ढाब्यावर मिळणारी पंजाबी दाल तडका आणि जिरा राईस. या वासानेच आपली भूक चाळवते. जाडसर डाळ, वरुन साजूक तुपाची झणझणीत फोडणी आणि तोंडात रेंगळणारी चव.(Punjabi Dal Tadka recipe) ही डाळ घरीच करता येईल असा प्रश्न अनेकांना पडतो. पण योग्य पद्धत आणि खास फोडणी दिली तर अवघ्या १५ मिनिटांत ढाबा-स्टाईल पंजाबी दाल तडका घरच्या घरी सहज करता येईल. (Quick Indian dal recipe)पंजाबी दाल तडका ही अशी रेसिपी आहे. जी भाजी नसली तरी जेवण खास बनवते. भात, जीरा राईस किंवा साध्या चपातीसोबत ही डाळ दिली तरी सगळी आवडीने खातात.(One pot dal recipe) या डाळीची खरी जादू तिच्या फोडणीत आहे. योग्य प्रमाणात मसाले वापरल्यास पंजाबी दाल तडका एकदम परफेक्ट बनेल. पाहूया १५ मिनिटांत दाल तडका बनवण्याची सोपी रेसिपी.
हिंगातली भेसळ ओळखा १ मिनिटांत, हिंगाचा गंध असलेला भुसा तुम्ही स्वयंपाकात वापरताय-तपासा चटकन..
साहित्य
तुरीची डाळ - १ कप हळद - १ चमचापाणी - आवश्यकेतनुसार मीठ - चवीनुसार तूप - ४ चमचेमोहरी - अर्धा चमचा बारीक चिरलेला लसूण - १ चमचा बारीक चिरलेला आले - १ चमचा कढीपत्ता पाने - ७ ते ८बारीक चिरलेला कांदा - १ कप बारीक चिरलेला टोमॅटो - १ कप लाल तिखट - १ चमचा धणे पावडर - १ चमचा बारीक चिरलेला कोथिंबीर - १ चमचा जिरे - १ चमचा लाल सुक्या मिरच्या - २ ते ३काश्मिरी लाल तिखट - १ चमचा
हिंगातली भेसळ ओळखा १ मिनिटांत, हिंगाचा गंध असलेला भुसा तुम्ही स्वयंपाकात वापरताय-तपासा चटकन..
कृती
1. सगळ्यात आधी तुरीची डाळ स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर कुकरमध्ये धुतलेली तुरीची डाळ, पाणी, मीठ आणि हळद घालून चमच्याने ढवळून घ्या. कुकरचे झाकण लावून तीन शिट्ट्या करा.
2. आता कढईमध्ये तूप गरम करुन त्यात मोहरी घालून तडतडल्यानंतर लसूण, कढीपत्ता, आले, मिरची, कांदा घालून चांगले परतवून घ्या. कांदा लाल झाल्यानंतर त्यात टोमॅटो घाला. यात हळद, लाल तिखट घाला. वरुन शिजवलेली डाळ घाला. डाळीत थोडे पाणी घालून उकळी येऊ द्या. धणे पूड घालून पुन्हा उकळी येऊ द्या. कोथिंबीर घालून पुन्हा उकळी येऊ द्या.
3. फोडणीसाठी फोडणी पात्रात तूप घेऊन त्यात जिरे, लाल सुक्या मिरची, कढीपत्ता, लाल तिखट घालून डाळीला फोडणी द्या.
Web Summary : Enjoy restaurant-quality Punjabi Dal Tadka at home in minutes. This simple recipe, focusing on the flavorful tempering, transforms a basic lentil dish into a delicious meal perfect with rice or roti. Ready in fifteen minutes!
Web Summary : घर पर मिनटों में रेस्तरां-शैली पंजाबी दाल तड़का का आनंद लें। यह सरल रेसिपी, स्वादिष्ट तड़के पर ध्यान केंद्रित करते हुए, एक बुनियादी दाल के व्यंजन को चावल या रोटी के साथ एकदम सही स्वादिष्ट भोजन में बदल देती है। पंद्रह मिनट में तैयार!