ताटात वाढलेली भाजी पाहून घरातील मंडळी नाक मुरडतात? मुले देखील भाज्यांना पाहून खाण्यास टाळाटाळ करतात.(Healthy breakfast recipe) अशावेळी नेमकं काय करावं हे आपल्यालापैकी अनेकांना समजत नाही. सकाळच्या नाश्त्यात रोज चमचमीत आणि झणझणीत पदार्थ खाण्याची आवड प्रत्येकाला असते. (Healthy Indian breakfast)
आपल्याला देखील तेच तेच पदार्थ बनवायला कंटाळा येतो.(Quick vegetable breakfast) पण अशावेळी पौष्टिक आणि हेल्दी पदार्थ नेमके काय बनवावे असा प्रश्न पडला असेल तर भाज्यांचा पॅनकेक अर्थात पराठा ट्राय करुन पाहा. यामध्ये रंगबेरंगी भाज्या घालून आपण तो तयार करु शकतो.(Morning breakfast recipes) अगदी १५ मिनिटांत तयार होणारा पौष्टिक आणि हेल्दी पदार्थ आहे. यामुळे आपल्या शरीरात एनर्जी टिकून राहिल.(Low-oil breakfast recipes) सकाळचा नाश्ता इतका पौष्टिक असल्यास आपल्याला लवकर भूक देखील लागणार नाही. भाज्यांचा पौष्टिक पराठा कसा बनवायचा पाहूया. (Tiffin ideas with vegetables)
७ ते ८ दिवस टिकणारे खुसखुशीत दुधीचे थेपले, उन्हाळा स्पेशल हलका-फुलका नाश्ता...
साहित्य
किसलेली कोबी - अर्धा कप
चिरलेला कांदा - १
चिरलेला टोमॅटो - १
चिरलेली हिरवी मिरची - २
चिरलेला लसूण - २
कोथिंबीर - आवश्यकतेनुसार
लाल तिखट - १ चमचा
धने पावडर - २ तमते
जिरे पावडर - १ चमचा
मीठ - चवीनुसार
तांदळाचे पीठ - अर्धा कप
पाणी
तेल - ४ ते ५ चमचे
चिली फेलेक्स - २ ते ३ चमचे
उन्हाळ्यात खायलाच हवी तोंडाची चव वाढवणारी शेवग्याची कढी, आंबटगोड कढी म्हणजे सुख-पाहा रेसिपी
कृती
1. सगळ्यात आधी एका बाऊलमध्ये चिरलेली कोबी, कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची, लसूण, कोथिंबीर, सर्व मसाले, मीठ आणि तांदळाचे पीठ घाला.
2. सर्व साहित्य एकत्र करुन त्यात पाणी घालून जाडसर मिश्रण तयार करा.
3. आता पॅनमध्ये तेल घालून तयार मिश्रण पॅनकेकच्या आकारामध्ये पसरवून घ्या. बाजूने तेल घाला आणि वरुन चिली फेलेक्स पसरवा.
4. दोन्ही बाजूने व्यवस्थित शिजवून घ्या, तयार होईल १५ मिनिटांत कुरकुरीत भाज्यांचा पराठा. चटणी किंवा सॉससोबत आवडीने खा.