Join us  

नेहमीच्या कोशिंबीरी खाण्याचा कंटाळा आलाय? ग्रीन गॉडेस सॅलेड करा, कोशिंबीरीला क्रंची ट्विस्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2022 2:55 PM

Food and recipe: काकडी, टोमॅटो, कोबी यांच्या त्याच त्या नेहमीच्या कोशिंबीरी खाऊन कंटाळा आला असेल, तर हा नवा क्रंची- मंची सॅलेड प्रकार करून बघा.

ठळक मुद्देसॅलेड प्रकारात काही नवी रेसिपी ट्राय करून बघावीशी वाटत असेल तर करून बघा ही मस्त रेसिपी

जेवणात तोंडी लावायला सॅलेड असेल, तर नक्कीच जेवणाची रंगत आणखी वाढते. सॅलेड, लोणची, चटण्या, पापड असं सगळं ताटात असेल, तेव्हा ताट कसं छान सजलेलं दिसतं आणि मग लगेचच जेवावंही वाटतं... पण कधी कधी त्याच त्या प्रकारच्या पारंपरिक रेसिपी खाण्याचाही कंटाळा येताेच की.. कोशिंबीरीचीही नेहमीचीच चव कधीकधी बोअर होऊन जाते... असंच तुमचंही झालं असेल किंवा मग सॅलेड (tasty dish of salad) प्रकारात काही नवी रेसिपी ट्राय करून बघावीशी वाटत असेल तर करून बघा ही मस्त रेसिपी (How to make green goddess salad).. 

 

ग्रीन गॉडेस सॅलेड.. सॅलेडचा हा नवा प्रकार आहे भलताच भारी.. ही रेसिपी आहारतज्ज्ञ पुजा माखिजा यांनी त्यांच्या poojamakhija या इन्स्टाग्राम पेजवर शेअर केली आहे. ही रेसिपी तुम्ही जेवणात कोशिंबीर किंवा सॅलेड म्हणूनही खाऊ शकता किंवा मग सकाळी ब्रेकफास्ट म्हणूनही खाऊ शकता.. तसंही सध्या कच्च्या भाज्या ब्रेकफास्ट म्हणून खाण्याचा फिटनेस ट्रेण्ड आहे.. तुम्हीही अशाच प्रकारचं डाएट फॉलो करत असाल, तर हा तुमच्यासाठी एक परफेक्ट सॅलेड ब्रेकफास्ट होऊ शकतो. 

 

ग्रीन गॉडेस सॅलेड करण्यासाठी लागणारं साहित्य..कोबी, काकडी, कांद्याची पात, पालक दोन वाट्या, ७ ते ८ बदाम, ४ ते ५ लसूण पाकळ्या, लहान आकाराचा अर्धा कांदा, २ टेबलस्पून लिंबाचा रस, १ टी स्पून ॲपल साईड व्हिनेगर, १ टी स्पून न्यूट्रीशनल यीस्ट, १ टीस्पून ऑलिव्ह ऑईल, मिरेपूड आणि चवीनुसार मीठ. 

कसं करायचं ग्रीन गॉडेस सॅलेड?How to make green godess salad?- ग्रीन गॉडेस सॅलेड करण्यासाठी सगळ्यात आधी कोबी, कांद्याची पात आणि काकडी यांचे तुमच्या आवडीनुसार काप करून घ्या. 

- साधारणपणे कोबी आणि काकडी एकेक वाटी घ्या. कांद्याची पात पाऊण वाटी घ्या.- आता पालक, बदाम, लसूण, कांदा, व्हिनेगर, लिंबाचा रस, यीस्ट, ऑलीव्ह ऑईल हे सगळं साहित्य मिक्सरमध्ये टाका आणि मिक्सर फिरवून त्याची बारीक पेस्ट करून घ्या.- ही पेस्ट कोबी, कांद्याची पात आणि काकडीचे काप ज्या बाऊलमध्ये ठेवले आहेत, त्यामध्ये टाका. 

फ्लॉवरचं भरीत खाल्लं आहे कधी? फ्लॉवर भाजून भरीत, करून पाहा भन्नाट रेसिपी- यामध्ये आता चवीनुसार मीरेपुड आणि मीठ टाका. तुम्ही यावर चाट मसालाही टाकू शकता. थोडा क्रंच ॲड करायचा असेल तर G2 या कंपनीची मस्त कुरकुरीत मूगडाळही यात घालू शकता.- सगळे मिश्रण व्यवस्थित हलवून घेतले की झाले आपले सॅलेड तयार..- जेवणासोबत तोंडी लावायला किंवा मग ब्रेकफास्ट म्हणूनही तुम्ही हे सॅलेड खाऊ शकता. यात तुमच्या आवडीनुसार तुम्ही आणखीही भाज्या टाकू शकता. 

 

टॅग्स :अन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.