सणसमारंभ, दिवाळी असो किंवा रोजच्या जेवणात तुपाचा वापर नियमितपणे केला जातो. गरमागरम वरण- भातावर तुपाची धार सोडली जाते. (homemade ghee) पराठा, चपातीवर तूप लावले जाते. साजूक तूप हा भारतीय स्वयंपाकघरातील महत्त्वाचा भाग आहे.(how to make ghee) आजही अनेक घरांमध्ये साजूक तूप घरच्याघरी बनवले जाते.(ghee storage tips) घरी ताजे, शुद्ध आणि दाणेदार तूप तयार करण्यासाठी खूप वेळ लागतो. तुपात भेसळ असण्याच्या भीतीमुळे आपण ते घरी बनवण्यावर अधिक भर देतो. (make ghee at home)
साजूक तूप घरी तयार करण्यासाठी दुधाची साय साठवण्यापासून त्याला कढवण्यापर्यंतचा काळ खूप मोठा असतो. अनेकदा तूप कढवताना ते जळते, त्याच्या उग्र वासाचा आपल्याला त्रास देखील होतो.(how to make ghee that doesn’t smell sour) परंतु १ सोपी ट्रिक वापरल्यास आपल्याला काही वेळातच दाणेदार, रवाळ तूप मिळेल. या पद्धतीने तूप तयार केल्यास त्याचा रंग, चव आणि सुगंध देखील टिकून राहतो. तसेच महिनाभर टिकते आणि बुरशी देखील लागत नाही.
पाहुण्यांसाठी खास बेत! हॉटेलसारखे चमचमीत दही छोले करा घरच्याघरी, रेसिपी अशी की तोंडाला सुटेल पाणी
तूप कढवण्यासाठी आपल्याला सगळ्यात आधी एका पॅनमध्ये दुधाची साय घालावी लागेल. त्यानंतर त्यावर ग्लास ५ मिनिटे फिरवा. त्यात अर्धा ग्लास थंड पाणी घालून पुन्हा ग्लास फिरवा. यामुळे लोणी आणि ताक दोन्ही वेगळे होतील. आता पॅनमध्ये लोणीचा गोळा घालून फास्ट गॅसवर कढवण्यासाठी ठेवा. ज्यामुळे लोणी सहज वितळेल आणि तूप वेगळे होईल. या प्रक्रियेदरम्यान लोणी सतत ढवळत राहा. ज्यामुळे पॅनच्या तळाशी चिकटणार नाही आणि तुपाला रंग देखील येईल.
शुद्ध तुपाला फक्त चवच नाही तर त्याचा रंग देखील अधिक महत्त्वाचा आहे. स्वयंपाक बनवताना तुपात थोडी हळद घातल्यास तो हलका सोनेरी किंवा पिवळा होऊ शकतो. याशिवाय तुपात आपण ३ ते ४ मेथीचे दाण देखील घालू शकतो. इतकेच नाही तर दाणेदार-रवाळ घरगुती तूप लवकर खराब होते. काही दिवसात त्याचा उग्र वास येऊ लागतो. अशावेळी सुपारीचे पान फायदेशीर राहिल. लोणी वितळल्यानंतर गॅस मंद आचेवर ठेवा. त्यात खायचे पान घालून तूप कढवून घ्या. थंड झाल्यानंतर व्यवस्थित तूप गाळून घ्या. ज्यामुळे शुद्ध तूप जास्त दिवस टिकेल.
सुपारीच्या पानांमध्ये नैसर्गिक आणि सुगंध गुणधर्म आहे. यात असणारे घटक तुपाला बुरशी लागण्यापासून रोखतात. तुपातील ओलावा लवकर शोषून घेण्यासाठी मदत करते. ज्यामुळे तूप लवकर खराब होत नाही.
