Join us

सांडगी मिरचीतला मसाला निघू नये म्हणून २ सोप्या ट्रिक्स - खराब न होता वर्षभर टिकेल चांगली, चवीला झणझणीत...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2025 20:58 IST

How To Make Dahi Mirchi : Dahi Mirchi Recipe : Mirchi With Curd Recipe : चटपटीत सांडगी मिरची वर्षभर खराब होत नाही, तळताना मसाला अजिबात बाहेर येणार नाही यासाठी खास टिप्स...

उन्हाळा आणि वाळवणाच्या पदार्थांचे विशिष्ट असे नाते आहे. आजही कित्येक घरोघरी उन्हाळ्यात वाळवणाचे पदार्थ हमखास पारंपरिक पद्धतीने तयार केले जातात. या वाळवणाच्या पदार्थांमध्ये (Sandgi Mirchi) पापड, सांडगे, कुरडया, लोणची, मसाले, मुरांबा असे असंख्य पदार्थ तयार केले जातात. या वाळवणाच्या पदार्थांमध्ये घरोघरी आजही एक पदार्थ आवर्जून केला जातो, हा खास पदार्थ (How To Make Dahi Mirchi) म्हणजे झणझणीत, चटपटीत चविष्ट सांडगी मिरची(Dahi Mirchi Recipe)

वाळवणाच्या पदार्थात सांडगी मिरची करुन वर्षभर या खमंग मिरचीचा आस्वाद घेतला जाते. असे असले तरी अनेक गृहिणींची तक्रार असते की, सांडगी मिरची व्यवस्थित होत नाही, त्यातील मसाल्याला चव लागत नाही, वर्षभर चांगली टिकत नाही, मिरचीतील मसाला खराब होतो, मिरच्या तळताना मसाला फुटून बाहेर येतो... असे होऊ नये यासाठी सांडगी मिरची करताना मसाल्यात नेहमीच्या वापरातील एक खास पदार्थ घातला तर सांडगी मिरचीची चव अप्रतिम होतेच, यात काही शंका नाहीच. यासाठी, यंदा जर तुम्ही देखील वाळवणाच्या पदार्थांत (Mirchi With Curd Recipe) सांडगी मिरची करण्याचा बेत आखला असेल तर, ही खास ट्रिक करुन पाहा. यामुळे सांडगी मिरचीची चव तर छान लागेलच, सोबतच ती वर्षभर चांगली टिकेल आणि तळताना तेलात फुटून मसाला बाहेर येणार नाही... यासाठी काय आहे खास टीप ते पाहूयात... 

सांडगी मिरची करताना त्यात घाला चमचाभर 'हा' पांढराशुभ्र पदार्थ... 

सांडगी मिरची करताना त्याची चव अप्रतिम होण्यासाठी masteerrecipes2022 या इंस्टाग्राम पेजवरुन एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओत सांगितल्याप्रमाणे, सांडगी मिरची करताना तयार मसाल्यात चमचाभर घरीच लावलेलं घट्ट - दाटसर दही घालावं. सांडगी मिरचीच्या मसाल्यात चमचाभर दही घातल्याने सांडगी मिरचीला अप्रतिम चव येते. इतकेच नव्हे तर ती वर्षभर खराब न होता चांगली टिकते देखील सोबतच तळताना तेलात फुटून मसाला देखील बाहेर येत नाही. 

इवल्याशा गुळाच्या खड्याचे करा थंडगार सरबत! थकवा जाईल पळून, प्या गूळ सरबत...

आंबा चिरण्याच्या ७ पद्धती, प्रत्येक फोडीप्रमाणे वेगळी लागेल आंब्याची चव! पाहा कशासाठी - कसा चिराल आंबा...

सांडगी मिरची तयार करताना मसाल्यात दही घातल्याने त्याला छान आंबट - तिखट चव येते. यासोबतच, मसाल्याचे बाइंडिंग देखील चांगले होण्यास मदत होते. काहीवेळा मिरचीत भरलेला मसाला बाहेर पडतो, परंतु दही घातल्याने मसाला हलकासा ओला होऊन त्याला घट्टसरपणा आल्याने मसाला मिरचीतून बाहेर पडत नाही. यामुळे मसाला आत गच्च भरला जातो, तो आत चिकटून बसतो बाहेर पडत नाही. यासाठी, सांडगी मिरची चवीचा छान होण्यासाठी आणि त्याचा मसाला आता चिकटून बसण्यासाठी चमचाभर दही घालायला विसरु नका... 

फक्त ३ पदार्थांत करा १० मिनिटांत दहीकांडी, - बालपणीची आठवण सांगणारा गोड थंडगार पदार्थ...

मिरची तळताना फुटू नये म्हणून... 

मिरची तळताना काहीवेळा फुटून मसाला बाहेर येतो किंवा मिरची करपून काळी होते. असे होऊ नये म्हणून सर्वात आधी तेल चांगले व्यवस्थित तापवून घ्यावे. मिरची तळण्यासाठी तेल एकदम कडकडीत गरम किंवा एकदम थंडगार नसावे. तेल तापवून मग गॅस बारीक करून मिरच्या तळाव्यात या पद्धतीने मिरच्या तळल्यास आतला मसाला देखील व्यवस्थित भाजला जाऊन मिरच्या बाहेरून देखील खरपूस तळल्या जातात. याचबरोबर, तळताना फुटून मसाला देखील वेगळा होत नाही.

टॅग्स :अन्नपाककृतीसमर स्पेशल