आप्पे हा खरंतर दाक्षिणात्य पदार्थ असला तरीही सध्या कॉमन पदार्थ झाला आहे. सकाळच्या नाश्त्याला काय बनवयाचं असा प्रश्न अनेकांना असतो.(idli batter recipes) सुट्टीच्या दिवशी हमखास अनेक घरात डोसा किंवा इडली सहज बनवली जाते.(fusion appe recipe) पण अनेकदा बॅटर उरते. अशावेळी नेमकं काय करावं आपल्याला सुचतं नाही. पण बॅटर फेकून देण्याऐवजी आपण त्याचे आप्पे बनवू शकतो.(indian italian fusion food)
आप्पे हा पदार्थ रव्यापासून किंवा तांदळाच्या पीठापासून देखील बनवता येतो. यामध्ये कांदा-टोमॅटो घालून बॅटर तयार करुन आप्पे पात्रात घालून शिजवला जातो.(breakfast recipe ideas) गरमागरम आप्पे आणि खोबऱ्याच्या चटणीसोबत खाल्ले जाते.(leftover idli batter uses) पण त्याच पद्धतीचे पदार्थ खाणे आपल्याला अनेकदा नकोसे वाटतात. अशावेळी आपण इंडियन-इटालियन आप्पे नक्की ट्राय करुन बघू शकतो. टम्म फुगलेले फ्यूजन आप्पे करण्यासाठी खास सोपी ट्रिक. सकाळचा नाश्ता होईल अगदी परफेक्ट. पाहूया सोपी रेसिपी.
कोथिंबीरी लवकर सडते, मिरची काळी पडते? 'या' पद्धतीने ठेवली तर आठवडाभर फ्रीजशिवायही राहिल हिरवीगार
साहित्य
रेड सॉससाठी
टोमॅटो - ३ ते ४
ऑलिव्ह ऑइल - १ चमचा
रेड चिली फ्लेक्स - १ चमचा
बारीक चिरलेला लसूण - १ चमचा
बारीक चिरलेला कांदा -१
मिक्स हर्ब्स- १ चमचा
साखर - १ चमचा
मीठ
तुळशीची पाने
आप्पेसाठी
ऑलिव्ह ऑइल - १ चमचा
बारीक चिरलेला कांदा - १/४ कप
बारीक चिरलेली मिक्स शिमला मिरची- १/४ कप
उकडलेला मका - १/४ कप
चिली फ्लेक्स - १ चमचा
मिक्स हर्ब्स - १ चमचा
मीठ - चवीनुसार
इडली बॅटर - आवश्यकतेनुसार
चीज - आवश्यकतेनुसार
तेल - आवश्यकतेनुसार
१५ मिनिटांत करा सालाच्या मूगडाळीचा कुरकुरीत खाकरा! पौष्टिक आणि कुरकुरीत खाकरा लगेच होईल फस्त
कृती
1. सगळ्यात आधी कढई तापवून घ्या. त्यावर तेल पसरवून कांदा, शिमला मिरची, उकडलेला मका, चिली फ्लेक्स, मिक्स हर्ब्स आणि मीठ घालून सर्व व्यवस्थित मिक्स करुन शिजवून घ्या.
2. तयार मिश्रण एका प्लेटमध्ये काढून घ्या. आता दुसऱ्या पॅनमध्ये तेल घालून त्यात रेड चिली फ्लेक्स, बारीक चिरलेला लसूण, कांदा, मिक्स हर्ब्स, साखर घाला. वरुन टोमॅटोची प्युरी आणि मीठ घालून वाफ काढून घ्या. त्यावर तुळशीची पाने घाला.
3. आता इडली बॅटरमध्ये मीठ घालून शिजवलेल्या भाज्या घाला. सगळं व्यवस्थित मिक्स करुन घ्या.आता आप्पे पात्रांना बटर लावून घ्या. त्यात तयार बॅटर घालून वरुन छोटे छोटे चीज क्यूब घाला. पुन्हा बॅटर घालून चीज क्यूब बंद करा.
4. मंद आचेवर व्यवस्थित आप्पे शिजवून घ्या. त्यानंतर सर्व्ह करताना तयार रेड सॉसमध्ये चीज आप्पे घालून आवडीने खा इंडियन-इटालियन आप्पे.
