आपल्यापैकी अनेकांच्या घराच फरसबीची भाजी खाल्ली जात नाही.(Farasbi batata masala fry) कधी पुलाव, मसालेभात किंवा कुर्मा भाजीतच तिची चव चाखयला मिळते.(Cluster beans potato fry) ही भाजी साधी आणि बेचव असल्यामुळे काहीजण आवडीने खात नाही.(Tawa fry recipe) पण फरसबीला चांगला मसाला, योग्य तडका आणि थोडासा ट्विस्ट दिला तर साधी भाजीसुद्धा चविष्ट लागू शकते.(Hotel-style sabzi)सकाळी कमी वेळ, ऑफिसला जायचं घाई, मुलांचे डबे, घरातील कामं या सगळ्यात १५ मिनिटांत चविष्ट आणि पौष्टिक भाजी करणं म्हणजे मोठा पराक्रम वाटतो.(Indian masala fry recipe) पण ही मसाला फ्राय इतकी कुरकुरीत, झणझणीत भाजी चपाती किंवा भाकरीसोबत मस्त लागते की घरातल्या “फरसबी न आवडणाऱ्या” लोकांनाही पुन्हा एकदा वाढून घ्यावीशी वाटते. पाहूया साहित्य आणि कृती. (Quick veg fry recipe)
साहित्य
शेंगदाणे - १ चमचा धने - १ चमचा सुक्या लाल मिरच्या - २ ते ३जिरे - १ चमचा तीळ - १ चमचा काळी मिरी - अर्धा चमचा लसूण - ४ पाकळ्या किसलेले खोबरे - १ चमचाकढीपत्ता - ७ ते ८ पानंतेल - ३ चमचे मोहरी - १ चमचाउडीद डाळ - १ चमचा बारीक चिरलेले बटाटे - २५० ग्रॅममीठ - चवीनुसार बारीक चिरलेली फरसबी - २५० ग्रॅमहळद - अर्धा चमचा
कृती
1. सगळ्यात आधी पॅनमध्ये शेंगदाणे, धने, सुक्या लाल मिरच्या, जिरे, तीळ, काळी मिरी, लसूण, ओले खोबरे परतवून घ्या. भाजलेला मसाला थंड झाल्यानंतर मिक्सरमध्ये वाटून घ्या.
2. त्यात पॅनमध्ये तेल गरम करुन त्यात मोहरी, उडीद डाळ, कढीपत्ता आणि बटाटे घालून परतवून घ्या. वरुन झाकण ठेवून मंद आचेवर शिजू द्या. त्यानंतर फरसबी स्वच्छ धुवून त्यात घाला. हळद, मीठ घालून परतवून घ्या. पुन्हा झाकण ठेवून वाफेवर शिजू द्या.
3. यानंतर त्यात वाटलेला मसाला घालून पुन्हा परतवून घ्या. भाजी व्यवस्थित शिजल्यानंतर गरमागरम चपातीसोबत खा.
Web Summary : This cluster beans and potato fry recipe transforms a simple vegetable into a flavorful dish. With a special blend of spices and a quick cooking method, it's a perfect side for chapatis and bhakris, even appealing to those who dislike cluster beans.
Web Summary : यह ग्वार फली और आलू फ्राई की रेसिपी एक साधारण सब्जी को स्वादिष्ट व्यंजन में बदल देती है। मसालों के एक विशेष मिश्रण और त्वरित खाना पकाने की विधि के साथ, यह चपाती और भाकरी के लिए एक उत्तम साइड डिश है, जो ग्वार फली नापसंद करने वालों को भी पसंद आएगी।