शेवग्याची शेंग आरोग्यासाठी सूपरफूड मानली जाते. सध्याच्या जीवनशैलीत आरोग्य जपण्यासाठी सुपरफूड्सचा समावेश करणं अधिक गरजेचे झाले आहे.(Drumstick leaves pickle recipe) या सुपरफूडपैकी शेवग्याची शेंग. ( Moringa leaves pickle recipe) शेवग्याच्या शेंगासह, त्याच्या पानांचे आरोग्याला जबरदस्त फायदे आहेत. यापासून आपण सूप, भाजी, पराठा, थालीपीठ सारखे अनेक पदार्थ खाल्ले असतीलच पण शेवग्याच्या शेंगाचे लोणचे कधी खाल्ले आहे का? कसे बनवायचे पाहूया. (Drumstick pickle recipe in Marathi)
साहित्य
पिवळी मोहरी - ४ चमचेलाल मिरची पावडर - १ चमचा लोणचे मसाला - २ चमचेबडीशेपची पूड - १ चमचा हिंग - १ चमचा हळद - १ चमचा लवंग, काळीमिरी, वेलची पूड - १ चमचा शेवग्याची शेंग - १० ते १२ पाणी - आवश्यकतेनुसार मीठ - चवीनुसार तेल - आवश्यकतेनुसार गूळ - चवीनुसार
कृती
1. सगळ्यात आधी शेवग्याच्या शेंगांचे तुकडे करुन त्याची साल काढून घ्या. नंतर एका पातेल्यात पाणी उकळवा. त्यात मीठ घालून शेवग्याच्या शेंगा शिजवून घ्या.
2. आता एका कढईत अर्धा कप तेल घालून चांगले परतवून घ्या. त्यात पिवळी मोहरी चांगली तडतडू द्या. नंतर त्यात हिंग, बडीशेपची पूड, हळद आणि गूळ घाला. गूळ वितळेपर्यंत चमच्याने ढवळत राहा. आता त्यात उरलेले सर्व साहित्य घालून मसाला तयार करा.
3. शेवग्याच्या शेंगांमधील पाणी काढून घ्या. आता मसाल्यात शिजवलेल्या शेंगा घाला. तयार होईल चटपटीत शेवग्याच्या शेंगांचे लोणचे.
शेवग्याच्या शेंगांचे फायदे
1. शेवग्याच्या शेंगांमध्ये फायबर आणि बायोएक्टिव्ह संयुगे असतात. जे आतडे स्वच्छ करण्यास मदत करतात.याचे सेवन केल्याने गॅस, बद्धकोष्ठता, आम्लता आणि अपचन सारख्या समस्यांना सामोरे जावे लागते. याचे सेवन केल्यास चयापचय वाढू शकतो.
2. यात व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिंडट्स भरपूर प्रमाणात असते. जे शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करते. सर्दी, खोकला आणि हंगामी आजारांपासून आपले रक्षण करते.
3. शेंगांमध्ये ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो. याच्या सेवनामुळे रक्तातील साखरेची पातळी संतुलित होण्यास मदत होते. मधुमेहाच्या रुग्णांसाठी शेवग्याची शेंग फायदेशीर आहे.
Web Summary : Drumstick leaves are a superfood. This recipe details how to quickly make a flavorful and healthy drumstick leaves pickle at home with simple ingredients. It aids digestion, boosts immunity, and helps manage blood sugar.
Web Summary : सहजन के पत्ते एक सुपरफूड हैं। यह रेसिपी बताती है कि कैसे सरल सामग्री के साथ घर पर जल्दी से स्वादिष्ट और स्वस्थ सहजन के पत्तों का अचार बनाया जाए। यह पाचन में मदद करता है, प्रतिरक्षा को बढ़ाता है और रक्त शर्करा को प्रबंधित करने में मदद करता है।