Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Food > अस्सल पंजाबी चव! फक्त ५ सोप्या स्टेप्समध्ये करा ढाबा स्टाईल 'दाल मखनी'; इतकी चविष्ट की पाहुणेही विचारतील रेसिपी

अस्सल पंजाबी चव! फक्त ५ सोप्या स्टेप्समध्ये करा ढाबा स्टाईल 'दाल मखनी'; इतकी चविष्ट की पाहुणेही विचारतील रेसिपी

Dal Makhani recipe: Dhaba style Dal Makhani: Authentic Punjabi Dal Makhani: परफेक्ट दाल मखनी करण्यासाठी पाहूया साहित्य आणि सोपी कृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2026 11:30 IST2026-02-27T11:30:00+5:302026-02-27T11:30:02+5:30

Dal Makhani recipe: Dhaba style Dal Makhani: Authentic Punjabi Dal Makhani: परफेक्ट दाल मखनी करण्यासाठी पाहूया साहित्य आणि सोपी कृती

How to make dhaba style dal makhani at home Authentic Punjabi dal makhani recipe step by step Easy dal makhani recipe in 5 simple steps Creamy restaurant style dal makhani recipe Traditional Punjabi dal makhani with butter and cream | अस्सल पंजाबी चव! फक्त ५ सोप्या स्टेप्समध्ये करा ढाबा स्टाईल 'दाल मखनी'; इतकी चविष्ट की पाहुणेही विचारतील रेसिपी

अस्सल पंजाबी चव! फक्त ५ सोप्या स्टेप्समध्ये करा ढाबा स्टाईल 'दाल मखनी'; इतकी चविष्ट की पाहुणेही विचारतील रेसिपी

पंजाबी जेवणाचे नाव काढले की डोळ्यांसमोर येतो तो पंजाबचा पारंपरिक पदार्थ दाल मखनी. गरमागरम, मलाईदार आणि सुगंधी दाल मखनी पाहिलं की आपली भूक चाळवते. हॉटेल किंवा ढाब्यावर गेल्यावर आपण आवर्जून हा पदार्थ ऑर्डर करतो.(Dal Makhani recipe) पण घरी बनवताना अनेकदा हॉटेलसारखा तो गडद लाल रंग येत नाही. जर आपल्यालाही वाटत असेल की ढाब्यासारखी दाल मखनी घरी बनवणं फार कठीण आहे, तर फक्त ५ सोप्या स्टेप्स वापरून आपण झटपट दाल मखनी घरी करु शकता. (Dhaba style Dal Makhani)
अनेक ठिकाणी दाल मखनीच्या नावाखाली भरपूर तूप आणि बटरचा वापर केला जातो. त्यामुळे पौष्टिकता कमी आणि फॅट्सच प्रमाण जास्त असतं.(Authentic Punjabi Dal Makhani) चुकीच्या पद्धतीने दाल मखनी केल्यास पदार्थ लवकर शिजत नाही आणि चवही बिघडते. परफेक्ट दाल मखनी करण्यासाठी पाहूया साहित्य आणि सोपी कृती.

शेपवेअरची कटकट विसरा , साडी नेसल्यावर उंच आणि स्लिम दिसण्यासाठी ५ मॅजिक ट्रिक्स; दिसेल परफेक्ट फिगर 

साहित्य 

भिजवलेले काळे उडीद - १ कप 
भिजवलेला राजमा - १/४ कप 
खडा मसाला 
बटर - आवश्यकतेनुसार
तेल - २ चमचे 
हळद - १ चमचा 
गरम मसाला - १ चमचा 
तमालपत्र - १
कांद्याची पेस्ट - १ छोटी वाटी 
टोमॅटो प्युरी - १ छोटी वाटी 
आले- १ इंच 
बारीक चिरलेली हिरवी मिरची - २ 
लाल तिखट - १ चमचा 
धने पावडर - १ चमचा
जिरे पावडर - १ चमचा 
कसुरी मेथी - १ चमचा 
मीठ - चवीनुसार 
फ्रेश क्रीम - १/२ कप
कोथिंबीर - आवश्यकतेनुसार 


कृती 

1. सगळ्यात आधी डाळ आणि राजमा स्वच्छ पाण्याने धुवून घ्या. त्यानंतर कुकरमध्ये भिजवलेली डाळ, राजम, पाणी, मीठ, खडा मसाल्याची पोटली आणि बटर घालून शिट्ट्या करुन घ्या. 

2. यानंतर गॅसवर पातेल ठेवून त्यात बटर, तेल घाला. जीरे, हळद, गरम मसाला, तमालपत्र आणि कांदा घालून परतवून घ्या. वरुन टोमॅटो प्युरी, आले, मिरची घालून पुन्हा ढवळून घ्या. त्यात लाल तिखट, धने पावडर, जिरे पावडर, कसुरी मेथी आणि मीठ घालून चांगले परतवून घ्या. 

3. आता त्यात शिजवलेला राजमा आणि डाळ घाला. चमच्याने डाळीचे मिश्रण घोटून घ्या. त्यात फ्रेश क्रीम, साखर, आले आणि हिरवी मिरची, कोथिंबीर घालून पुन्हा ढवळा. वरुन फ्रेश क्रीम, बटर, चिंच चटणी आणि कोथिंबीर घाला. जिरा राईससोबत आवडीने खा दाल मखनी. 


Web Title : असली ढाबा-स्टाइल दाल मखनी: पंजाबी स्वाद के लिए 5 आसान स्टेप्स में बनाएं

Web Summary : घर पर रेस्तरां जैसा दाल मखनी बनाएं, वो भी सिर्फ पांच आसान स्टेप्स में! यह रेसिपी स्वस्थ, प्रामाणिक पंजाबी स्वाद के लिए अत्यधिक मक्खन और घी से बचाती है। इस रिच, क्रीमी और स्वादिष्ट व्यंजन से अपने मेहमानों को प्रभावित करें।

Web Title : Authentic Dhaba-Style Dal Makhani: Easy 5-Step Recipe for a Punjabi Delight

Web Summary : Make restaurant-quality Dal Makhani at home in just five easy steps! This recipe avoids excessive butter and ghee for a healthier, authentic Punjabi flavor. Impress your guests with this rich, creamy, and flavorful dish.