारी चमचमीत मऊ पनीरच्या भाज्या करा घरीच, ४ ट्रिक्स- पनीर पसंद..

hotel style mutter paneer recipe: how to fry paneer perfectly: soft paneer curry at Home: kitchen hacks for soft paneer: चवीला अगदी मस्त आणि सोप्या पद्धतीने तयार होईल पनीरची भाजी पाहूया रेसिपी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2025 16:27 IST2025-04-22T16:27:17+5:302025-04-22T16:27:45+5:30

hotel style mutter paneer recipe: how to fry paneer perfectly: soft paneer curry at Home: kitchen hacks for soft paneer: चवीला अगदी मस्त आणि सोप्या पद्धतीने तयार होईल पनीरची भाजी पाहूया रेसिपी

how to make hotel style mutter panner recipe how to fry panner make simple and easy step kitchen hacks | हॉटेलातल्या एकाचएक चवीपेक्षा भारी चमचमीत मऊ पनीरच्या भाज्या करा घरीच, ४ ट्रिक्स- पनीर पसंद..

हॉटेलातल्या एकाचएक चवीपेक्षा भारी चमचमीत मऊ पनीरच्या भाज्या करा घरीच, ४ ट्रिक्स- पनीर पसंद..

पनीर हा पदार्थ हल्ली घरोघरी खाल्ला जातो. अगदी पनीरचे पदार्थ देखील आवडीने केले जातात. (how to fry paneer perfectly)परंतु, नेहमी तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळा आला की आपल्याला काही नवीन ट्राय करावेसे वाटते. अशावेळी आपण हॉटेल स्टाइल चमचमीत आणि झणझणीत पनीरची भाजी ट्राय करु शकतो. (hotel style mutter paneer recipe)
हॉटेल स्टाईल भाज्या म्हटलं की सगळ्यात आधी पनीरच्या भाजीचे वेगवगळे प्रकार आपल्याला पाहायला मिळतात. त्यात मटार पनीर, ढाबा स्टाइल पनीर मसाला, पनीर अंगारा, कोल्हापुरी पनीर, पनीर घी रोस्ट या पदार्थांची चव चाखता येते.(soft paneer curry at Home)अनेकदा पनीरची भाजी बनवताना आपण पनीर तळून घेतो. पण पनीर तळताना ते कडक राहाते ज्यामुळे पदार्थाची चव बदलते. घरच्या घरी हॉटेलसारखी पनीरची भाजी बनवण्यासाठी जास्त मेहनत सुद्धा घ्यावी लागणार नाही. चवीला अगदी मस्त आणि सोप्या पद्धतीने तयार होईल पनीरची भाजी पाहूया रेसिपी 

कोकणातील पारंपरिक 'कच्च्या फणसाची भाजी', कुयरीच्या भाजीची खास घरगुती चमचमीत रेसिपी, उन्हाळ्यात करायलाच हवी

साहित्य 

चिरलेले कांदे - ६ 
तेल - ५ मोठा चमचा 
मीठ - चिमूटभर 
मटार - १ कप 
टोमॅटो - ३ चिरलेले
आल्याचा तुकडा - १ 
लसूण पाकळ्या - ३ ते ४
काजू - ८ ते १० 
पाणी - आवश्यकतेनुसार 
साखर - चवीनुसार 
पनीर - २५० ग्रॅम
किचन किंग मसाला - १ मोठा चमचा 
लाल तिखट - १ चमचा 
धनेपूड - १ मोठा चमचा 
बारीक चिरलेली कोथिंबीर - १ चमचा 
गरम पाणी - आवश्यकतेनुसार 
बटर - १ मोठा चमचा 
कसुरी मेथी - १ मोठा चमचा 

">

कृती 

1. सगळ्यात आधी तवा तापवून त्यात चमचाभर तेल घाला. त्यात चिरलेला कांदा आणि मीठ घालून परतवून घ्या. 

2. कांदा मऊ झाल्यानंतर त्यात टोमॅटो, आले, लसूण आणि काजू घालून पुन्हा एकदा परतवून घ्या. 

3. आता एका भांड्यात पाणी उकळत ठेवून त्यात मीठ, साखर आणि धुतलेला मटार घालून उकळवून घ्या. 

4. शिजवलेला कांदा-लसूण मसाला मिक्सरमध्ये वाटून त्याची पेस्ट तयार करा. 

5. पनीरचे तुकडे कापून पॅनमध्ये तेल गरम करा. कडकडीत तेल गरम झाल्यावर पनीर घाला. सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्या. 

6. आता एक पॅन ठेवून त्यात ४ चमचे तेल घालून गरम करुन घ्या. त्यात मिक्सरमधील वाटण घालून चांगला परतून घ्या. त्यात किचन किंग मसाला, लाल तिखट, धनेपूड, मीठ, साखर, चिरलेली कोथिंबीर घालून चांगले मिक्स करा. 

7. आता गरम पाण्यासकट उकडलेले मटार मिश्रणात घाला. मसाल्याच्या प्रमाणानुसार ग्रेव्हीमध्ये गरम पाणी घाला. बटर घालून ग्रेव्हीला उकळी येऊ द्या. 

8. पनीर आणि कसुरी मेथी घालून एकजीव करा. आता पुन्हा एकदा चांगले परतवून शिजू द्या. तयार होईल हॉटेल स्टाइल पनीरची भाजी 

 

Web Title: how to make hotel style mutter panner recipe how to fry panner make simple and easy step kitchen hacks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.