Join us  

डाळीत मीठ कधी घालता? मीठ-हळद घालण्याचं परफेक्ट टायमिंग पाहा-चविष्ट बनेल वरण

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2024 12:48 PM

How To Make Dal Taste Better (Varan Kase Banvave) : कुकरमधून डाळ, पाणी  एकत्र घातल्याने कुकरमधून पाणी वर येतं.

भारतीय जेवण वरण भाताशिवाय अपूर्ण आहे. (Cooking Hacks) भारतातील प्रत्येक राज्यात वेगवेगळ्या पद्धीने डाळ बनवली जाते. (How Do You Make A Simple Dal Recipe) रोजच्या आहारात डाळीचा समावेश केल्यास शरीराला अनेक पोषक तत्व मिळतात. रोज अनेक घरांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या डाळी बनवल्या जातात. अनेक महिलांचे असे मत असते की हळद घातल्यानंतरही डाळीचा व्यवस्थित रंग येत नाही आणि  वरणाला हवी तशी चव येत नाही. (How To Cook Simple Daal)

वरण बनवताना मीठ आणि हळद कसं करायची याचं योग्य टायमिंग माहीत असावं लागतं.  ज्यामुळे रंग चांगला येतो. अनेकांना वरणात हळद आणि मीठ घालण्याची योग्य पद्धत माहीत नसते. हळद आणि मीठ घालण्याची योग्य पद्धत पाहूया ज्यामुळे वरण परफेक्ट बनेल. (Cooking Hacks)

वरणात मीठ आणि हळद कधी घालायचे? (What Is The Right Time To Add Turmeric And Salt to Dal)

डाळ बनवण्यासाठी सगळ्यात आधी डाळ व्यवस्थित धुवून १५ मिनिटांसाठी पाण्यात भिजवून ठेवा. ज्यामुळे डाळ लवकर शिजेल आणि चवही चांगली येईल. १५ ते २० मिनिटांनी त्यात दुप्पट पाणी घाला. चवीनुसार मीठ आणि हळद घाला सर्व साहित्य व्यवस्थित एकजीव करून घ्या. कुकरमध्ये १ चमचा तेल घालून झाकण बंद करा. कुकरमध्ये तेल घातल्यामुळे चव अधिकच चांगली लागेल. डाळ किंवा पाणी झाकणाच्या बाहेर येणार नाही.  शिट्टी होईपर्यंत गॅस हाय फ्लेमवर ठेवा. नंतर लो फ्लेमवर ३ शिट्ट्या काढून घ्या. ३ शिट्ट्या आल्यानंतर उकळून घ्या.

डाळीची शिट्टी काढताना घाई  करू नका. वाफ निघाल्यानंतर कुकर व्यवस्थित हलवून घ्या. नंतर डाळीला फोडणी घाला. डाळीला फोडणी देताना तुम्ही एका भांड्यात तेल गरम करायला ठेवा. त्यात जीरं, मोहोरी, सुकी मिरची, कांदा आणि लसणाची फोडणी द्या. नंतर डाळीवर झाकण ठेवा. तयार आहे स्वादीष्ट डाळ.

कुकरमध्ये डाळ शिजवताना जास्त पाणी मिसळता तेव्हा कुकरमधून पाणी  बाहेर येऊ लागते. कुकरमधून डाळ, पाणी  एकत्र घातल्याने कुकरमधून पाणी वर येतं. कुकरचं झाकण व्यवस्थित न लावल्यामुळे पाणी बाहेर येतं. कुकरमध्ये डाळ आणि पाणी घातल्यानंतर गॅस फ्लेम उच्च असल्यामुले कुकरमधून पाणी बाहेर येतं. ंम्हणून पाणी योग्य प्रमाणातच घाला.

टॅग्स :अन्नकिचन टिप्स