पावसाळा सुरु झाला की, रस्त्याच्या कडेला, हॉटेल किंवा छोट्या स्नॅक्स कॉर्नरजवळ हमखास चव चाखायला मिळते ती गरमागरम वडापाव आणि कांदाभजीची.(Monsoon Food recipe) वाफाळलेला चहा आणि त्याच्यासोबत गरमागरम वडापावची बात काही औरच... वडापाव हा जगभरात फेमस असलेला पदार्थ.(vada pav bagel recipe) याला पाहताच खाण्याचा मोह काही आवरता येत नाही. खिशाला परवडणारा आणि भूक भागवणारा पदार्थ अर्थात वडापाव.पण आपण कधी वडापाव बॅगेल खाल्ले आहे का? (fusion vada pav at home)
वडापाव हा महाराष्ट्राचा सर्वात लोकप्रिय स्ट्रीट फूड आणि बॅगेल हा अमेरिकन ब्रेडचा एक प्रकार.(monsoon special snacks) याचं भन्नाट आणि युनिक कॉम्बिनेशन म्हणजेच वडा पाव बॅगेल. पारंपरिक बटाटाचा वडा सॉफ्ट गोलसर बॅगेल ब्रेडमध्ये ठेवून याचे फिलिंग तयार केले जाते.(how to make vada pav bagel) आणि पावामध्ये हा पदार्थ भरुन चटणी-मिरचीसोबत खाल्ले जाते. खायला क्रिस्पी आणि चवीला अगदी टेस्टी लागणारा हा पदार्थ कसा बनवायचा पाहूया. यासाठी लागणारे साहित्य आणि कृती जाणून घेऊ. (street food fusion ideas)
सकाळच्या घाईत डब्यासाठी काय करायचं? झटपट होणारी मोड आलेली मसूरची उसळ, चमचमीत- झणझणीत रेसिपी
साहित्य
तेल - आवश्यकतेनुसार
चिरलेले आले - १ चमचा
चिरलेल्या हिरव्या मिरच्या - १ ते २
हळद पावडर - १/४ चमचा
उकडलेले बटाटे - २ ते ३
आमचूर पावडर - अर्धा चमचा
कोथिंबीर
मीठ - चवीनुसार
मळलेले कणिक
कृती
1. सगळ्यात आधी गॅसवर पॅन गरम करत ठेवा. त्यानंतर त्यात तेल घालून आले आणि हिरवी मिरची चांगली परतून घ्या. हळद घालून त्यात उकडलेले बटाट्याचे तुकडे घालून चांगले परतून घ्या. आता वरुन आमचूर पावडर, कोथिंबीर आणि मीठ घालून पुन्हा एकदा परतून घ्या. बटाट्याला चांगले मॅश करा.
2. पीठाचा गोळा घेऊन त्याची उभी आकारात चपाती लाटा. तयार उभ्या चपातीला मध्यभागी कापून त्याचे दोन तुकडे करा. एका चपातीच्या भागात तयार बटाट्याची भाजी उभ्या आकारात भरा. चपातीच्या कडांना पाणी लावून ती उभ्या आकारतच बंद करा.
3. चपातीला हाताने फिरवा. दोन्ही बाजूचे टोक बंद करुन घ्या. दोन्ही टोक आता एकमेकांना जोडून घ्या. त्याला गोलाकार आकार द्या.
4. कढईमध्ये तेल गरम करुन घ्या. तयार बॅगेला मध्यम आचेवर तळून घ्या. गरमागरम चहा आणि हिरव्या चटणीसोबत खा.