Lokmat Sakhi >Food > गारेगार मस्त सोलकढीला गुलाबी रंग येण्यासाठी ३ टिप्स, 'अशी ' करा सोलकढी, उन्हाळ्यात घरबसल्या गोव्याचा आनंद

गारेगार मस्त सोलकढीला गुलाबी रंग येण्यासाठी ३ टिप्स, 'अशी ' करा सोलकढी, उन्हाळ्यात घरबसल्या गोव्याचा आनंद

Goan Solkadhi recipe: Konkan-style Solkadhi: How to make natural pink Solkadhi: Authentic Goan solkadhi with coconut and kokum: Goan Solkadhi with natural pink color: Traditional Solkadhi preparation: सोलकढी बनवत असू तर त्याला परफेक्ट गुलाबी रंग येण्यासाठी या ३ टिप्स लक्षात ठेवा, पाहूयात सोपी रेसिपी.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2025 12:56 IST2025-03-21T12:55:18+5:302025-03-21T12:56:18+5:30

Goan Solkadhi recipe: Konkan-style Solkadhi: How to make natural pink Solkadhi: Authentic Goan solkadhi with coconut and kokum: Goan Solkadhi with natural pink color: Traditional Solkadhi preparation: सोलकढी बनवत असू तर त्याला परफेक्ट गुलाबी रंग येण्यासाठी या ३ टिप्स लक्षात ठेवा, पाहूयात सोपी रेसिपी.

how to make goan konkan style solkadhi recipe follow this simple 3 tips for natural pink colour | गारेगार मस्त सोलकढीला गुलाबी रंग येण्यासाठी ३ टिप्स, 'अशी ' करा सोलकढी, उन्हाळ्यात घरबसल्या गोव्याचा आनंद

गारेगार मस्त सोलकढीला गुलाबी रंग येण्यासाठी ३ टिप्स, 'अशी ' करा सोलकढी, उन्हाळ्यात घरबसल्या गोव्याचा आनंद

उन्हाळा सुरु झाला की, अंगाची लाही लाही होते. ऋतूमानानुसार आपल्या आहारात देखील अनेक बदल घडतात.(Solkadhi recipe with kokum and coconut) शरीराला अधिक थंडावा देणारे पदार्थ आपण आहारात खातो. तेलाचे आणि तिखट पदार्थ कमी खाऊन पचनास आणि शरीराला हायड्रेट करणाऱ्या पदार्थांवर आपला भर असतो.(Tips for making perfect Solkadhi) त्यातील एक पदार्थ सोलकढी. (Refreshing Goan drink recipe)
सोलकढी हा असा पदार्थ आहे, जो अनेक भागांमध्ये जेवल्यानंतर प्यायला जातो. (Goan Solkadhi recipe)कोकणातील हा पदार्थ असला तरी प्रत्येक भागानुसार त्याची चव बदलते. नारळाचे दूध आणि कोकमच्या आगळापासून ही रेसिपी तयार केली जाते. पचनास हलकी असल्यामुळे उन्हाळ्यात हे अधिक प्यायले जाते. तिखट, गोड आणि आंबट अशी समप्रमाणात याची चव लागते. यामध्ये अँटीऑक्सि़डंट, फायबर्स, मॅग्नेशियम आणि जीवनसत्त्वाचे प्रमाण अधिक असते.(Traditional Solkadhi preparation) आपणही सोलकढी बनवत असू तर त्याला परफेक्ट गुलाबी रंग येण्यासाठी या ३ टिप्स लक्षात ठेवा, पाहूयात सोपी रेसिपी. 

महिनाभर टिकेल खमंग सोलापूरी शेंगदाणा चटणी; भात-भाकरीसोबत खा, पाहा सोपी पद्धत

साहित्य 

कोकम / आमसुलं -  १० ते १२
खोवलेलं ओलं खोबरं - १ कप
हिरवी मिरची- १ चिरलेली 
लसूण पाकळ्या - १ ते २ 
गरम पाणी - आवश्यकतेनुसार 
किसलेलं बीट - १ कप 
बारीक चिरलेली कोथिंबीर - आवश्यकतेनुसार 
मीठ- चवीनुसार 

">

 

कृती 

1. सगळ्यात आधी कोकममध्ये गरम पाणी घालून अर्धा तास भिजत ठेवा. 

2. त्यानंतर मिक्सरमध्ये ओल्या नारळाचा किस, मिरची आणि २ लसूण पाकळ्या आणि एक कप गरम पाणी घालून वाटून घ्या. 

3. बाऊलमध्ये गाळणी घेवून त्यावर सुती रुमाला ठेवा. आता नारळाची तयार पेस्ट गाळून घ्या. उरलेल्या नारळाचा चव आणि कपभर पाणी घालून वाटून घ्या. पुन्हा गाळून घ्या. 

4. उरलेल्या नारळाची चव भाजीत किंवा चटणीसाठी वापरा. आता कोकमला हाताने चांगले मॅश करा, ज्यामुळे त्याचा रंग येईल. 

5. कोकमने सोलकढीला रंग येत नसेल तर किसलेला बीट कोकमच्या आगळमध्ये मिक्स करा. यामुळे अपचनाचा त्रास कमी होतो. 

6. कोकमचा रस गाळून नारळाच्या दूधात घाला. वरुन कोथिंबीर भुरभूरा. चवीनुसार मीठ घालून फ्रीजमध्ये काही वेळ थंड होण्यासाठी ठेवा. 

7. तयार होईल गारेगार मस्त सोलकढी...  

 

Web Title: how to make goan konkan style solkadhi recipe follow this simple 3 tips for natural pink colour

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.