हिवाळ्याच्या दिवसात आपल्याला भूक जास्त प्रमाणात लागते. अशावेळी आपण सतत काही ना काही खात असतो. (dal palak khichdi recipe) वातारवणातील गारव्यामुळे आपल्याला आरोग्यासाठी हेल्दी पदार्थ खाण्याचा पर्याय सुचवला जातो.(healthy one pot Indian meal) पण रोज नवीन काय बनवायचं आणि प्रत्येकासाठी वेगळं काय बनवायचं असा प्रश्न सगळ्याच महिलांना असतो. (spinach dal khichdi) अशावेळी गरमागरम, पौष्टिक आणि चवदार काहीतरी खाण्याची इच्छा झाली की डाळ पालक खिचडी हा एकदम परफेक्ट पर्याय आहे. (easy vegetarian dinner recipes) शरीराला उब मिळवून देणारी, पोट भरणारी आणि पौष्टिकतेने भरलेली ही एक वन-डिश मील म्हणजे जणू आरोग्य आणि फक्कड चवीचा बेतच.(Indian comfort food recipes) बनवायला अगदी सोपी पण लगेच होणारा पदार्थ.
ही खिचडी चवलीचा नाही तर आरोग्यासाठी देखील चांगली आहे. हिवाळ्यात भूक जास्त प्रमाणात लागते. अशावेळी तेलकट पदार्थ खाल्ल्यावर अॅसिडीटीचा त्रास होतो. व्यायाम, योगा किंवा डाएट करणाऱ्यांसाठी ही खिचडी परफेक्ट आहे. यासाठी लागणारे साहित्य आणि कृती पाहूया. (winter healthy meals India)
साहित्य
भिजवलेले तांदूळ - १ कप
तुरीची डाळ - १/२ कप
मुगाची डाळ - १/२ कप
मीठ - चवीनुसार
हळद -२ चमचा
पाणी - आवश्यकतेनुसार
तूप - २ चमचे
जिरे - १/२ चमचा
हिंग - १/२ चमचा
छोट्या आल्याचा तुकडा
लसूण पाकळ्या - ४ ते ५
बारीक चिरलेला कांदा - १
धने पावडर - १ चमचा
लाल मिरची पावडर - १ चमचा
काश्मिरी लाल मिरची पावडर- १ चमचा
गरम मसाला - १ चमचा
बारीक चिरलेला टोमॅटो - २
बारीक चिरलेला गाजर - १
उकडलेला मका- १/२ कप
मटार - १/२ कप
पालक प्युरी - १/२ कप
कृती
1. सगळ्यात आधी कुकरमध्ये भिजवलेले तांदूळ, तुरीची डाळ आणि मुगाची डाळ घाला. त्यात हळद, मीठ आणि पाणी घालून कुकरचे झाकण लावा. ३ शिट्ट्या झाल्यानंतर गॅस बंद करा.
2. यानंतर पालक स्वच्छ धुवून मिक्सरमध्ये त्याची पेस्ट तयार करा. आता एका पॅनमध्ये तूप घालून चांगले गरम होऊ द्या. त्यात जिरे, हिंग, बारीक चिरलेला लसूण- आले. त्यानंतर बारीक चिरलेला कांदा घाला. लालसर झाल्यानंतर त्यात हळद, लाल मसाला, गरम पावडर घालून व्यवस्थित परतवून घ्या. आता यात बारीक चिरलेला टोमॅटो, गाजर, उकडलेला मका, मटार आणि पालक प्युरी घालून व्यवस्थित मिक्स करून शिजू द्या.
3. पालकची प्युरी व्यवस्थित शिजल्यानंतर त्यात शिजवलेली खिचडी घाला. सर्व साहित्य पुन्हा मिक्स करा. फोडणी पात्रात तूप, लसूण पाकळ्या, लाल मिरची पावडर आणि आणि सुकलेली लाल मिरची घालून तडतडू द्या. वरुन शिजवलेल्या पालक खिचडीवर घाला. तयार होईल गरमागरम पालक खिचडी.
