पंजाबी जेवणाचे नाव काढले की डोळ्यांसमोर येतो तो पंजाबचा पारंपरिक पदार्थ दाल मखनी. गरमागरम, मलाईदार आणि सुगंधी दाल मखनी पाहिलं की आपली भूक चाळवते. हॉटेल किंवा ढाब्यावर गेल्यावर आपण आवर्जून हा पदार्थ ऑर्डर करतो.(Dal Makhani recipe) पण घरी बनवताना अनेकदा हॉटेलसारखा तो गडद लाल रंग येत नाही. जर आपल्यालाही वाटत असेल की ढाब्यासारखी दाल मखनी घरी बनवणं फार कठीण आहे, तर फक्त ५ सोप्या स्टेप्स वापरून आपण झटपट दाल मखनी घरी करु शकता. (Dhaba style Dal Makhani)अनेक ठिकाणी दाल मखनीच्या नावाखाली भरपूर तूप आणि बटरचा वापर केला जातो. त्यामुळे पौष्टिकता कमी आणि फॅट्सच प्रमाण जास्त असतं.(Authentic Punjabi Dal Makhani) चुकीच्या पद्धतीने दाल मखनी केल्यास पदार्थ लवकर शिजत नाही आणि चवही बिघडते. परफेक्ट दाल मखनी करण्यासाठी पाहूया साहित्य आणि सोपी कृती.
शेपवेअरची कटकट विसरा , साडी नेसल्यावर उंच आणि स्लिम दिसण्यासाठी ५ मॅजिक ट्रिक्स; दिसेल परफेक्ट फिगर
साहित्य
भिजवलेले काळे उडीद - १ कप भिजवलेला राजमा - १/४ कप खडा मसाला बटर - आवश्यकतेनुसारतेल - २ चमचे हळद - १ चमचा गरम मसाला - १ चमचा तमालपत्र - १कांद्याची पेस्ट - १ छोटी वाटी टोमॅटो प्युरी - १ छोटी वाटी आले- १ इंच बारीक चिरलेली हिरवी मिरची - २ लाल तिखट - १ चमचा धने पावडर - १ चमचाजिरे पावडर - १ चमचा कसुरी मेथी - १ चमचा मीठ - चवीनुसार फ्रेश क्रीम - १/२ कपकोथिंबीर - आवश्यकतेनुसार
कृती
1. सगळ्यात आधी डाळ आणि राजमा स्वच्छ पाण्याने धुवून घ्या. त्यानंतर कुकरमध्ये भिजवलेली डाळ, राजम, पाणी, मीठ, खडा मसाल्याची पोटली आणि बटर घालून शिट्ट्या करुन घ्या.
2. यानंतर गॅसवर पातेल ठेवून त्यात बटर, तेल घाला. जीरे, हळद, गरम मसाला, तमालपत्र आणि कांदा घालून परतवून घ्या. वरुन टोमॅटो प्युरी, आले, मिरची घालून पुन्हा ढवळून घ्या. त्यात लाल तिखट, धने पावडर, जिरे पावडर, कसुरी मेथी आणि मीठ घालून चांगले परतवून घ्या.
3. आता त्यात शिजवलेला राजमा आणि डाळ घाला. चमच्याने डाळीचे मिश्रण घोटून घ्या. त्यात फ्रेश क्रीम, साखर, आले आणि हिरवी मिरची, कोथिंबीर घालून पुन्हा ढवळा. वरुन फ्रेश क्रीम, बटर, चिंच चटणी आणि कोथिंबीर घाला. जिरा राईससोबत आवडीने खा दाल मखनी.
Web Summary : Make restaurant-quality Dal Makhani at home in just five easy steps! This recipe avoids excessive butter and ghee for a healthier, authentic Punjabi flavor. Impress your guests with this rich, creamy, and flavorful dish.
Web Summary : घर पर रेस्तरां जैसा दाल मखनी बनाएं, वो भी सिर्फ पांच आसान स्टेप्स में! यह रेसिपी स्वस्थ, प्रामाणिक पंजाबी स्वाद के लिए अत्यधिक मक्खन और घी से बचाती है। इस रिच, क्रीमी और स्वादिष्ट व्यंजन से अपने मेहमानों को प्रभावित करें।