Join us  

खूप थकवा येतो- गळून गेल्यासारखं होतं? स्मृती इराणींनी सांगितलेलं 'हे' सूप प्या- अशक्तपणा जाईल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2024 12:00 PM

Drumstick Soup Recipe By Smriti Irani: बहुतांश महिलांना अशक्तपणाचा त्रास जाणवतो. त्यांच्यासाठीच स्मृती इराणी यांनी ही एक खास रेसिपी सांगितली आहे. (Iron rich soup for anemic person)

ठळक मुद्देयामुळे शरीराला भरपूर लोह मिळेल आणि ॲनिमियाचा त्रास कमी होईल.

बहुतांश जणींची अशी तक्रार असते की थोडं जास्तीचं काम झालं तर त्यांना लगेचच खूप थकवा येतो. गळून गेल्यासारखं वाटतं. ज्या महिलांच्या शरीरात लोह कमी असतं, अशा महिलांना असा अशक्तपणा वारंवार जाणवतो. भारतात तर बहुसंख्य महिलांमध्ये लोहाची कमतरता दिसून येते. यालाच आपण ॲनिमिया असंही म्हणतो. त्यामुळे आठवड्यातून एकदा तरी कुटूंबातील सर्वांना स्मृती इराणी यांनी सांगितलेलं (drumstick soup recipe by Smriti Irani) हे खास ड्रमस्टिक सूप प्यायला द्या आणि तुम्हीही आवर्जून प्या (How to make drumstick soup). यामुळे शरीराला भरपूर लोह मिळेल आणि ॲनिमियाचा त्रास कमी होईल. (best food for anemia)

ड्रमस्टिक सूप करण्याची स्मृती इराणी यांची खास रेसिपी

 

साहित्य

मसूर डाळ १ कप

शेवग्याच्या २ ते ३ शेंगा

१ मध्यम आकाराचा कांदा

शिल्पा शेट्टी म्हणते- मुलींनी श्रीमंत मुलांशी लग्न केलं तर काय चुकलं? राजशी लग्न केल्यानंतर मलाही.... 

थोडंसं आलं

१ मध्यम आकाराचा टोमॅटाे

४ ते ५ कप पाणी

१ टेबलस्पून तूप

'हा' त्रास असणाऱ्या लोकांनी लसूण खाणं टाळावं, बघा लसूण खायचाच असल्यास कसा- किती खावा?

अर्धा टीस्पून मिरेपूड

अर्धा टीस्पून धने जीरे पूड

चवीनुसार मीठ

३ ते ४ लसूण पाकळ्या

 

कृती

१. सगळ्यात आधी गॅसवर कुकर गरम करायला ठेवा.

२. कुकर गरम झाल्यावर त्यात तूप टाका. आणि त्यामध्ये शेवग्याच्या शेंगांचे काप, बारीक चिरलेला कांदा- टोमॅटो, लसूण पाकळ्या, मसूर डाळ असं सगळं टाकून परतून घ्या.

आयशॅडो व्यवस्थित लावताच येत नाही? ५ टिप्स लक्षात ठेवा- डोळ्यांचा मेकअप होईल परफेक्ट

३. हे पदार्थ परतून झाले की त्यात पाणी घाला आणि धने पूड, जीरेपूड, मीरेपूड घाला. तुम्हाला आवडणारे इतरही मसाल्याचे पदार्थ तुम्ही घालू शकता.

४. चवीनुसार मीठ घातल्यानंतर कुकरचं झाकण लावून घ्या. २ ते ३ शिट्टया होईपर्यंत हे मिश्रण उकडून घ्या. यानंतर गॅस बंद करा.

५. उकडलेले पदार्थ थंड झाल्यानंतर मिक्सरमधून बारीक फिरवून घ्या आणि गाळणीने गाळून घ्या. 

६. पुन्हा थोडंसं तूप टाकून हे मिश्रण चांगलं उकळून घ्या. गरमागरम ड्रमस्टिक सूप किंवा शेवग्याच्या शेंगांचं सूप झालं तयार. 

 

टॅग्स :अन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.स्मृती इराणीमहिलाअ‍ॅनिमिया