Join us

तांदळाच्या उरलेल्या उकडपासून करा कोकणातला पारंपरिक पदार्थ दूध गोळे, चवीलाही जबरदस्त- बाप्पासाठी खास नैवेद्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2025 16:37 IST

Doodh Gole: Konkani traditional sweets: Ganesh Chaturthi prasad: तांदळाच्या पीठाचे रसगुल्ले कसे करायचे पाहूया.

गणोशोत्सव म्हटलं की बाप्पासह सगळ्यांच्या आवडीचा पदार्थ उकडीचे मोदक. या मोदकात विविध प्रकारही पाहायला मिळतात. तळणीचे, उकडीचे, माव्याचे किंवा विविध सारण भरून मोदक केले जातात.(Doodh Gole) पण अनेकदा उकडीचे मोदक करताना ते फसतात, कळ्या पाडताना फुटतात.(easy recipe with leftover rice flour dough) ज्यामुळे मोदक करावेसे वाटत नाही. तर बरेचदा तांदळाच्या पीठाची उकड उरते. या उकडपासून आपण तांदळाची भाकरी किंवा फुलके तर हमखास करतो. पण कोकणात केला जाणारा पारंपरिक पदार्थाविषयी अनेकांना माहित नाही.(Ganesh Chaturthi prasad) दूध गोळे हा पदार्थ कोकणातील अनेक भागात बाप्पासाठी नैवेद्य म्हणून ठेवतात. (leftover rice flour recipe)आपल्यालाही यंदा बाप्पाच्या नैवेद्यात काही वेगळे ठेवायचे असेल तर ही दूध गोळ्याची रेसिपी नक्की ट्राय करुन पाहा. यासाठी जास्त काही लागत नाही, पण चवीला हा पदार्थ छान लागतो.(Doodh Gole) पाहूया साहित्य आणि सोपी कृती. 

नैवेद्य स्पेशल: कांदा-लसूणविरहित झटपट करा पनीर सिमला मिरची मसाला, हॉटेलसारखी भाजी करण्याची सोपी पद्धत - चवही जबरदस्त

साहित्य दूध – अर्धा लिटरतांदळाच पीठ – १ वाटीओल खोबर - १/२ वाटी साखर – १ वाटीतूप – १ चमचावेलदोड्याची पूड – अर्धा चमचा

पुरी-भजी, समोसे खाल्ले तरी वाढणार नाही कोलेस्टेरॉल! 'या' तेलात तळा, तब्येत राहील एकदम फिट

कृती 

1. दूध गोळे करण्यासाठी सगळ्यात आधी तापवत ठेवा. त्यात हळदीचे पान दुमडून घाला. आता त्यात केशरचे दूध घालून तापत ठेवा. वरुन साखर घालून उकळी येऊ द्या. 

2. आता दुसऱ्या भांड्यात तांदळाचे पीठ घेऊन त्यात ओला नारळाची चव घाला. वेलची पूड घालून मिश्रण एकजीव करा. उकळलेले २ चमचे केशर दूध घाला. पुन्हा चमच्याने व्यवस्थित एकजीव करा. आता चमचाभर तूप घालून पुन्हा एकदा चमचा फिरवीन घ्या. ५ मिनिटे झाकूण ठेवा, जसं तांदळाची उकड काढल्यानंतर करतो अगदी त्याप्रमाणे. 

3. उकळलेल्या दुधात चमचा फिरवून घ्या. तांदळाच्या उकडला व्यवस्थित मळून घ्या. उकड पात्रात हळदीचे पान ठेवून घ्या. एका बाजूला पातेल्यात पाणी गरम करण्यास ठेवा. आता तांदळाच्या पीठाचे छोटे गोळे करुन वाफवून घ्या. 

4. आता वाफवलेले गोळे गरम दुधात घाला. वरुन वेलची पूड घाला. चमच्याने ढवळून घ्या. तयार होतील दूध गोळे किंवा तांदळाच्या पीठाचे रसगुल्ले. 

टॅग्स :अन्नपाककृती