पालेभाज्या म्हटलं की मोठ्यांपासून लहानांपर्यंत अनेकांचे नाक मुरडतात. भाज्या खाण्याचे नाटक सुरु होते. पण रोज नवीन काय बनवावं असा प्रश्न कायमच गृहिणींना पडतो.(Chana palak masala) डब्यात कडधान्य दिली तर ती खाण्यास देखील त्यांना जीवावर येते. चण्याची भाजी ताटात वाढली की, आपल्या जेवण नकोसे होते. त्यात चणे काही लवकर शिजत नाही. त्याचा मसाला देखील बरेचदा कच्चा राहतो.(Spinach chana recipe) हवी तशी तर्री देखील येत नाही. ढाबास्टाइल गरमागरम चना पालक मसाला बनवायचा असेल तर काही सोप्या टिप्स लक्षात ठेवा.(Healthy lunchbox recipe)
सध्याच्या धावपळीच्या जगात झटपट पण पौष्टिक पदार्थ आपल्याला खावेसे वाटतात. चना–पालक मसाला याच गरजेला एकदम फिट बसतो. उरलेले उकडलेले चणे असतील, दोन मूठ पालक, आणि बेसिक घरगुती मसाले यापासून बनलेली ही टेस्टी रेसिपी एकदा खाल्ली तर रोजच बनवाल. पाहूया यासाठी लागणारे साहित्य
लग्नसमारंभात करा रेखा स्टाईल एंट्री! ५ रॉयल साड्या, कायम दिसाल तरुण सुंदर आणि क्लासी
साहित्य
उकडलेले काळे चणे - १ वाटी
पालक - १ जुडी
दही - २ चमचे
तेल - १ चमचा
जिरे - १ चमचा
बारीक चिरलेला कांदा - १ वाटी
बारीक चिरलेली हिरवी मिरची - २ ते ३
आले-लसूण पेस्ट - १ चमचा
हळद - १ चमचा
लाल तिखट - १ चमचा
गरम मसाला - १ चमचा
कसुरी मेथी - १ चमचा
मीठ - चवीनुसार
कोथिंबीर - आवश्यकतेनुसार
कृती
1. सगळ्यात आधी चने स्वच्छ धुवून रात्रभर भिजत घाला. त्यानंतर कुकरमध्ये पाणी घालून चने शिजवून घ्या. आता पालक स्वच्छ करुन धुवून घ्या. गॅसवर एका पॅनमध्ये मीठ घालून पालक उकळवून घ्या. मिक्सरच्या भांड्यात उकळवलेला पालक थंड झाल्यानंतर दही घालून त्याची पेस्ट तयार करा.
2. आता एका कढईत तेल घालून त्यात जिरे, कांदा, हिरवी मिरची, आले-लसूण पेस्ट घालून चांगले परतवून घ्या. कांदा लालसर झाल्यानंतर त्यात हळद, लाल तिखट, गरम मसाला आणि कसुरी मेथी घालून पुन्हा परतवून घ्या. यानंतर त्यात उकडलेल्या चण्याचे थोडेसे पाणी घाला. पालक प्युरी घालून उकळी येऊ द्या.
3. यामध्ये आता उकडलेले चणे आणि मीठ घालून व्यवस्थित परतवून घ्या. २ ते ३ मिनिटे शिजू द्या. उकळी आल्यानंतर वरुन कोथिंबीर घाला. तयार होईल गरमागरम चना पालक मसाला.
