आपल्या स्वयंपाकघरात रोज वेगवेगळ्या पद्धतीच्या भाज्या बनवल्या जातात. पण त्यातील काही आवडीच्या असतात तर काही ना आवडत्या.(French beans chutney recipe) अनेकदा घरात फरसबीची भाजी, उसळ किंवा भातासोबत साधी डाळ-भाजी खाल्ली जाते. आपल्या ताटात डाव्या बाजूला चटणींचा समावेश मोठ्या प्रमाणात असतो.(Farasbi chutney recipe in Marathi) भाजी नसेल किंवा साध्या वरण -भातासोबत कुरकुरीत आणि झणझणीत चटणी फार चविष्ट लागते. अनेकांना फरसबीची भाजी आवडत नाही. पण याच भाजीची आपण चटणी देखील ट्राय करु शकतो. (Green beans chutney Indian style)चटणी म्हटलं की आपल्याला कोथिंबीर, शेंगदाणे, लूसण, नारळ किंवा लाल मिरची आठवते. पण भाज्यांपासून चटण्या करणं थोडं वेगळं आणि मजेशीर असतं.(Healthy chutney for rice and roti) फरसबीमध्ये फायबर, जीवनसत्त्व आणि खनिजे आढळतात. ज्यामुळे आरोग्यासाठी तर चांगली असतेच पण चवीलाही उत्तम लागते. भाज्या खायच्या नसतात त्यांनाही ही चटणी आवडते कारण तिची टेक्स्चर आणि टेस्ट अगदी हटके असते. (Quick chutney recipes Indian)
साहित्य
फरसबी - १० ते १२ लसूण पाकळ्या - ७ ते ८ हिरव्या मिरच्या - ४ ते ५ तेल - १ चमचा मीठ - चवीनुसार आमचूर पावडर - चवीनुसार पाणी - आवश्यकतेनुसार
महानवमी स्पेशल: १५ मिनिटांत होईल सफरचंदाची खीर, देवीसाठी होईल शाही नैवैद्य - करायलाही सोपी
कृती
1. सगळ्यात आधी फरसबी पाण्याने धुवून सुकू द्या. नंतर व्यवस्थित तोडून घ्या. एका पॅनमध्ये तेल गरम करुन त्यात फरसबी, लसूण पाकळ्या आणि हिरव्या मिरच्या कुरकुरीत फ्राय करा.
2. आता एका बाऊलमध्ये काढून थंड होऊ द्या. त्यात मीठ, आमचूर पावडर घाला. पाणी घालून मिक्सरमध्ये पेस्ट तयार करा. तयार चटणीत चमचाभर तेल घालून भात किंवा भाजीसोबत आवडीने खा. या चटणीची चव अधिक छान आणि झणझणीत लागते.
Web Summary : Transform French beans into a tasty chutney if you dislike the vegetable. This quick recipe uses green beans, garlic, green chilies, and spices. Fry ingredients, blend with water, and enjoy this unique, flavorful chutney with rice or roti. It's a healthy, fiber-rich alternative, perfect for those who dislike the regular vegetable.
Web Summary : अगर आपको फरसबी की सब्जी पसंद नहीं है, तो इसे स्वादिष्ट चटनी में बदल दें। इस झटपट रेसिपी में हरी बीन्स, लहसुन, हरी मिर्च और मसालों का उपयोग होता है। सामग्री को भूनें, पानी के साथ पीसें, और इस अनोखी, स्वादिष्ट चटनी को चावल या रोटी के साथ आनंद लें। यह एक स्वस्थ, फाइबर युक्त विकल्प है, जो उन लोगों के लिए एकदम सही है जिन्हें नियमित सब्जी पसंद नहीं है।