आजच्या धावपळीच्या जीवनात तासंतास स्वयंपाकघरात काम करणं खरंतर कठीण. सकाळच्या नाश्त्यापासून रात्रीच्या जेवणापर्यंत आपण काय बनवयाचं? या विचारात अडकलेले असतो.(Green moong dosa recipe) सकाळी नाश्त्याच्या वेळी तर वेळ कमी आणि भूक जास्त लागते.( Moong dal dosa without soaking) आपल्यापैकी अनेकांच्या घरात नाश्त्याला रवा, उपमा, पोहे, इडली, डोसा असे विविध प्रकार बनत असतील. पण पौष्टिक पण चटपटीत पदार्थ कसे बनवायचे हा प्रश्न असतो. (Instant green gram dosa)
डोसा किंवा इडली बनवण्याचे काम म्हणजे वेळखाऊ. तांदूळ निवडण्यापासून ते आंबवण्याची प्रक्रिया देखील खूप मोठी असते. पण आपल्याला हेल्दी आणि पौष्टिक पदार्थ खायचा असेल तर अवघ्या १० मिनिटांत तयार होणारा कुरकुरीत हिरव्या मुगाचा डोसा ट्राय करुन पाहा.
हिरव्या मुगाचा डोसा हा विशेषतः डायट करणाऱ्यांसाठी, मुलांसाठी, ऑफिसला जाणाऱ्यांसाठी खास पदार्थ आहे. हिवाळ्यात जास्त पौष्टिक काहीतरी खायचं असेल तर उत्तम पर्याय आहे. पचनास हलका असल्यामुळे हा डोसा शरीरावर ताण न आणता आपल्या भरपूर एनर्जी देतो. शिवाय बेसन किंवा ओट्स डोसापेक्षा हा अधिक पौष्टिक आणि नैसर्गिक प्रोटीनने समृद्ध आहे.
हिवाळ्यात प्या नाचणीचे हॉट चॉकलेट! मुलांसाठी संध्याकाळचा खास खाऊ, हाडेही होतील बळकट - पाहा रेसिपी
साहित्य
भिजवलेले हिरवे मूग - १ कप
हिरव्या मिरच्या - ३
लसूण पाकळ्या - १० ते १२
आलं पेस्ट - १ चमचा
जिरे - १ चमचा
कोथिंबीर - आवश्यकतेनुसार
मीठ - चवीनुसार
ओला नारळाचा किस - २ चमचे
नाचणी पीठ - अर्धा कप
पाणी- आवश्यकतेनुसार
हळद - १ चमचा
तूप - १ चमचा
कृती
1. सगळ्यात आधी आपल्याला हिरवे मूग स्वच्छ धुवून ६ ते ७ तास भिजवावे लागतील. त्यानंतर मिक्सरच्या भांड्यात हिरव्या मिरच्या, लसूण पाकळ्या, आलं पेस्ट, जिरे, कोथिंबीर, भिजवलेले मूग आणि मीठ घालून जाडसर पेस्ट तयार करा.
2. आता त्याच पेस्टमध्ये किसलेला नारळ आणि नाचणी पीठ घाला. वरुन आवश्यकतेनुसार पाणी घालून त्याचे बॅटर तयार करा.
3. हे बॅटर पसरट भांड्यात घेऊन त्यात हळद आणि वरुन पाणी घालून चांगले ढवळून घ्या.
4. गॅस गरम करुन त्यावर तेल किंवा तूप पसरवा. डोसाचे बॅटर पसरवून तूप लावून दोन्ही बाजूने भाजून घ्या.
